Friday, 1 April 2022

मार्च महिन्यात 1,42,095 कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलित

 

जानेवारी 2022 मध्ये संकलित 1,40,986 कोटी रुपयांचा पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन

मार्च महिन्यात 1,42,095 कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलित

 

मार्च 2022 मध्ये एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन 1,42,095 कोटी रुपये आहे ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,830 कोटी रुपयेएसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,378 कोटी रुपयेआयजीएसटी अर्थात एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 74,470 कोटी रुपये ( माल आयातीवर संकलित झालेल्या 39,131 कोटी रुपयांसह) आणि उपकर महसूल 9,417 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 981 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये संकलित 1,40,986 कोटी रुपयांचा पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन झाले आहे.

सरकारने नियमित समझोत्याच्या स्वरूपात  म्हणून आयजीएसटीमधून सीजीएसटीला 29,816 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 25,032 कोटी रुपये चुकते केले आहेत. याशिवाय केंद्राने या महिन्यात आयजीएसटीचे 20,000 कोटी रुपये  केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 50:50 च्या प्रमाणात तात्पुरत्या आधारावर  चुकते केले आहेत. नियमित आणि तात्पुरत्या समझोत्यानंतर मार्च 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 65646 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 67410 कोटी रुपये आहे. केंद्राने मार्च 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 18,252 कोटी रुपये जीएसटी भरपाईही जारी केली.

मार्च 2022 मध्ये संकलित महसूल  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% आणि मार्च 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 46% अधिक आहे. या महिन्यातमालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 25% अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 11% अधिक आहे. फेब्रुवारी महिन्याचे दिवस कमी असूनही फेब्रुवारी 2022  या महिन्यात बनवलेल्या इ वे बिलांची संख्या जानेवारी 2022 (6.88 कोटी) च्या तुलनेत जास्त म्हणजे 6.91 कोटी आहे जी व्यावसायिक उलाढाली जलद गतीने सावरण्याचे द्योतक आहे.

पहिल्यादुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे ₹1.10 लाख कोटी, ₹1.15 लाख कोटी आणि 1.30 लाख कोटीं रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक एकूण जीएसटी संकलन 1.38 लाख कोटी रुपये आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासह करचोरीविरोधी कारवाई विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर कारवाई या बाबी  वाढलेल्या जीएसटी संकलनात योगदान देत आहेत. पर्यस्त शुल्क रचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने  केलेल्या विविध दर तर्कसंगत उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दर्शविला आहे. मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी ची राज्यवार आकडेवारी तक्त्यात दिली आहे.

State-wise growth of GST Revenues during March 2022[1]

 

State

Mar-21

Mar-22

Growth

1

Jammu and Kashmir

352

368

5%

2

Himachal Pradesh

687

684

0%

3

Punjab

1,362

1,572

15%

4

Chandigarh

165

184

11%

5

Uttarakhand

1,304

1,255

-4%

6

Haryana

5,710

6,654

17%

7

Delhi

3,926

4,112

5%

8

Rajasthan

3,352

3,587

7%

9

Uttar Pradesh

6,265

6,620

6%

10

Bihar

1,196

1,348

13%

11

Sikkim

214

230

8%

12

Arunachal Pradesh

92

105

14%

13

Nagaland

45

43

-6%

14

Manipur

50

60

18%

15

Mizoram

35

37

5%

16

Tripura

88

82

-7%

17

Meghalaya

152

181

19%

18

Assam

1,005

1,115

11%

19

West Bengal

4,387

4,472

2%

20

Jharkhand

2,416

2,550

6%

21

Odisha

3,285

4,125

26%

22

Chhattisgarh

2,544

2,720

7%

23

Madhya Pradesh

2,728

2,935

8%

24

Gujarat

8,197

9,158

12%

25

Daman and Diu

3

0

-92%

26

Dadra and Nagar Haveli

288

284

-2%

27

Maharashtra

17,038

20,305

19%

29

Karnataka

7,915

8,750

11%

30

Goa

344

386

12%

31

Lakshadweep

2

2

36%

32

Kerala

1,828

2,089

14%

33

Tamil Nadu

7,579

8,023

6%

34

Puducherry

161

163

1%

35

Andaman and Nicobar Islands

26

27

5%

36

Telangana

4,166

4,242

2%

37

Andhra Pradesh

2,685

3,174

18%

38

Ladakh

14

23

72%

97

Other Territory

122

149

22%

99

Centre Jurisdiction

141

170

20%

 

Total

91,870

1,01,983

11%

 


[1] Does not include GST on import of goods


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Tuesday, 1 February 2022

करदाते दोन वर्षांच्या आत सुधारित प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करू शकतात

दिव्यांगांना कर सवलत

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात नियोक्त्याच्या योगदानावरील कर कपातीची मर्यादा 10% वरून 14% पर्यंत वाढवण्यात आली

व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल

करदात्यांना सामोरे जावे लागणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नवीन उपाययोजना

Posted On: 01 FEB 2022 2:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022

करदात्यांना संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांच्या आत भरलेल्या अतिरिक्त करासंबंधी सुधारित विवरणपत्र  दाखल करण्याची अनुमती देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहेअशी घोषणा केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केली. यामुळे करदात्यांना कर भरण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज घेताना झालेली एखादी  चूक  सुधारण्याची संधी मिळेल असे त्यांनी सांगितले.  सध्या जर प्राप्तिकर विभागाला असे आढळून आले की करदात्याकडून काही उत्पन्न वगळले गेले  आहेतर त्यांना अधिकृत  निर्णयाच्या दीर्घ प्रक्रियेतून जावे लागते मात्र नवीन प्रस्तावात करदात्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले . त्या म्हणाल्या  ऐच्छिक कर अनुपालनाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे.

