आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 74% वाढीची नोंद
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 22 सप्टेंबर 2021 पर्यंत उपलब्ध झालेल्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, या वर्षात निव्वळ कर संकलन 5,70,568कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी हे संकलन 3,27,174 कोटी रुपये इतके होते. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात कर संकलनात, 74.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 22 सप्टेंबरपर्यंत झालेल्या संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% ची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये हे संकलन, 4,48,976 कोटी इतके होते.
5,70,568 कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 3,02,975 कोटी रुपये कॉर्पोरेट कर (परताव्या व्यतिरिक्त) तसेच 2,67,593 कोटी रुपये, करदात्यांचा वैयक्तिक कर, ज्यात सुरक्षा व्यवहार कर- STT (परतावे वगळता) याचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 साठीचे सकल प्रत्यक्ष कर संकलन (परतावे देण्यापूर्वीचे) 6,45,679 कोटी इतके आहे. गेल्या वर्षी ते 4,39,242 कोटी रुपये इतके होते. आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत या कर संकलनात, 47% ची वाढ नोंदली गेली आहे तर सकल प्रत्यक्ष संकलनात 16.75 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. 2019-20 मध्ये हे संकलन 5,53,063 कोटी रुपये इतके होते.
6,45,679 कोटी रुपयांच्या सकल किंवा ढोबळ प्रत्यक्ष कर संकलनात, 3,58,806 कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि 2,86,873 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तीकर कर, ज्यात 2,86,873 कोटी रुपयांच्या सुरक्षा व्यवहार करांचाही समावेश आहे. सविस्तर विभागणीनुसार, अग्रीम कर 2,53,353 कोटी, स्त्रोताच्या ठिकाणीच कापण्यात आलेल्या कराची रक्कम, 3,19,239 कोटी रुपये, स्वयंमूल्यांकन कर, 41,739 कोटी रुपये, नियमित मूल्यांकन कर, 25,558 कोटी रुपये, लाभांश वितरण कर 4,406 कोटी आणि इतर संकीर्ण कर 1383कोटी रुपये इतके आहेत.
आर्थिक वर्ष 2021-22, च्या सुरुवातीच्या काळात अनेक आव्हाने असली तरीही, आर्थिक वर्ष दुसऱ्या तिमाहीत (1 जुलै, 2021 ते 22 सप्टेंबर )अग्रीम कर संकलन 1,72,071कोरी रुपये इतके होते, ज्यात, गेल्या वर्षीच्या तुलनेत, 51.50 टक्क्यांची वाढ नोंदली गेली.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील एकत्रित अग्रीम कर, 2,53,353 कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा कर, 1,62,037 कोटी रुपये होता. म्हणजेच यंदा अग्रीम कर संकलनात अंदाजे 56% ची वाढ झाली आहे. तसेच, एकत्रित अग्रीम कर संकलन यंदा 22 सप्टेंबरपर्यंत 2,53,353 इतके झाले असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.62% वाढ झाली आहे.
आतापर्यंत, आर्थिक वर्ष 2021-22 साठी 75,111 कोटी रुपयांचे परतावे देण्यात आले आहेत.
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण