Saturday, 15 June 2019

सामाजिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी केंद्रीय वित्तमंत्र्यांची संकल्पपूर्व चर्चा

केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारमन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व पाचवी बैठक घेत सामाजिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवांमधली सार्वजनिक गुंतवणूक ही जनतेच्या जीवनमानाच्या दर्जाचे महत्वाचे द्योतक असते. सर्वसमावेशक विकासासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणे, युवकांना कौशल्य प्रदान करणे, नोकरीच्या अधिक संधी प्राप्त करून देणे, आजार कमी करणे, महिला सबलीकरण आणि मानव विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे निर्मला सितारमन यांनी यावेळी सांगितले.
प्राथमिक आरोग्य, आयुष आणि आयुर्वेद यासह आरोग्य, शिक्षण (शालेय विद्यापीठ), सामाजिक संरक्षण (वृद्ध, महिला आणि बालके, इतर मागासवर्गीय आणि युवक) निवृत्तीवेतन, मानव विकास यासारख्या मुद्यांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.
विशेषत: ग्रामीण महिलांसाठी शिक्षण आणि आरोग्य महिला सुरक्षितता बळकट करण्यासाठी सुरक्षाविषयक त्रुटी शोधण्यासाठी शहरांचे अंकेक्षण, गरोदर स्त्रिया आणि बालकांच्या पोषणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवणे, सर्व जिल्ह्यात महिलांसाठीची वन स्टॉप केंद्रे पूर्णत: कार्यान्वित करणे, पायाभूत आरोग्यसुविधांचा विस्तार, वैद्यकीय उपकरणांवरच्या करांचे सुसूत्रीकरण, हागणदारीमुक्त पंचायत या धर्तीवर कुपोषणमुक्त पंचायत जाहीर करावी अशा विस्तृत आणि व्यापक सूचना संबंधितांनी केल्या.
 (साभार-pib.nic.in)

No comments:

Post a Comment

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...