दिव्यांगांना  कर सवलत

कायद्यानुसार  सध्या  पालक  दिव्यांग व्यक्तीसाठी विमा योजना घेतात तेव्हा त्यांच्या  मृत्यूनंतर दिव्यांग व्यक्तीला एकरकमी  किंवा ऍन्युइटी स्वरूपात विम्याची रक्कम मिळणार असेल तरच त्यांच्यासाठी  वजावटीची तरतूद आहे.   मात्र अशीही परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा दिव्यांगांना  त्यांच्या पालकांच्या हयातीतही एकरकमी  किंवा ऍन्युइटी  रकमेची गरज भासू शकतेयाकडे लक्ष वेधून सीतारामन यांनी घोषित केले  की,पालकांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली असली तर पालकांच्या हयातीत,दिव्यांग  व्यक्तींना एकरकमी  किंवा ऍन्युइटी रक्कम दिली जावी असा सरकारचा प्रस्ताव आहे.

कर प्रस्ताव

राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये  समानता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे  सामाजिक सुरक्षा फायदे वाढवण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने लाभ मिळावेत यासाठी  सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात नियोक्त्याने केलेल्या  योगदानावरील कर कपातीची मर्यादा 10 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

आभासी डिजिटल मालमत्तेवर कर आकारण्यासाठी योजना

व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या  व्यवहारांचे प्रमाण आणि वारंवारता मोठ्या प्रमाणावर  वाढली आहेअसे सांगूनसीतारामन यांनी घोषणा केली की कोणत्याही आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जाईल. त्या म्हणाल्या  कीही योजना अधिग्रहण  खर्च वगळता अशा उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही खर्चात  किंवा भत्त्यात  कोणतीही सवलत  देणार नाही.  व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणामुळे होणारे नुकसान इतर कोणत्याही उत्पन्नातून कमी करता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या  की व्यवहाराचे तपशील मिळवण्यासाठी सरकार व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या संदर्भात केलेल्या देयकावर  1 टक्के दराने टीडीएस  प्रदान करण्याची तरतूद करेल. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या  भेटीवर देखील  कर लावण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाईचे व्यवस्थापन

सीतारामन यांनी नमूद केले की "समान  समस्यांचा समावेश असलेल्या याचिका  दाखल करण्यात बराच वेळ आणि संसाधने खर्च होतात". सरकारचे योग्य कारवाई  व्यवस्थापनाचे धोरण पुढे नेण्यासाठी आणि करदाते आणि विभाग यांच्यातील वारंवार दाखल केल्या जाणाऱ्या याचिकांची प्रमाण कमी  करण्यासाठीसरकार  तरतूद करेल की जर करदात्याच्या बाबतीत कायद्याचा प्रश्न प्रलंबित असलेल्या कायद्याच्या प्रश्नासारखा असेलतर अधिकारक्षेत्रातील उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईपर्यंत अन्य याचिका दाखल करणे पुढे ढकलले जाईल.

कर प्रस्ताव 

अर्थमंत्र्यांनी देशातील करदात्यांचेही आभार मानले. ज्यांनी  मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे आणि गरजेच्या वेळी आपल्या देशबांधवांना मदत करण्यासाठी सरकारचे हात अधिक बळकट केले आहेत.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



रिझर्व बँक वर्ष 2022-23 पासून डिजिटल रुपी जारी करणार



पायाभूत सुविधांच्या सुसंवादी सूचीमध्ये डेटा केंद्रे आणि ऊर्जा संचयन प्रणाली समाविष्ट करणार

व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ समिती

गेल्या वर्षी व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटीद्वारे 5.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

महत्त्वाच्या उदयोन्मुख क्षेत्रांना चालना देण्यासाठी खासगी निधी व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केलेल्या थीमॅटिक फंडातून मिश्रित वित्त

प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता वाढवण्यासाठी बहु-पक्षीय संस्थांकडून तांत्रिक आणि ज्ञान सहाय्य


केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीनिर्मला सीतारामन यांनी 2022-23 पासून ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून रिझर्व बँकेकडून डिजिटल रुपी जारी करण्याचा प्रस्ताव दिला. वर्ष 2022-23 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतानाआज संसदेतत्यांनी स्पष्ट केले की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) सुरू केल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. "डिजिटल चलनामुळे अधिक कार्यक्षम आणि स्वस्त चलन व्यवस्थापन प्रणाली देखील निर्माण होईल"त्या म्हणाल्या.

देशात गुंतवणूक आणि पत उपलब्धता वाढवण्यासाठी इतर विविध उपक्रम त्यांनी सुचवले.

