Friday 9 August 2019

"एक देश एक शिधापत्रिका" हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल

महाराष्ट्र-गुजरात आणि आंध्र प्रदेश- तेलंगण या दोन समूहांमध्ये आंतरराज्य शिधापत्रिका योजनेचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून उद्‌घाटन


‘एक देश एक शिधापत्रिका’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना केंद्रीय ग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी महाराष्ट्र- गुजरात आणि आंध्र प्रदेश-तेलंगण या लगतच्या राज्यांच्या दोन समूहांमध्ये आज आंतरराज्य शिधापत्रिका योजनेचे उद्‌घाटन केले. यामुळे या समूहांतर्गत असलेल्या राज्यांमधल्या नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या योजनांचा या समूहातल्या कोणत्याही राज्यात लाभ घेता येणार आहे.
राज्यांच्या या दोन समूहात सुरू झालेल्या या योजनेमुळे राष्ट्रीय पातळीवर एकच शिधापत्रिका ग्राह्य धरण्याच्या या योजनेची सुरुवात झाली आहेअसे रामविलास पासवान यांनी या योजनेच्या उद्‌घाटनानंतर सांगितले. संगणकीकृत योजनेची व्याप्ती वाढल्यानंतर आंध्र प्रदेशगुजरातहरयाणाझारखंडकर्नाटककेरळमहाराष्ट्रपंजाबराजस्थानतेलंगण आणि त्रिपुरा या 11 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेच्या राज्यांतर्गत अंमलबजावणीला सुरुवात केली आहेअसे ते म्हणाले. या राज्यांमध्ये 1 जानेवारी 2020 पर्यंत आंतरराज्य शिधापत्रिका वैधता योजना लागू केली जाईलअशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर इतर राज्यांमध्येही ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाईलअसे त्यांनी सांगितले.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे 309 कोटी रुपये खर्चाने अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी उभारणार

नव्या लिक्विड जेट्टीमुळे बंदराची क्षमता वार्षिक सुमारे 4 दशलक्ष टनाने वाढण्याचा नौवहन मंत्री मनसुख मांडविया यांना विश्वास

मुंबईमध्ये जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे आज अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टीचे केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. पेट्रोलियम तेल आणि वंगण, स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल, काकवी आणि रसायने यांसारख्या द्रवरुप मालाची वाढलेली वाहतूक हाताळण्याच्या उद्देशाने 309 कोटी खर्चाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. द्रवरुप मालाची ने-आण करणाऱ्या जहाजांना या ठिकाणी थांबता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे लक्षात घेऊन भारतातील बंदरांचा विकास करण्यात येत आहे आणि जागतिक पातळीवर सुरु असलेल्या कामकाजाला अनुरुप असे त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे असे मांडविया यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी प्रत्येक घरात गॅसची शेगडी पोहोचवण्याचा निर्धार केला असल्याने देशात एलपीजी सारख्या द्रवरुप मालाला स्थानिक आणि औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढत आहे. सध्या वार्षिक 6 दशलक्ष टन द्रवरुप मालाची हाताळणी करण्याची जवाहरलाल नेहरु बंदराची क्षमता आहे.  नव्या जेट्टीमुळे या क्षमतेत वार्षिक 4 दशलक्ष टनाने वाढ होईल असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय गरजांची पूर्तता अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि त्यामुळे बंदराला देखील त्याचा फायदा होईल असे नौवहन मंत्र्यांनी सांगितले.
त्यापूर्वी मांडविया यांनी सर्व टर्मिनल ऑपरेटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बंदर वापरकर्ते, सेवा पुरवठादार आणि जेएनपीटीचे अधिकारी यांची बैठक घेतली. नौवहन मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मांडविया यांची जवाहरलाल नेहरु बंदराची ही पहिली भेट होती. भूमीपूजन समारंभानंतर त्यांनी चौथ्या कंटेनर टर्मिनलला भेट दिली आणि जेएनपीटी, एसईझेड प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी उपस्थित होते.  





(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु- शेतकऱ्यांनी निवृत्ती योजनेसाठी नोंदणी करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांनी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी विविध राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय कृषी सचिव संजय अगरवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांना याची माहिती दिली आहे.http://164.100.117.97/WriteReadData/userfiles/image/image0013LX4.jpg

ही योजना ऐच्छिक असून 18 ते 40 या वयोगटातले शेतकरी तिचे सदस्य बनू शकतात. महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरल्यावर त्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर महिन्याला 3000 रुपयांचे निवृत्ती वेतन मिळणार आहे अशी माहिती तोमर यांनी दिली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

Mutual Fund in Marathi; घरी बसून म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...