खतांवरील अनुदानाच्या रकमेत घट करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी राज्यसभेत दिले. युरियासाठी पोषक मुल्यांवर आधारीत अनुदानाचे दर निश्चित करण्याचाही प्रस्ताव नसून, त्यामुळे युरियाच्या किंमती विनियंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोटॅश आणि फॉस्फेटिक खतांसाठी सरकार 2010 पासूनच पोषणमुल्यावर आधारीत अनुदान योजना राबवत आहे. यासाठी सरकारने विविध पोषणमुल्यांच्या आधारे अनुदानाच्या किंमती निश्चित केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना सरकारकडून निश्चित किंमतीला युरिया पुरवठा केला जातो. सध्या युरियाची 45 किलोग्रॅमची पिशवी 242 रुपये किंमतीला, तर 50 किलोग्रॅमची पिशवी 268 रुपये किंमतीला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
(साभार-pib.nic.in)
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण
No comments:
Post a Comment