पायाभूत सुविधांची स्थिती

श्रीमती. सीतारामन यांनी प्रस्तावित केले की डेटा सेंटर्स आणि एनर्जी स्टोरेज सिस्टम्ससह अधिक चार्जिंग पायाभूत सुविधा आणि ग्रिड-स्केल बॅटरी सिस्टमचा पायाभूत सुविधांच्या सुसंवादी सूचीमध्ये समावेश केला जाईल. "यामुळे डिजिटल पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जा संचयनासाठी पत उपलब्धता सुलभ होईल"त्या म्हणाल्या.

व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूक

अर्थमंत्र्यांनी व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी परीक्षण आणि योग्य उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटीद्वारे गत वर्षी ने 5.5 लाख कोटी रु. पेक्षा जास्त गुंतवणूक झाल्याने त्याद्वारे सर्वात मोठ्या स्टार्ट-अप आणि विकास परिसंस्थेपैकी एक सुकर झाल्याचे त्यांनी नमूद केले. "ही गुंतवणूक वाढवण्यासाठी नियामक आणि इतर घटकांची समग्र तपासणी आवश्यक आहे"त्यांनी सांगितले.

संमिश्र वित्तपुरवठा

श्रीमती. सीतारामन म्हणाल्या की सरकार समर्थित फंड्स NIIF आणि SIDBI फंड ऑफ फंड्सने भांडवल रचना उपलब्ध करून गुणक प्रभाव निर्माण केला आहे. त्या म्हणाल्या की क्लायमेट अॅक्शनडीप-टेकडिजिटल इकॉनॉमीफार्मा आणि अॅग्री-टेक यासारख्या महत्त्वाच्या उदयोन्मुख क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मिश्रित वित्तासाठी थीमॅटिक फंडांना प्रोत्साहन देईल आणि सरकारी हिस्सा 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल आणि खासगी निधी व्यवस्थापकांद्वारे निधी व्यवस्थापित केला जाईल.

पायाभूत सुविधा प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता

अर्थमंत्र्यांनी सांगितले कीपायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीबहु-पक्षीय संस्थांच्या तांत्रिक आणि ज्ञानाच्या सहाय्याने पीपीपीसह प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्या पुढे म्हणाल्या कीआर्थिक व्यवहार्यता वृद्धी ही जागतिक सर्वोत्तम पद्धतीवित्तपुरवठ्याचे नाविन्यपूर्ण मार्ग आणि संतुलित जोखीम स्वीकारून देखील प्राप्त केली जाईल. "सार्वजनिक गुंतवणुकीच्या वाढीसाठी खासगी भांडवल लक्षणीय प्रमाणात पूरक असणे आवश्यक आहे"त्यांनी सांगितले.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



आपत्कालीन कर्ज हमी योजनेला मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ

 

आदरातिथ्य आणि संबंधित उपक्रमांना सहाय्य पुरवण्यासाठी हमी संरक्षण 50,000 कोटी रुपयांनी वाढवले जाईल

सूक्ष्म आणि लघु उद्योग योजनांसाठी सुधारित कर्ज हमी ट्रस्ट द्वारे एमएसएमईसाठी 2 लाख कोटींचे अतिरिक्त कर्ज

सरकार 6,000 कोटी रुपये खर्चासह “रेझिंग अँड एक्सिलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स ” (आरएएमपी) सुरु करेल

उद्यम, ई-श्रम, एनसीएस आणि असीम पोर्टल्सची व्याप्ती वाढवण्यासाठी ते एकमेकांना जोडले जातील


आपत्कालीन कर्ज हमी  योजनेला मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली  जाईल आणि तिचे हमी संरक्षण 50,000 कोटी रुपयांनी वाढवले जाईल.  आता एकूण संरक्षण  5 लाख कोटीं रुपये असे अशी  घोषणा केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केली.  अतिरिक्त रक्कम केवळ आदरातिथ्य आणि संबंधित उद्योगांसाठी राखून ठेवण्यात आली  आहे. अर्थमंत्र्यांनी नमूद केले की आपत्कालीन कर्ज हमी  योजनेने 130 लाखांहून अधिक एमएसएमईंना  आवश्यक अतिरिक्त कर्ज पुरवले आहे. यामुळे त्यांना महामारीच्या प्रतिकूल परिणामांचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आहे. आदरातिथ्य आणि संबंधित सेवा, विशेषत: सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या, त्यांनि  व्यवसायाची महामारीपूर्वीची पातळी अद्याप गाठलेली  नाही हे लक्षात घेऊन हा प्रस्ताव मांडण्यात  आला आहे. अर्थमंत्र्यांनी एमएसएमई क्षेत्राशी संबंधित इतर अनेक प्रस्तावही मांडले.

7. Accelerating Growth of MSME.jpg

“रेझिंग अँड  एक्सिलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स ”   (RAMP)

अर्थमंत्र्यांनी 5 वर्षात 6,000 कोटी रुपये खर्चासह  “रेझिंग अँड  एक्सिलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स ” (RAMP) कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली.  यामुळे एमएसएमई क्षेत्र अधिक लवचिक, स्पर्धात्मक आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल.

