Wednesday 8 December 2021

भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर, प्रमुख व्याजदरात कुठलाही बदल नाही

 

रेपो दर 4 टक्क्यांवर कायम

रिव्हर्स रेपो दर ही 3.35 टक्क्यांवर कायम




मार्जिनल स्टँडिग फॅसिलिटी आणि बँक दर कोणत्याही बदलाविना 4.25 टक्क्यांवर कायम

आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने आज द्वै मासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून प्रमुख व्याज दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचीपत्रकार परिषदेत माहिती दिली.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण आढावा जाहीर केला. रेपो दर कोणत्याही बदलाविना 4.0 टक्क्यांवरमार्जिनल स्टँडिग फॅसिलिटी आणि बँक दर कोणत्याही बदलाविना 4.25 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दरही कोणत्याही बदलाविना 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन 9.5% दराने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जीडीपी वृद्धीचा दर 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत 6.6 टक्के,  2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 6.0 टक्के2022-23 च्या पहिल्या तिमाहीत 17.2 टक्के2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 7.8 टक्के राहू असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2021-22 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढ 5.3 टक्के राहील असा अंदाज आहे.  हा दर 2021-22 तिसऱ्या तिमाहीत 5.1टक्के2021-22 चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के2022-23 पहिल्या तिमाहीत 5.0 टक्के2022-23 दुसऱ्या तिमाहीत 5.0 टक्के राहील असा अंदाज आहे.

भारतीय अर्थव्यवस्था कोविडच्या या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी आता अधिक चांगल्या प्रकारे सज्ज आहे असे दास यांनी सांगितले. 2020-21च्या पहिल्या तिमाहीमध्ये सर्वात मोठ्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने स्वतःचे पुनरुज्जीवन केले आहे तसेच 2021-22च्या पूर्वार्धात जीडीपी 13.7 टक्क्यांपर्यंत विस्तारला आहे असे ते म्हणाले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारराज्य सरकार आणि आरबीआयने अभूतपूर्व प्रमाणात व्यापक धोरणात्मक कृती केल्याचं ते म्हणाले.

पतधोरणाची समावेशक भूमिका ही  पुनरुज्जीवन तसेच शाश्वत वृद्धी कायम राखण्यासाठी परिस्थितीनुसार तशीच ठेवली जाईल आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड19 च्या परिणामांना तोंड देण्यासाठी पुढेही  सुरू राहिलत्याचवेळी चलनफुगवटा नियंत्रणात राखण्याची काळजी घेतली जाईलअसे दास यांनी स्पष्ट केले.

देशातील अनेक क्षेत्रांनी महामारीपूर्व उत्पादनांची पातळी ओलांडली आहे. चलनफुगवट्याचे प्रमाण 4 टक्के लक्ष्याला अनुसरून आहे. बाह्य अर्थसाहाय्याची गरज अतिशय कमी आहे.

जागतिक उलथापालथीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त साठा पुरेसा ठरण्याची अपेक्षा आहे. कर महसुलामुळे सार्वजनिक अर्थसाहाय्याला बळकटी मिळाली आहे असे दास यांनी नमूद केले.

कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे करसंकलनात आलेले अडथळे आता दूर होत आहेतमात्र अर्थव्यवस्था स्वयंसिद्ध आणि टिकाऊ होण्याइतकी मजबूत झालेली नाही यामुळे धोरणात्मक मदतीची गरज अधोरेखित होतेअसे त्यांनी नमूद केले.

ओमायक्रोन व्हेरियंट आल्याने आणि अनेक देशात कोविड संसर्गात नव्याने वाढ होत असल्याने नुकसान होण्याचे धोके वाढले आहेत. वीज आणि वस्तूंच्या वाढत्या किमतीजागतिक पुरवठा प्रणालीतील अडथळे सुद्धा समस्या निर्माण करत आहेतअशी माहिती त्यांनी दिली.

