केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व सहावी बैठक घेत आगामी अर्थसंकल्प 2019-20 संदर्भात आघाडीच्या अर्थतज्ञांशी चर्चा केली.
आर्थिक विकासाला चालना, रोजगाराभिमुख विकास, वित्तीय व्यवस्थापन, गुंतवणुकीत वाढ या मुद्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, वित्त सचिव सुभाष गर्ग, महसूल सचिव अजयभूषण पांडे यांच्यासह वित्त मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘मेक इन इंडिया’द्वारे उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे मत अर्थतज्ञांनी यावेळी व्यक्त केले. कृषी क्षेत्रासाठी एक्झीम धोरण, वस्त्रोद्योगावरचे विशिष्ट कर हटवणे, कौशल्यावर लक्ष केंद्रीत करत रोजगाराला चालना, दीर्घकालीन विकासासाठी संरचनात्मक सुधारणा, करविषयक दरांबाबत स्थैर्य, वस्तू आणि सेवाकरांचे अधिक सुलभीकरण याबाबतही अर्थतज्ञांनी सूचना केल्या.
(साभार-pib.nic.in)
No comments:
Post a Comment