उद्यम, ई-श्रम, एनसीएस आणि असीम  पोर्टल्स  एकमेकांशी जोडली जाणार 

उद्यम, ई-श्रम, एनसीएस आणि असीम  पोर्टल्स   एकमेकांशी जोडण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी मांडला. त्यांची व्याप्ती वाढवली जाईल. ते आता थेट, ऑरगॅनिक डेटाबेससह G2C, B2C आणि B2B सेवा पुरवणारे  पोर्टल म्हणून कार्य करतील. या सेवा अर्थव्यवस्थेला आणखी औपचारिक करण्यासाठी आणि सर्वांसाठी उद्यमशीलतेच्या  संधी वाढवण्याच्या उद्देशाने कर्ज  सुविधा, कौशल्य आणि भर्तीशी संबंधित असतील.

सीमाशुल्क तर्कसंगत बनवणे

विविध शुल्क  तर्कसंगत  करताना , अर्थमंत्र्यांनी छत्रीवरील शुल्क 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.  छत्र्यांच्या सुट्या  भागांना दिलेली सूट रद्द करण्यात आली आहे.  कृषी क्षेत्राच्या भारतात उत्पादित होणाऱ्या अवजारे आणि साधनांवरची  सूट तर्कसंगत केली आहे. एमएसएमई दुय्यम पोलाद उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गेल्या वर्षी स्टील स्क्रॅपला दिलेली सीमाशुल्क सवलत आणखी एका वर्षासाठी वाढवली आहे. स्टेनलेस स्टील आणि कोटेड स्टीलच्या उत्पादनांवरील तसेच मिश्र धातुच्या स्टीलचे बार आणि हाय-स्पीड स्टील वरील विशिष्ट अँटी-डंपिंग आणि सीव्हीडी, धातूंच्या वाढत्या  किंमती लक्षात घेऊन व्यापक जनहितासाठी रद्द केले जात आहेत.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Monday, 31 January 2022

जानेवारी 2022 मध्ये 1,38,394 कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलन

 

जीएसटी संकलनाने चौथ्यांदा 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

जानेवारी 2022 चा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% आणि जानेवारी 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 25% अधिक


जानेवारी 2022 मध्ये 31.01.2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,38,394 कोटी रुपये महसूल संकलित झाला. यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 24,674 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,016 कोटी रुपये, आयजीएसटी अर्थात एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 72,030 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित  झालेल्या 35,181 कोटी रुपयांसह) आणि उपकर 9,674 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित  झालेल्या 517कोटी रुपये) यांचा समावेश आहे.  एप्रिल 2021 मध्ये झालेले 1,39,708 कोटी रुपये जीएसटी संकलन हे आतापर्यतचे सर्वाधिक मासिक जीएसटी संकलन आहे. 30 जानेवारी 2022 पर्यंत दाखल केलेल्या जीएसटीआर -3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या 1.05 कोटी आहे ज्यात 36 लाख त्रैमासिक विवरणपत्रांचा समावेश आहे.

सरकारने नियमित समझोत्याच्या स्वरूपात  म्हणून आयजीएसटीमधून सीजीएसटीला  29,726 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 24,180 कोटी रुपये चुकते केले आहेत. याशिवाय केंद्राने या महिन्यात आयजीएसटीचे 35,000 कोटी रुपये  केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 50:50 च्या प्रमाणात तात्पुरत्या आधारावर  चुकते केले आहेत. नियमित आणि तात्पुरत्या समझोत्या नंतर जानेवारी 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 71,900 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 73,696 कोटी रुपये आहे. केंद्राने जानेवारी 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 18,000 कोटी रुपये जीएसटी भरपाईही जारी केली.

जानेवारी 2022 मध्ये संकलित महसूल  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% आणि जानेवारी 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 25% अधिक आहे. या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 26% अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 12% अधिक आहे.

जीएसटी संकलनाने चौथ्यांदा 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिसेंबर 2021 मध्ये 6.7 कोटी ई-वे देयके निर्माण झाली ही संख्या नोव्हेंबर 2021 मध्ये निर्माण झालेल्या 5.8 कोटी ई-वे देयकांपेक्षा 14% जास्त आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासह करचोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर कारवाई या गोष्टी वाढलेल्या जीएसटी संकलनात योगदान देत आहेत. पर्यस्त शुल्क रचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने  केलेल्या विविध दर तर्कसंगत उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे. आगामी काही महिन्यांतही महसुलातील सकारात्मक कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



2022-23 मध्ये भारताचा विकास दर 8.0 ते 8.5 % राहण्याचा अंदाज-आर्थिक सर्वेक्षण 2021-22

 

जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या अनुसार 2021-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगाने वृद्धींगत होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून जारी राहणार

2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 9.2% वास्तविक वृद्धी

2021-22 मध्ये कृषी विकास दर 3.9 % राहणार, आधीच्या वर्षी हा दर 3.6% होता.

