केंद्रीय अर्थसंकल्प तयारी अंतिम टप्प्यात असून सध्या सुरू असलेली महामारी आणि आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन अर्थसंकल्प आखणीत सहभागी मुख्य कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी थांबवण्यासाठी ("लॉक-इन" ) हलवा समारंभाऐवजी मिठाई देण्यात आली
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संसदेत सादर झाल्यानंतर मोबाईल ॲप वर उपलब्ध होणार
“केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲप ” द्वारे सर्व हितधारकांना केंद्रीय अर्थसंकल्प संबंधी माहिती सहज आणि जलद उपलब्ध होणार
मोबाइल ॲप द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) असून ते Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे
केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in)वरून मोबाइल ॲप डाउनलोड करता येईल
अर्थसंकल्प संबंधी सर्व दस्तऐवज केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टलवर डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध असतील
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 वर्षासाठी कागदरहित (पेपरलेस) स्वरूपात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात असून सध्याची महामारीची स्थितीआणि आरोग्य सुरक्षा विषयक नियम लक्षात घेऊन अर्थसंकल्प आखणीत सहभागी मुख्य कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी थांबवण्यासाठी ("लॉक-इन" ) हलवा समारंभाऐवजी मिठाई देण्यात आली.
अर्थसंकल्पाबाबत गुप्तता राखण्यासाठी, अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकाऱ्यांना “लॉक इन” केले जाते. नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या बजेट प्रेसमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना थांबवण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच हे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकतात.
2021-22 वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात आलाहोता. संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य जनतेला अर्थसंकल्प दस्तावेज सुलभरीत्या उपलब्ध व्हावा यासाठी “युनियन बजेट मोबाईल ॲप " देखील सुरू करण्यातआले. 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरकेंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध होईल.
अर्थसंकल्पीय भाषण, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदान मागण्या (DG), वित्त विधेयक इत्यादींचा समावेश असलेले 14 केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज मोबाइल ॲप मध्ये उपलब्ध आहेत. मोबाइल ॲप दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि ते अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
हे अॅप केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील डाउनलोड करता येईल. सामान्य लोकांसाठी अर्थसंकल्पीय दस्तावेज केंद्रीय बजेट वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण