Wednesday 4 December 2019

भारत बॉण्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड सुरू करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रम, कंपन्या आणि अन्य सरकारी संस्थांना हा फंड अतिरिक्त निधी पुरवणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, केंद्रीय वित्तीय संस्था तसेच अन्य सरकारी संस्थांना अतिरिक्त निधीचा स्रोत निर्माण करण्यासाठी भारत रोखे विनिमय व्यापार निधी अर्थात (इटीएफ) सुरू करायला मंजुरी दिली आहे. भारत बॉण्ड इटीएफ हा देशातील पहिला कॉर्पोरेट बॉण्ड इटीएफ आहे.
भारत बॉण्ड इटीएफची वैशिष्ट्य:-
  • इटीएफमध्ये सीपीएसई/सीपीएसयू/सीपीएफआय/अन्य कुठल्याही सरकारी संस्थेने जारी केलेल्या रोख्यांचा समावेश असेल. (सुरूवातीला सर्व एएए मानांकित रोखे)
  • विनिमय व्यापार करता येणे शक्य
  • एका युनिटचा किमान आकार 1,000 रुपये
  • पारदर्शक एनएव्ही
  • पारदर्शक पोर्टपोलिओ
  • कमी खर्च (0.0005 टक्के)

भारत बॉण्ड इटीएफची रचना
  • प्रत्येक इटीएफची निश्चित मुदतपूर्ती तारीख असेल
  • इटीएफ, जोखीम प्रतिकृती आधारे म्हणजेच पत गुणवत्ता आणि निर्देशांकाची सरासरी मुदतपूर्ती यांचा मेळ राखत निर्देशांकाचा मागोवा घेईल
  • इटीएफच्या मुदतपूर्ती तारखेला किंवा त्यापूर्वी मुदतपूर्ण होणाऱ्या सीपीएसई, सीपीएसयू, सीपीएफआय आणि अन्य कुठल्याही सरकारी संस्थेच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जावी
  • सध्या यामध्ये तीन आणि दहा वर्षांच्या दोन मुदतपूर्ती श्रृंखला असतील. प्रत्येक श्रृखंलेला समान मुदतपूर्ती श्रृखंलेचा वेगळा सूचकांक असेल.

इंडेक्स गणना
  • नॅशनल स्टॉक एक्सचेंज या स्वतंत्र सूचकांक पुरवठादाराकडून सूचकांकाची रचना केली जाणार
  • 3 आणि 10 वर्ष मुदतपूर्तीच्या विविध सूचकांकाचा मागोवा घेतला जाणार

गुंतवणूकदारांना भारत बॉण्ड इटीएफचा लाभ
  • इटीएफ रोखे सुरक्षा (सीपीएसई आणि अन्य सरकारी मालकीच्या कंपन्यांनी जारी केले रोखे) तरलता (एक्सचेंजवर व्यवहार करता येणार) आणि अनुमान लावता येण्याजोगा कार्यक्षम कर परतावा
  • यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना कमी किंमतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल (किमान 1 हजार रुपये), रोखे बाजारात त्यांना कमी खर्चात सहज प्रवेश मिळणार
  • तरलता आणि सुगम्यतेच्या अभावामुळे रोखे बाजारात सहभागी न होणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढेल
  • रोख्यांच्या तुलनेत कर कार्यक्षमता, रोख्यांमधील कुपनवर किमान दराने कर आकारणी केली जाईल. इटीएफ रोख्यांवर इंडेकसेशननुसार कर आकारणी केल्यामुळे गुंतवणूकदारांना भांडवली नफ्यावर कमी कर भरावा लागेल.

सीपीएसईला भारत बॉण्ड इटीएफचे फायदे
  • इटीएफ रोखे, सीपीएसई, सीपीएसयू, सीपीएफआय आणि अन्य सरकारी संस्थांना बँकेच्या वित्त पुरवठ्या व्यतिरिक्त अतिरिक्त निधी पुरवणार
  • किरकोळ आणि एचएनआय गुंतवणूकदारांच्या सहभाग वाढून या रोख्यांच्या मागणीत वाढ होईल. रोख्यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वेळेच्या अवधित या गुंतवणूकदाराला कमी दरात कर्ज घेण शक्य होईल.
  • तसेच एक्सेचेंजवर इटीएफचे व्यवहार कमी होणार असल्यामुळे उत्तम परतावा मिळू शकेल.
  • सीपीएसईच्या गुंतवणूकदारांमध्ये कर्ज घेण्याबाबत शिस्त निर्माण होईल.

रोखे बाजारांवर विकासात्मक परिणाम
  • इपीएफमुळे गुंतवणूकदारांमध्ये जागरुकता निर्माण होईल
  • इपीएफमुळे रोखे बाजाराचा विस्तार होऊन किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढेल आणि कर्जाचे दर कमी होतील.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Mutual Fund in Marathi; घरी बसून म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...