औद्योगिक क्षेत्राचा 2020-21 मधे 7% इतका संकोच झाल्यानंतर 2021-22 मध्ये वेगाने उसळी घेत 11.8% इतक्या विस्ताराचे साक्षीदार

गेल्या वर्षीच्या 8.4% इतक्या आकुंचनानंतर सेवा क्षेत्रात 2021-22 मध्ये 8.2% वृद्धी

31 डिसेंबर 2021 ला परकीय गंगाजळी 634 अब्ज अमेरीकी डॉलर्स, ही गंगाजळी 13 महिन्यांच्या आयातीइतकी आणि देशाच्या बाह्य कर्जापेक्षा जास्त

2021-22 मध्ये गुंतवणुकीत 15% भक्कम वाढ अपेक्षित

डिसेंबर 2021 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकासह 5.6% चलनवाढ ही

लक्ष्याला अनुसरून सुसह्य कक्षेत

एप्रिल- नोव्हेंबर 2021 साठी वित्तीय तुट ही अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 46.2% वर सीमित

महामारी असूनही भांडवली बाजारात तेजी, एप्रिल-नोव्हेंबर 2021 मध्ये 75 आयपीओ द्वारे 89 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभी , गेल्या दशकातल्या कोणत्याही वर्षापेक्षा ही रक्कम खूपच अधिक

2022-23मधल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे अर्थव्यवस्थेचे व्यापक स्थायित्व मापदंड दर्शवत आहेत

व्यापक लसीकरण, पुरवठासाखळी विषयक सुधारणेचा लाभ आणि नियमनविषयक शिथिलता, निर्यातीत जोमदार वाढ आणि भांडवली खर्चाला वेग देण्यासाठी वित्तीय वाव उपलब्ध राहिल्यामुळे 2022-23 मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर 8.0-8.5 इतका राहील.

 

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2021-22 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. येत्या वर्षात खाजगी क्षेत्रात गुंतवणुकीला वेग येईल कारण अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी आधार देण्याकरिता वित्तीय व्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचे या  अहवालात म्हटले आहे.  

महामारीशी संबंधित आर्थिकसंदर्भातल्या अडचणी यापुढे येणार नाहीत, पाऊसमान योग्य राहील, महत्वाच्या मध्यवर्ती बँकाद्वारे जागतिक तरलता काढून घेताना व्यापक प्रमाणात सुयोग्यता राखली जाईल, तेलाच्या किमती 70-75 डॉलर प्रती ब्यारल राहतील आणि जागतिक पुरवठा साखळीतले अडथळे कमी होतील या  गृहितकावर   2022-23 साठी विकासाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे.

या अंदाजाची तुलना 2022-23 साठी वास्तव जीडीपी वृद्धी, 8.7 टक्के राहील या  जागतिक बँकेच्या आणि 7.5 टक्के राहण्याच्या आशियाई विकास बँकेच्या नुकत्याच जारी केलेल्या अनुमानाशी याची तुलना करता येईल असेही अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या 25 जानेवारी 2022 ला नुकत्याच जारी केलेल्या जागतिक आर्थिक चित्रानुसार 2021-22 आणि 2022-23 साठी भारताचा जीडीपी 9 टक्के दराने तर 2023-24 मध्ये 7.1 टक्के दराने वाढेल  असा  अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या तीन वर्षात भारत, जगातली सर्वात  वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था   राहील असे सांगण्यात आले आहे. 

 

पहिल्या अंदाजाचा संदर्भ  देत सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वृद्धिगत होण्याचा अंदाज आहे. 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेचा  7.3 टक्के इतका संकोच झाला होता. याचाच  अर्थ सर्वसाधारण आर्थिक घडामोडीनी  महामारीच्या पूर्वीच्या स्थितीला  पार केले आहे. पहिल्या तिमाहीत दुसऱ्या लाटेचा आर्थिक प्रभाव हा 2020-21 मधल्या संपूर्ण लॉक डाऊनमध्ये अनुभवलेल्या स्थितीपेक्षा खूपच कमी राहिल्याचे जवळ जवळ सर्वच मापदंड दर्शवत आहेत. मात्र आरोग्या संदर्भातला याचा  परिणाम तीव्र होता. 

क्षेत्रीय बाबींवर  लक्ष केंद्रित करून, सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले  आहे की कृषी आणि संलग्न क्षेत्रे या महामारीमुळे  सर्वात कमी प्रभावित झाले आहेत आणि मागील वर्षी 3.6 टक्क्यांनी वाढल्यानंतर 2021-22 मध्ये या क्षेत्राची  3.9 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. खरीप आणि रब्बी पिकांखालील लागवड क्षेत्र आणि गहू आणि तांदूळ उत्पादनात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. चालू वर्षात खरीप हंगामासाठी अन्नधान्य उत्पादन 150.5 दशलक्ष टन इतकी विक्रमी पातळी गाठण्याचा अंदाज आहे. शिवाय, केंद्रीय साठा अंतर्गत अन्नधान्याच्या खरेदीने  2021-22 मध्ये किमान आधारभूत किमतींसह त्याचा वाढता कल कायम ठेवला, जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी चांगला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या क्षेत्राच्या भक्कम कामगिरीला सरकारच्या धोरणांची मदत होत आहे,  ज्याने महामारीशी संबंधित संकटकाळातही बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित केला. पाऊस चांगला झाल्यामुळे जलाशयांची पातळी मागील 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.

सर्वेक्षणानुसार, औद्योगिक क्षेत्राने 2020-21 मध्ये 7 टक्क्यांच्या घसरणीनंतर  या आर्थिक वर्षात 11.8 टक्क्यांच्या वाढीपर्यंत झेप घेतली आहे.  निर्मिती ,  बांधकाम आणि खाण उप-क्षेत्रांनी  देखील अशीच वाढ नोंदवली असली तरी सेवा  विभागावर फारसा परिणाम झाला नाही. कारण वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सेवा राष्ट्रीय टाळेबंदीच्या काळातही कायम होत्या. जीव्हीए मधील उद्योगाचा वाटा आता 28.2 टक्के राहील असा अंदाज आहे.