रब्बी हंगामाच्या दमदार सुरवातीमुळेपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरणपंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाला मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढयामुळे शेतीतला रोजगार वाढत आहेअसे ते म्हणाले.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून अतिरिक्त उपाययोजनांची घोषणा यावेळी करण्यात आली. यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • बँकांच्या परदेशी शाखा आणि उपशाखांना भांडवलाचा पुरवठा आणि या संस्थांसाठी नफ्याचे राखीव प्रमाणपरतावा आणि हस्तांतरण
  • बँकांच्या गुंतवणूक पोर्टफोलियोसाठी असलेल्या व्यवहार्य मापदंडांचा आढावा घेण्यासाठी चर्चा पत्रिका-ऑक्टोबर 2000पासून स्थानिक आर्थिक बाजारपेठा आणि जागतिक निकष याविषयीच्या घडामोडी लक्षात घेऊन सार्वजनिक अभिप्रायांसाठी आरबीआय सध्याचा आराखडा लागू केल्यावर चर्चा पत्रिका प्रसिद्ध करणार
  • शुल्क भरणा प्रणालीसाठी चर्चा पत्रिका-डिजिटल माध्यमातून विविध प्रकारच्या शुल्काचा भरणा करताना आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काविषयी ग्राहकांच्या चिंतांसंदर्भात एक समग्र दृष्टीकोन ठेवण्यासाठी आणि डिजिटल शुल्क भरणा प्रक्रिया परवडण्याजोगी करण्यासाठी चर्चापत्रिका प्रसिद्ध केली जाणार
  • यूपीआय: सुलभीकरणव्याप्ती वाढवणे आणि मर्यादांचा विस्तार यासाठी आरबीआयने डिजिटल पेमेंट्सच्या विस्तारासाठी आणि ही व्यवस्था अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी 3 उपाययोजना जाहीर केल्या आहेत (i)ग्राहकांसाठी व्यवहार सुलभता
  • (ii)वित्तीय बाजारपेठांमध्ये किरकोळ ग्राहकांना अधिकाधिक सहभागी होता येईल अशा सुविधा देणे (iii)सेवा पुरवठादारांच्या क्षमता वाढविणे
  • फिचर फोन वापरकर्त्यांसाठी यूपीआय सुविधा-आरबीआयने फिचर फोन वापरकर्त्यांसाठी यूपीआय आधारित पेमेंट उत्पादने सुरु करणार असून आरबीआय च्या किरकोळ पेमेंटमधील नियामक सॅन्डबॉक्समधल्या अभिनव उत्पादनांचा लाभ करून दिला जाणार
  • युपीआय सुलभीकरण-कमी मूल्याच्या यूपीआय व्यवहारांसाठी यूपीआय ऍप्लिकेशन्समध्ये ऑन डिव्हाईस वॉलेट यंत्रणेच्या माध्यमातून आरबीआय प्रक्रियेचा ओघ सुलभ करणार
  • यूपीआय मर्यादेत वाढ-जी- सेक आणि प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) ऍप्लिकेशन्समध्ये गुंतवणुकीच्या थेट किरकोळ योजनेसाठी यूपीआयद्वारे शुल्काचा भरणा करण्यासाठी त्याच्या मर्यादेत आरबीआयने दोन लाखांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करणार
  • बाह्य व्यावसायिक कर्जाची सुविधा(ईसीबी)/ व्यापार कर्ज-लिबॉरवरून पर्यायी संदर्भ दराकडे (एआरआर) संक्रमण-आपण लिबोरकडून संक्रमित होत असताना ईसीबी आणि व्यापार कर्जासाठी कोणत्याही व्यापक प्रमाणात स्वीकृत आंतरबँक दर किंवा एआरआरचा वापर करता यावा यासाठी आरबीआय मार्गदर्शक तत्वे जारी करणार



(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 च्या पुढे मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

यामुळे ग्रामीण भागातील सर्वांना घरे सुनिश्चित होतील

योजनेअंतर्गत उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी एकूण 2.95 कोटी घरांच्या उद्दिष्टामधून आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार

यासाठी 2,17,257 कोटी रुपये खर्च येईल त्यापैकी केंद्राचा वाटा 1,25,106 कोटी रुपये आहे

Posted On: 08 DEC 2021 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहेज्यामध्ये  एकूण 2.95 कोटी घरांच्या उद्दिष्टापैकी 31 मार्च 2021 पर्यंतच्या उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी  आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे.

मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • 2.95 कोटी घरांच्या एकत्रित उद्दिष्टातील उर्वरित घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विद्यमान नियमांनुसार मार्च 2021 च्या पुढे मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण चालू ठेवणे.
  • प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी घरांचे एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी एकूण 2,17,257 कोटी रुपये खर्च येणार आहे (केंद्राचा वाटा 1,25,106 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा 73,475 कोटी रुपये) आणि नाबार्डला व्याज परतफेड करण्यासाठी 18,676 कोटी रुपयांची अतिरिक्त आवश्यकता आहे.
  • अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधने टप्प्याटप्प्याने बंद करणे आणि सकल अर्थसंकल्पीय सहाय्य (GBS) द्वारे संपूर्ण योजनेसाठी निधीची तरतूद करण्याबाबत वित्त मंत्रालयाशी सल्लामसलत करून निर्णय घेतला जाईल.
  • प्रत्येक लहान राज्याला उदा. हिमाचल प्रदेशहरियाणागोवापंजाबउत्तराखंडआसाम आणि त्रिपुरा वगळता ईशान्येकडील राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व केंद्रशासित प्रदेशांना 1.70% प्रशासकीय निधी व्यतिरिक्त प्रशासकीय निधीच्या केंद्रीय वाट्यामधून (एकूण 2% प्रशासकीय निधीपैकी 0.3%) दरवर्षी अतिरिक्त 45 लाख रुपये प्रशासकीय निधी जारी करणे
  • आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट (PMU) आणि नॅशनल टेक्निकल सपोर्ट एजन्सी (NTSA) सुरु ठेवणे.

लाभ

मार्च 2024 पर्यंत योजना सुरू ठेवल्यामुळे  ग्रामीण भागात "सर्वांसाठी घरे" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2.95 कोटी घरांच्या एकूण उद्दिष्टापैकी मूलभूत सुविधांसह उर्वरित 155.75 लाख पक्की घरे बांधण्यासाठी मदत दिली जाईल.

29 नोव्हेंबर 2021 पर्यंतएकूण 2.95 कोटी उद्दिष्टांपैकी 1.65 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. 2.02 कोटी घरेजी एसईसीसी 2011 डेटाबेस आधारित स्थायी प्रतीक्षा यादीच्या जवळपास समान आहेत त्यांचे बांधकाम 15 ऑगस्ट 2022 च्या मुदतीपर्यंत पूर्ण  होईल. त्यामुळे2.95 कोटी घरांचे एकूण उद्दिष्ट साध्य करण्यासाठीमार्च 2024 पर्यंत योजना सुरू ठेवण्याची गरज आहे. 

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Mutual Fund in Marathi; घरी बसून म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...