Tuesday, 1 February 2022

करदाते दोन वर्षांच्या आत सुधारित प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करू शकतात

दिव्यांगांना कर सवलत

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात नियोक्त्याच्या योगदानावरील कर कपातीची मर्यादा 10% वरून 14% पर्यंत वाढवण्यात आली

व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल

करदात्यांना सामोरे जावे लागणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नवीन उपाययोजना

Posted On: 01 FEB 2022 2:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022

करदात्यांना संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांच्या आत भरलेल्या अतिरिक्त करासंबंधी सुधारित विवरणपत्र  दाखल करण्याची अनुमती देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहेअशी घोषणा केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केली. यामुळे करदात्यांना कर भरण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज घेताना झालेली एखादी  चूक  सुधारण्याची संधी मिळेल असे त्यांनी सांगितले.  सध्या जर प्राप्तिकर विभागाला असे आढळून आले की करदात्याकडून काही उत्पन्न वगळले गेले  आहेतर त्यांना अधिकृत  निर्णयाच्या दीर्घ प्रक्रियेतून जावे लागते मात्र नवीन प्रस्तावात करदात्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले . त्या म्हणाल्या  ऐच्छिक कर अनुपालनाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे.

दिव्यांगांना  कर सवलत

कायद्यानुसार  सध्या  पालक  दिव्यांग व्यक्तीसाठी विमा योजना घेतात तेव्हा त्यांच्या  मृत्यूनंतर दिव्यांग व्यक्तीला एकरकमी  किंवा ऍन्युइटी स्वरूपात विम्याची रक्कम मिळणार असेल तरच त्यांच्यासाठी  वजावटीची तरतूद आहे.   मात्र अशीही परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा दिव्यांगांना  त्यांच्या पालकांच्या हयातीतही एकरकमी  किंवा ऍन्युइटी  रकमेची गरज भासू शकतेयाकडे लक्ष वेधून सीतारामन यांनी घोषित केले  की,पालकांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली असली तर पालकांच्या हयातीत,दिव्यांग  व्यक्तींना एकरकमी  किंवा ऍन्युइटी रक्कम दिली जावी असा सरकारचा प्रस्ताव आहे.

कर प्रस्ताव

राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये  समानता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे  सामाजिक सुरक्षा फायदे वाढवण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने लाभ मिळावेत यासाठी  सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात नियोक्त्याने केलेल्या  योगदानावरील कर कपातीची मर्यादा 10 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

आभासी डिजिटल मालमत्तेवर कर आकारण्यासाठी योजना

व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या  व्यवहारांचे प्रमाण आणि वारंवारता मोठ्या प्रमाणावर  वाढली आहेअसे सांगूनसीतारामन यांनी घोषणा केली की कोणत्याही आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जाईल. त्या म्हणाल्या  कीही योजना अधिग्रहण  खर्च वगळता अशा उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही खर्चात  किंवा भत्त्यात  कोणतीही सवलत  देणार नाही.  व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणामुळे होणारे नुकसान इतर कोणत्याही उत्पन्नातून कमी करता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या  की व्यवहाराचे तपशील मिळवण्यासाठी सरकार व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या संदर्भात केलेल्या देयकावर  1 टक्के दराने टीडीएस  प्रदान करण्याची तरतूद करेल. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या  भेटीवर देखील  कर लावण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाईचे व्यवस्थापन

सीतारामन यांनी नमूद केले की "समान  समस्यांचा समावेश असलेल्या याचिका  दाखल करण्यात बराच वेळ आणि संसाधने खर्च होतात". सरकारचे योग्य कारवाई  व्यवस्थापनाचे धोरण पुढे नेण्यासाठी आणि करदाते आणि विभाग यांच्यातील वारंवार दाखल केल्या जाणाऱ्या याचिकांची प्रमाण कमी  करण्यासाठीसरकार  तरतूद करेल की जर करदात्याच्या बाबतीत कायद्याचा प्रश्न प्रलंबित असलेल्या कायद्याच्या प्रश्नासारखा असेलतर अधिकारक्षेत्रातील उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईपर्यंत अन्य याचिका दाखल करणे पुढे ढकलले जाईल.

कर प्रस्ताव 

अर्थमंत्र्यांनी देशातील करदात्यांचेही आभार मानले. ज्यांनी  मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे आणि गरजेच्या वेळी आपल्या देशबांधवांना मदत करण्यासाठी सरकारचे हात अधिक बळकट केले आहेत.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



No comments:

Post a Comment

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...