सर्वेक्षणात असे म्हटले आहे की सेवा क्षेत्राला विशेषत: मानवी संपर्काचा समावेश असलेल्या विभागांना  महामारीचा सर्वात जास्त फटका बसला आहे,  गेल्या वर्षीच्या 8.4 टक्के घसरणीनंतर  या आर्थिक वर्षात हे क्षेत्र 8.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की विविध उप-क्षेत्रांद्वारे व्यापक कामगिरी नोंदविली आहे. वित्त/रिअल इस्टेट आणि सार्वजनिक प्रशासन विभाग आता कोविड-पूर्व पातळीपेक्षा वर आले  आहेत. मात्र पर्यटन , व्यापार  आणि हॉटेल्स सारखे विभाग अद्याप पूर्णपणे सावरलेले  नाहीत. सॉफ्टवेअर आणि आयटी-सक्षम सेवांच्या निर्यातीत भरभराट झाली आहे तरीही पर्यटनातून मिळणाऱ्या कमाईत मोठी घट झाली आहे.

सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की 2021-22 मध्ये एकूण खप  7.0 टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे आणि सरकारी खप  मागील वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त  राहिला आहे. सरकारी खप 7.6 टक्‍क्‍यांनी महामारीपूर्व पातळीला मागे टाकून वाढेल असा अंदाज आहे. 97 टक्के संबंधित पूर्व-महामारी आउटपुट पातळी साध्य  करण्यासाठी खाजगी वापरामध्ये देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचा अंदाज आहे आणि वेगवान लसीकरण आणि आर्थिक व्यवहरांच्या  जलद सामान्यीकरणासह मोठी सुधारणा होणार आहे. 

सर्वेक्षणानुसार, ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन (GFCF) नुसार गुंतवणूक 2021-22 मध्ये 15 टक्क्यांनी वाढेल आणि महामारीपूर्व पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे. भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधांच्या खर्चाद्वारे विकास गतिमान करण्यावर सरकारच्या धोरणाने भर दिला असून, अर्थव्यवस्थेतील भांडवल निर्मितीत  वाढ झाली आहे आणि 2021-22 मध्ये गुंतवणूक जीडीपीच्या सुमारे 29.6 टक्क्यांवर पोहोचली  आहे, जी सात वर्षांतील सर्वोच्च गुंतवणूक आहे. खाजगी गुंतवणुक अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असून असे अनेक संकेत आहेत जे सूचित करतात की भारत अधिक भक्कम  गुंतवणुकीसाठी सज्ज आहे.

सर्वेक्षणानुसार, ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन (GFCF) द्वारे मोजल्यानुसार गुंतवणूक 2021-22 मध्ये 15 टक्क्यांनी मजबूत वाढ आणि महामारीपूर्व पातळीची पूर्ण पुनर्प्राप्ती साध्य करेल अशी अपेक्षा आहे. कॅपेक्स आणि पायाभूत सुविधांच्या खर्चाद्वारे विकासाचे सद्गुण चक्र जलद करण्यावर सरकारच्या धोरणाने भर दिला असून, अर्थव्यवस्थेतील भांडवल निर्मितीमध्ये वाढ झाली आहे आणि 2021-22 मध्ये GDP गुंतवणुकीचे गुणोत्तर सुमारे 29.6 टक्क्यांवर पोहोचले आहे, जे सात वर्षांतील सर्वोच्च आहे. खाजगी गुंतवणुकीची वसुली अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असताना, असे अनेक संकेत आहेत जे सूचित करतात की भारत अधिक मजबूत गुंतवणुकीसाठी सज्ज आहे. एक मजबूत आणि स्वच्छ बँकिंग क्षेत्र खाजगी गुंतवणुकीला पुरेशा प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी तयार आहे.

निर्यात आणि आयात आघाडीवर, सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की 2021-22 मध्ये आतापर्यंत भारतातील वस्तू आणि सेवा दोन्हीची निर्यात अपवादात्मकपणे अधिक मजबूत झाली आहे. 2021-22 मध्ये महामारीशी संबंधित जागतिक पुरवठा मर्यादा असूनही लागोपाठ आठ महिन्यांत व्यापारी मालाची निर्यात$30 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे, व्यावसायिक आणि व्यवस्थापन सल्लागार सेवा, ऑडिओ व्हिज्युअल आणि संबंधित सेवा, मालवाहतूक सेवा, दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवांद्वारे निव्वळ सेवा निर्यातीतही झपाट्याने वाढ झाली आहे. मागणीच्या दृष्टीकोनातून, 2021-22 मध्ये भारताची एकूण निर्यात 16.5 टक्‍क्‍यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणीत वाढ  आणि आयात क्रूड आणि धातूंच्या किमतीत सतत वाढ झाल्याने आयातही सुधारली आहे. 2021-22 मध्ये आयात 29.4 टक्‍क्‍यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, जी संबंधित महामारीपूर्व पातळीला मागे टाकेल. परिणामी, भारताची निव्वळ निर्यात 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत 2020-21 च्या संबंधित कालावधीतील वाढीच्या तुलनेत नकारात्मक राहिली आहे. मात्र चालू खात्यातील तूट मर्यादेत राहणे अपेक्षित आहे .

