बुधवार, १९ जानेवारी, २०२२

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पुढे


देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल पेमेंट बँकेपैकी एक बँक ठरली

ग्रामीण, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची, त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध- जे वेंकटरामु, व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, आयपीपीबी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ करतांना म्हटले होतेकी देशात वित्तीय समावेशन करण्यासाठीचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे.त्या पोस्ट पेमेंट बँक या प्रथम डिजिटल बँकेने दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा उत्तम वापर करत त्या पायावर आपला विस्तार करतएक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर  पोहोचली  आहेअशी घोषणा आज बँकेने केली. बँकेचा शुभारंभ झाल्यापासूनकेवळ तीन वर्षांच्या आत ही देशातील सर्वाधिक जलद गतीने विस्तारलेल्या बँकांपैकी एक बँक ठरली आहे.

आयपीपीबीने आपल्या 1.36 लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून पाच कोटी खाती डिजिटल आणि संपूर्ण कागदरहित व्यवहार करत सुरु केली आहेत. यापैकी 1.20 लाख खाती ग्रामीण भागातली आहेत. तसेच1.47 लाख ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत.

या कामगिरीमुळेआयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असूनटपाल कार्यालयाच्या  2,80,000  कर्मचाऱ्यांच्या परिश्रम शक्तीच्या बळावरवित्तीय साक्षरता आणि सक्षमीकरणाची मोहीम राबवली आहे.

विशेष म्हणजेबँकेच्या एकूण खातेदारांपैकी सुमारे 48% महिला खातेदार आहेततर 52% पुरुष खातेदार आहेतही आकडेवारीअधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98% खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत. आणि 68% महिलांना या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत. आणखी एक मैलाचा दगड  म्हणजे देशातील युवक देखील पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. 41% पेक्षा अधिक खातेधारक 18 ते 35 वर्षे या वयोगटातील आहेत.

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलतांना टपाल विभागाचे सचिवविनीत पांडे यांनी सांगितले की  इंडिया पोस्टअंतर्गतदेशातीळ सर्वात मोठे वित्तीय समवेशनाचे जाळे उभरण्यास आम्ही कटिबद्ध असूनयात शहरी आणि ग्रामीण भारतातही आमच्या बँकिंग सेवा विस्तारल्या आहेत. केवळ तीन वर्षातपाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कामगिरी या बँक मॉडेलच्या यशाची पावतीच ठरली आहे. यातून किफायतशीरसुलभसोपी आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्थाविशेषतः देशाच्या ग्रामीण भागातनिर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या घरांपर्यंत बँकिंग सेवा पुरवून आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात हातभार लावू शकलोयाचा आम्हाला विशेष आनंद आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीजे वेंकटरामु यांनी यावर प्रतिक्रिया देतांना सांगितले की हा बँकेसाठी अभिमानाचा क्षण आहे.आम्ही आमचा ग्राहक विस्तार करतांनासामर्थ्याकडून सामर्थ्याकडे वाटचाल केली आहे. कोविड-19 महामारीच्या काळातहीआम्ही ग्राहकांना निर्वेक्ष बँकिंग आणि सरकार-ते ग्राहक (G2C) सेवा पुरवल्या आहेत.विशेष म्हणजेबँकेने आपले ग्राहक तयार करतांना संपूर्णपणे कागदरहित व्यवहार करत डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला आहे. ग्रामीणबँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची ,त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bitcoin In Marathi II  तुम्हाला बिटकॉइन मध्ये पैसे लावायचे आहेत का? 

Should You Invest in Bitcoin or Not? Understand in Marathi.  सगळ्यात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी बिटकॉइन ने एक लाख अमेरिकन डॉलर्स चा ऐतिहासिक उ...