Monday, 24 June 2019

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या

एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते.  योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच योजनेची चौकशी, तक्रारी आणि सूचनांसाठी 18002666696 हा टोल फ्री नंबर आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. योजनेंतर्गत महाराष्ट्रात 19 जून 2019 पर्यंत 40,86,878 जोडण्या देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक जोडण्या उत्तरप्रदेश 1,30,81,084, बिहार 79,29,510, तर मध्य प्रदेश 64,70,761 जोडण्या देण्यात आल्या.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण

जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण-2018, 8 जून 2018 रोजी अधिसूचित करण्यात आले आहे. धोरणांतर्गत मानवी सेवनास अयोग्य असलेल्या वाया गेलेल्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे.
यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी इथेनॉलची उपलब्धता वाढेल. इथेनॉल पुरवठा वर्ष 2017-18 मध्ये 150.5 कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात आले. यामुळे 5070 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याचे प्रमाण 29.94 लाख टनांवर आले.
संपूर्ण देशात बीएस-व्ही आय दर्जाचे इंधन 1 एप्रिल 2020 पासून वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

एलपीजी पोर्टेबिलिटी पर्याय

एलपीजी जोडण्यांच्या हस्तांतरणासाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय देशात 2013 पासून सुरु करण्यात आला.
तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त अहवालानुसार योजना सुरु झाल्यापासून 18 जून 2019 पर्यंत 4.2 लाखहून अधिक ग्राहकांनी पोर्टेबिलिटी योजनेंतर्गत ऑनलाईन पसंतीच्या / सोयीच्या वितरकाकडे जोडणी हस्तांतरणाचा पर्याय निवडला आहे. दि. 18 जून 2019 पर्यंत 4.2 लक्ष ग्राहकांनी हा पर्याय निवडला.
पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांच्या संख्येत वाढ करण्यासाठी धोरण निश्चिती

लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांच्या संख्येत देशात शाश्वत वाढ व्हावी, यासाठी लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाने ठोस योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, यासाठी मंत्रालय कर्जाची सोय, तंत्रज्ञान विकास आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देणार असून, यामुळे या उद्योगाला चालना मिळेल.  याअंतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, यामध्ये 12074 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, तर पीएमइजीपीला 2247.10 कोटी रुपये आवंटीत करण्यात आले आहे.
स्फुर्ती अर्थात पारंपरिक उद्योगांच्या पुर्ननिर्मितीसाठी निधी योजना. यामध्ये वर्ष 2018-19 दरम्यान 143.15 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पारंपरिक कलाकारांना देण्यात येईल.
नुतनीकरण, ग्रामीण उद्योग आणि उद्यमशिलता संवर्धन योजना तसेच भागभांडवल अनुदान योजना, सुक्ष्म आणि लघु उद्योग विकास कार्यक्रमांचाही यात समावेश आहे.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन परवाना

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरुपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरुप आणि वाहन परवान्यांचे आरेखन मंत्रालयाने विहित केले आहे. एनआयसीने विकसित केलेल्या सारथी SARATHI ॲप्लिकेशन सर्व वाहनचालक परवानाधारकांची माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रीय नोंदवहीत जवळपास 15 कोटी वाहन परवान्यांची नोंद उपलब्ध आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Friday, 21 June 2019

खतांवरील अनुदानाच्या रकमेत घट करण्याचा आणि युरियासाठी पोषक मुल्यांवर आधारीत अनुदान दर ठेवण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही – डी. व्ही. सदानंद गौडा

खतांवरील अनुदानाच्या रकमेत घट करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी राज्यसभेत दिले. युरियासाठी पोषक मुल्यांवर आधारीत अनुदानाचे दर निश्चित करण्याचाही प्रस्ताव नसून, त्यामुळे युरियाच्या किंमती विनियंत्रित करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोटॅश आणि फॉस्फेटिक खतांसाठी सरकार 2010 पासूनच पोषणमुल्यावर आधारीत अनुदान योजना राबवत आहे. यासाठी सरकारने विविध पोषणमुल्यांच्या आधारे अनुदानाच्या किंमती निश्चित केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना सरकारकडून निश्चित किंमतीला युरिया पुरवठा केला जातो. सध्या युरियाची 45 किलोग्रॅमची पिशवी 242 रुपये किंमतीला, तर 50 किलोग्रॅमची पिशवी 268 रुपये किंमतीला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

