चालू आर्थिक वर्षात 650 अब्ज डॉलर्स मूल्याच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे, असे मत, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख निर्यात प्रोत्साहन परिषदांची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्यापारी निर्यातीत, 400 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचे उद्दिष्ट नजरेच्या टप्प्यात आहे आणि सेवा क्षेत्रातील निर्यात 250 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही गोयल म्हणाले.
या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत,आपण वस्तू निर्यातीसाठी आणखी मोठे लक्ष्य ठेवू शकतो, असे गोयल यांनी सांगितले. “ओमायक्रॉनचे संकट असतांनाही, केवळ डिसेंबर महिन्यांत, देशाची वस्तू निर्यात, 37 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचली होती. या महिन्यांत, केवळ 15 दिवसांत, म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत आपण 16 अब्ज डॉलर्सपर्यंत निर्यात नोंदवली आहे.” असे गोयल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच,आपल्याला, “टप्प्याटप्प्याने होणारी वाढ’ नाही तर ‘आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे परिणाम’ असा वेग अपेक्षित आहे, असे सांगितल्याचे गोयल म्हणाले.
केंद्र सरकारने उद्योगसुलभतेसाठी राबवलेल्या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांनी, ईपीसी आणि उद्योजकांना केले आहे. यात, राष्ट्रीय एक खिडकी व्यवस्थेमार्फत सर्व मंजुऱ्या मिळवण्याच्या व्यवस्थेचा, त्यांनी उल्लेख केला.
लोकांच्या जीवनमनात सुधारणा करण्याविषयीच्या आणि व्यवसाय सुलभतेबाबत केंद्र सरकारच्या प्रयत्नांविषयी बोलतांना, गोयल यांनी सांगितले की सरकारने 25,000 अनुपालन कमी केले आहे.
केंद्र सरकार नव्या कल्पना ऐकण्यास उत्सुक आहे, तसेच उद्योग क्षेत्राला प्रत्येक टप्प्यावर, सुविधा देण्यास आणि भागीदारी करण्यासही तत्पर आहे, असेही ते म्हणाले.
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण
No comments:
Post a Comment