Friday 24 September 2021

वाहन उद्योग आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या उत्पादनांना उत्पादन-संलग्न-सवलत - PLI योजना लागू करण्याची केंद्र सरकारची अधिसूचना जारी

वाहननिर्मिती उद्योगासाठीच्या पीएलआय योजनेमुळे देशात अतिरिक्त साडे सात लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा

वाहननिर्मिती क्षेत्रासाठीच्या पीएलआय योजनेमुळे येत्या पाच वर्षात या क्षेत्रात, 42,500  कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2.3 लाख कोटी रुपयांहून जास्त वाढीव उत्पादनाची अपेक्षा

केंद्र सरकारची उत्पादन-संलग्न-सवलत म्हणजेच पीएलआय योजनावाहनउद्योग आणि वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणाऱ्या व्यवसायांनाही लागू करण्याच्या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. काल म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी ही अधिसूचना काढण्यात आली आहे. केंद्र सरकारने 15 सप्टेंबर रोजी वाहन उद्योगांना या योजनेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

वाहन उद्योग क्षेत्रासाठीच्या पीएलआय योजनेमुळेया क्षेत्रातील उत्पादकांना भेडसावणाऱ्या खर्चाच्या समस्या दूर होऊनभारतात अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाने युक्त अशी उत्पादने (वाहने) निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यावर मिळणाऱ्या सवलतींमुळे अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाने युक्त  उत्पादनांच्या भारतीय जागतिक पुरवठा साखळीतनवी गुंतवणूक करण्याची प्रेरणाया उद्योगक्षेत्राला मिळेल. त्यामुळेयेत्या पाच वर्षातया योजनेमुळे या क्षेत्रात, 42,500कोटी रुपयांची नवी गुंतवणूक येण्याची अपेक्षा असून, 2.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त  वाढीव उत्पादनही अपेक्षित आहे. तसेचयातून उद्योगात, 7.5 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होतील. एवढेच नाहीतर यामुळे जागतिक वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा वाटाही वाढणार आहे.

वाहन उद्योग क्षेत्रासाठीची पीएलआय योजनासध्याच्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठीही खुली असेल. तसेचनव्या नॉन- ऑटोमोटिव्ह गुंतवणूकदार कंपन्यांसाठीही (ज्या सध्या वाहनउद्योगात  किंवा वाहनांच्या सुट्या भागांच्या उत्पादनक्षेत्रात नाहीत) ती लागू असेल.  या योजनेचे दोन मुख्य घटक आहेतते म्हणजे- चॅम्पियन ओईम सवलत योजना आणि कंपोनंट चॅम्पियन सवलत योजना.

वाहन उद्योग आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या व्यवसायांसाठीची ही योजनावर्ष 2022-2023 पासून पुढची पाच वर्षे लागू असेल. 

ही योजना आणि योजनेसाठीची मार्गदर्शक तत्वेभारत सरकारच्या , 23 सप्टेंबर 2021 रोजीच्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आली आहे. अवजड उद्योग मंत्रालयाचे संकेतस्थळ (https://dhi.nic.inSchmes/ Programs Production Linked Incentive scheme) वरही ही अधिसूचना उपलब्ध आहे.

(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



No comments:

Post a Comment

Mutual Fund in Marathi; घरी बसून म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...