ज़ीरो बैलेंस बैंक खाताधारकांना RBI कडून मोठी भेट #Zero Balance #BSBD

Saturday, 15 June 2019

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक

मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली.
मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला.
खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला नाही. अखाद्य गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.9 टक्के वाढ झाली.
खनिज गटाच्या निर्देशांकात 4.2 टक्के घट झाली. तर इंधन आणि ऊर्जा या महत्त्वाच्या गटाच्या निर्देशांकात 0.6 टक्के वाढ झाली. उत्पादित वस्तू गटाच्या निर्देशांकात 0.1 टक्के वृद्धी झाली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

केंद्रीय वित्तमंत्र्यांची अर्थतज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व सहावी बैठक घेत आगामी अर्थसंकल्प 2019-20 संदर्भात आघाडीच्या अर्थतज्ञांशी चर्चा केली.
आर्थिक विकासाला चालना, रोजगाराभिमुख विकास, वित्तीय व्यवस्थापन, गुंतवणुकीत वाढ या मुद्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, वित्त सचिव सुभाष गर्ग, महसूल सचिव अजयभूषण पांडे यांच्यासह वित्त मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘मेक इन इंडिया’द्वारे उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे मत अर्थतज्ञांनी यावेळी व्यक्त केले. कृषी क्षेत्रासाठी एक्झीम धोरण, वस्त्रोद्योगावरचे विशिष्ट कर हटवणे, कौशल्यावर लक्ष केंद्रीत करत रोजगाराला चालना, दीर्घकालीन विकासासाठी संरचनात्मक सुधारणा, करविषयक दरांबाबत स्थैर्य, वस्तू आणि सेवाकरांचे अधिक सुलभीकरण याबाबतही अर्थतज्ञांनी सूचना केल्या.
(साभार-pib.nic.in)

सामाजिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी केंद्रीय वित्तमंत्र्यांची संकल्पपूर्व चर्चा

केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारमन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व पाचवी बैठक घेत सामाजिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवांमधली सार्वजनिक गुंतवणूक ही जनतेच्या जीवनमानाच्या दर्जाचे महत्वाचे द्योतक असते. सर्वसमावेशक विकासासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणे, युवकांना कौशल्य प्रदान करणे, नोकरीच्या अधिक संधी प्राप्त करून देणे, आजार कमी करणे, महिला सबलीकरण आणि मानव विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे निर्मला सितारमन यांनी यावेळी सांगितले.
प्राथमिक आरोग्य, आयुष आणि आयुर्वेद यासह आरोग्य, शिक्षण (शालेय विद्यापीठ), सामाजिक संरक्षण (वृद्ध, महिला आणि बालके, इतर मागासवर्गीय आणि युवक) निवृत्तीवेतन, मानव विकास यासारख्या मुद्यांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.
विशेषत: ग्रामीण महिलांसाठी शिक्षण आणि आरोग्य महिला सुरक्षितता बळकट करण्यासाठी सुरक्षाविषयक त्रुटी शोधण्यासाठी शहरांचे अंकेक्षण, गरोदर स्त्रिया आणि बालकांच्या पोषणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवणे, सर्व जिल्ह्यात महिलांसाठीची वन स्टॉप केंद्रे पूर्णत: कार्यान्वित करणे, पायाभूत आरोग्यसुविधांचा विस्तार, वैद्यकीय उपकरणांवरच्या करांचे सुसूत्रीकरण, हागणदारीमुक्त पंचायत या धर्तीवर कुपोषणमुक्त पंचायत जाहीर करावी अशा विस्तृत आणि व्यापक सूचना संबंधितांनी केल्या.
 (साभार-pib.nic.in)

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...