जागतिक महामारीमुळे अनेक अडचणी येऊनही भारताचा खर्चाचा ताळेबंद (BOP)  गेली दोन्ही वर्षे अतिरिक्त राहिला होता याकडे सर्वेक्षणात लक्ष वेधले गेले आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला परदेशी चलनाचा साठा करता आला. 31 डिसेंबर 2021 रोजी  भारताकडे 63,400 कोटी अमेरिकन डॉलर्स मूल्याचा परकीय चलन साठा होता. हा साठा 13.2 महिन्यांच्या आयाती इतक्या मूल्याचा आणि देशाच्या एकूण परकीय कर्जापेक्षा जास्त आहे. 

महागाईचा प्रश्न जगभरातील विकसित तसेच विकसनशील अर्थव्यवस्थांना देखील पुन्हा एकदा भेडसावू लागल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. ऊर्जा, खाद्येतर वस्तू व  इनपुट किंमतीमध्ये वाढ, जगभरातील पुरवठा साखळ्यांची वाताहत आणि वाढता वाहतूक खर्च यामुळे गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवरील महागाईत वाढ झाली. भारतातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 2020-21 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 6.6 टक्क्यांवरून 2021-22 सालातील त्याच कालावधीत 5.2 टक्क्यांपर्यंत कमी झाला. डिसेंबर 2021 मध्ये तो (वर्षाअखेर) 5.6 टक्के म्हणजेच सहन करण्याजोगा होता. 2021-22 मध्ये खाद्यान्नाच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाईदेखील कमी झाली. परंतु घाऊक किंमत महागाई (WPI) मात्र दोन आकडी राहिली आहे. 

सर्वेक्षणानूसार, अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दिलेली मदत आणि आरोग्यविषयक परिस्थितीमुळे 2021-22 सालात आर्थिक तूट व शासकीय कर्जांमध्ये वाढ झाली. पण 2021-22 सालात आतापर्यंत सरकारी महसुलात मात्र चांगली वाढ झाली आहे. 2021-22 सालच्या अर्थसंकल्पात केंद्राच्या शासकीय महसुलात 9.6 टक्के वाढीची अपेक्षा व्यक्त केली गेली होती, मात्र प्रत्यक्षात हा महसूल एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या काळात 67.2 टक्क्यांनी (YOY) वाढला आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची वसुली वाढली असून वस्तू व सेवा कराचा मासिक स्थूल भरणा जुलै 2021 पासून एक  लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आहे. 

महसुलाचे संकलन टिकून राहिल्यामुळे, तसेच भारत सरकारने खर्च धोरणाकडे विशेष लक्ष पुरवल्यामुळे, एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या कालावधीतील आर्थिक तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या (BE)  46.2 टक्के एवढीच सीमित राहू शकली. त्या आधीच्या दोन वर्षांमधील आर्थिक तुटी च्या मानाने ही तूट  सुमारे एक तृतीयांश इतकी कमी असल्याचे (एप्रिल ते नोव्हेंबर 2020 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 131.1 % आणि एप्रिल ते नोव्हेंबर 2019 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजाच्या  114.8 %)   या सर्वेक्षणात दर्शवले आहे.  

अस्थिरतेच्या काळात आर्थिक क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता असते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. तरीही भारतीय भांडवल बाजाराची कामगिरी अतिशय चांगली झाली असून भारतीय कंपन्यांसाठी विक्रमी प्रमाणात भांडवल गोळा झाले आहे. 18 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 61 हजार 766 च्या तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 18 हजार 477 अंकांच्या  उच्चांकी पातळीवर पोचला होता. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 दरम्यान 75 विविध आय पी ओ मार्फत 89 हजार 066 कोटी रुपये गोळा झाले असून हा आकडा गेल्या दशकातील कोणत्याही वर्षीच्या आकड्याहून मोठा आहे. शिवाय बँकिंग व्यवस्थेच्या भांडवल पुरवठ्यात सुधारणा झाली असून बुडीत कर्जाचे प्रमाण संरचनात्मक दृष्ट्या घटले आहे. शेड्युल्ड वाणिज्य बँकांमधील (SCB) एकूण बुडीत कर्जाचे (GNPA) गुणोत्तर ( GNPA ची एकूण कर्जाच्या रकमेशी टक्केवारी) आणि नक्त बुडीत कर्जाचे (NNPA) गुणोत्तर 2018-19 सालापासून कमी होत आहे. शेड्युल्ड वाणिज्य बँकांचे GNPA गुणोत्तर सप्टेंबर 2020 शेवटाला 7.5 टक्के होते , ते सप्टेंबर 2021 च्या शेवटी 6.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारताच्या आर्थिक प्रतिसादाचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे मागणी व्यवस्थापनावर पूर्ण अवलंबून न राहता पुरवठा-बाजू सुधारणांवर भर देणे. या पुरवठा-बाजू सुधारणांमध्ये अनेक क्षेत्रांवरील नियंत्रणमुक्ती, प्रक्रियांचे सरलीकरण, तसेच 'पूर्वलक्ष्यी कर', खासगीकरण, उत्पादन-संबंधित प्रोत्साहन इत्यादी वारसा समस्या दूर करणे यांचा समावेश आहे. सरकारद्वारे भांडवली खर्चातील मोठी वाढ ही मागणी आणि पुरवठा या दोन्हीसाठी प्रतिसाद म्हणून पाहिली जाऊ शकते कारण यामुळे भविष्यातील वाढीसाठी पायाभूत सुविधांची क्षमता निर्माण होते.

भारताच्या पुरवठा-बाजू धोरणामध्ये दोन समान संकल्पना आहेत: (i) कोविड-पश्चात जगाच्या दीर्घकालीन अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी लवचिकता आणि नवोन्मेष वृद्धीसाठी सुधारणा. यामध्ये बाजारातील सुधारणा; जागा, ड्रोन, भूस्थानिक सर्वेक्षण, व्यापार वित्त घटक यांसारखी क्षेत्रे नियंत्रणमुक्त करणे; सरकारी खरेदी आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा प्रक्रिया; पूर्वलक्षी कर खासगीकरण आणि मुद्रीकरण, भौतिक पायाभूत सुविधांची निर्मिती इ. सारख्या वारसा समस्या दूर करणे; (ii) भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता सुधारण्याच्या उद्देशाने सुधारणा. यात हवामान/पर्यावरण संबंधित धोरणे; सामाजिक पायाभूत सुविधा जसे की नळाच्या पाण्याची सार्वजनिक तरतूद, शौचालये, हक्काचे घर, गरिबांसाठी विमा इ.; आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रमुख उद्योगांसाठी समर्थन; परकीय व्यापार करारांमध्ये परस्पर सहकार्यावर भर देणे इ. अंतर्भूत आहे.

आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून चर्चा केलेली एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘प्रक्रिया सुधारणा’. नोटाबंदी आणि प्रक्रिया सुधारणा यात फरक करणे महत्त्वाचे आहे. पूर्वीचा संबंध एखाद्या विशिष्ट उपक्रमातून सरकारची भूमिका कमी करणे किंवा काढून टाकणे. याउलट, नंतरचा संबंध व्यापक प्रमाणावर अशा उपक्रमांसाठी प्रक्रिया सरलीकरण आणि सुलभीकरण याच्याशी निगडित आहे जेथे सुविधा किंवा नियामक म्हणून सरकारची उपस्थिती आवश्यक आहे.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की कोविड-19 महामारीमुळे गेली दोन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कठीण गेली आहेत. संसर्गाच्या पुनरावृत्तीच्या लाटा, पुरवठा-साखळीतील व्यत्यय आणि अलीकडेच, जागतिक चलनफुगवट्याने धोरणनिर्मितीसाठी विशेषतः आव्हानात्मक काळ निर्माण केला आहे. या आव्हानांना तोंड देताना, भारत सरकारने 'बार्बेल धोरण' स्वीकारले; ज्यामध्ये समाजातील असुरक्षित घटकांवर आणि व्यावसायिक क्षेत्रावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सुरक्षा-जाळ्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर मध्यम-मुदतीची मागणी वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात लक्षणीय वाढ करण्यात आली तसेच, दीर्घकालीन विस्तारासाठी अर्थव्यवस्थेला तयार करण्यासाठी आक्रमकपणे पुरवठा-बाजूच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. हा लवचिक आणि बहुस्तरीय दृष्टीकोन अंशतः "जलद" आराखड्यावर आधारित आहे, ज्यामध्ये प्रतिसाद आणि रिअल-टाइम डेटाचे निरीक्षण केले जाते.

सर्वेक्षण अधोरेखित करते की महामारीचा उद्रेक झाल्यापासूनचे चलनविषयक धोरण मोठ्या संकटापासून बचावासाठी आणि वाढीला समर्थन देण्यासाठी तयार केले गेले होते, परंतु अतिरिक्त तरलतेचे मध्यम मुदतीचे विस्थापन टाळण्यासाठी काळजीपूर्वक नियंत्रित केले गेले होते. सुरक्षा-जाळ्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः एमएसएमईंना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी सरकारी हमींचा वापर. गेल्या दोन वर्षांत, सरकारने सार्वजनिक आणि खासगी दोन्ही स्त्रोतांकडून रिअल-टाइम आधारावर अर्थव्यवस्थेची मूलभूत स्थिती मोजण्यासाठी उद्योग, सेवा, जागतिक ट्रेंड, दीर्घ-स्थिरता निर्देशक आणि इतर अनेक उपक्रमांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ऐंशी हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्स (HFIs) च्या श्रेणीचा लाभ घेतला आहे. या HFIs ने धोरण निर्मात्यांना वॉटरफॉल फ्रेमवर्कच्या पूर्व-परिभाषित प्रतिसादांवर विसंबून राहण्याऐवजी विकसित होत असलेल्या परिस्थितीसाठी त्यांचा प्रतिसाद तयार करण्यात मदत केली, जी भारत आणि जगातील बहुतेक देशांमध्ये धोरण तयार करण्याची परंपरागत पद्धत आहे.

शेवटी, सर्वेक्षण खूपच आशावादी आहे की एकूणच स्थूल-आर्थिक स्थिरता निर्देशक सूचित करतात की भारतीय अर्थव्यवस्था 2022-23च्या आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असण्याचे एक कारण म्हणजे तिचे आगळेवेगळे प्रतिसाद धोरण आहे.



(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...