Tuesday, 18 January 2022

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पुढे


देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल पेमेंट बँकेपैकी एक बँक ठरली

ग्रामीण, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची, त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध- जे वेंकटरामु, व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, आयपीपीबी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ करतांना म्हटले होतेकी देशात वित्तीय समावेशन करण्यासाठीचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे.त्या पोस्ट पेमेंट बँक या प्रथम डिजिटल बँकेने दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा उत्तम वापर करत त्या पायावर आपला विस्तार करतएक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर  पोहोचली  आहेअशी घोषणा आज बँकेने केली. बँकेचा शुभारंभ झाल्यापासूनकेवळ तीन वर्षांच्या आत ही देशातील सर्वाधिक जलद गतीने विस्तारलेल्या बँकांपैकी एक बँक ठरली आहे.

आयपीपीबीने आपल्या 1.36 लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून पाच कोटी खाती डिजिटल आणि संपूर्ण कागदरहित व्यवहार करत सुरु केली आहेत. यापैकी 1.20 लाख खाती ग्रामीण भागातली आहेत. तसेच1.47 लाख ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत.

या कामगिरीमुळेआयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असूनटपाल कार्यालयाच्या  2,80,000  कर्मचाऱ्यांच्या परिश्रम शक्तीच्या बळावरवित्तीय साक्षरता आणि सक्षमीकरणाची मोहीम राबवली आहे.

विशेष म्हणजेबँकेच्या एकूण खातेदारांपैकी सुमारे 48% महिला खातेदार आहेततर 52% पुरुष खातेदार आहेतही आकडेवारीअधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98% खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत. आणि 68% महिलांना या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत. आणखी एक मैलाचा दगड  म्हणजे देशातील युवक देखील पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. 41% पेक्षा अधिक खातेधारक 18 ते 35 वर्षे या वयोगटातील आहेत.

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलतांना टपाल विभागाचे सचिवविनीत पांडे यांनी सांगितले की  इंडिया पोस्टअंतर्गतदेशातीळ सर्वात मोठे वित्तीय समवेशनाचे जाळे उभरण्यास आम्ही कटिबद्ध असूनयात शहरी आणि ग्रामीण भारतातही आमच्या बँकिंग सेवा विस्तारल्या आहेत. केवळ तीन वर्षातपाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कामगिरी या बँक मॉडेलच्या यशाची पावतीच ठरली आहे. यातून किफायतशीरसुलभसोपी आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्थाविशेषतः देशाच्या ग्रामीण भागातनिर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या घरांपर्यंत बँकिंग सेवा पुरवून आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात हातभार लावू शकलोयाचा आम्हाला विशेष आनंद आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीजे वेंकटरामु यांनी यावर प्रतिक्रिया देतांना सांगितले की हा बँकेसाठी अभिमानाचा क्षण आहे.आम्ही आमचा ग्राहक विस्तार करतांनासामर्थ्याकडून सामर्थ्याकडे वाटचाल केली आहे. कोविड-19 महामारीच्या काळातहीआम्ही ग्राहकांना निर्वेक्ष बँकिंग आणि सरकार-ते ग्राहक (G2C) सेवा पुरवल्या आहेत.विशेष म्हणजेबँकेने आपले ग्राहक तयार करतांना संपूर्णपणे कागदरहित व्यवहार करत डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला आहे. ग्रामीणबँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची ,त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



बनावट/फसव्या लिंक पासून सावधान Stay Alert from Fake Link


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



 फिशिंग फसवणुकीपासून सावध रहा    Stay Alert From Phishing Attack


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



KYC लिंक पासून व्हा सावध!


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Thursday, 6 January 2022

साखर विकास निधी अधिनियम 1983 अंतर्गत पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना

मार्गदर्शक सूचनांमध्ये दोन वर्षांची सवलत आणि पांच वर्षात कर्जफेड करण्याच्या तरतुदीमुळे, एसडीएफ कर्ज घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मात्र व्यावसायिक क्षमता असलेल्या आणि ज्यांनी साखर विकास निधी कायदा, 1982 अंतर्गत कर्ज घेतले आहे, अशा साखर कारखान्यांचे पुनर्वसन करण्यासाठी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या अंतर्गत,साखर विकास निधी कायदा 1983 च्या नियम 26 अंतर्गत घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना केली जाणार आहे. या सर्व मार्गदर्शक सूचना https://dfpd.gov.in/sdfguidelines-sdf.htm आणि https://sdfportal.in. या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

परतफेड न करण्यात आलेल्या एसडीएफ कर्जाची एकूण थकीत रक्कम 3068.31 कोटी रुपये (30.11.2021 रोजी) इतकी असून त्यात मुद्दल 1249.21 कोटी रुपये, . 1071.30 कोटी रुपये व्याज आणि कर्ज थकीत असल्याने, 747.80 कोटी रुपये अतिरिक्त व्याज याचा समावेश आहे.

सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था, जसे की सहकारी सोसायट्या, खाजगी मर्यादित कंपन्या आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या अशा सर्व संस्थांनी एसडीएफ अंतर्गत घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जासाठी या मार्गदर्शक सूचना लागू असणार आहेत.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दोन वर्षांची स्थगिती आणि नंतर पाच वर्षांच्या परतफेडीची तरतूद आहे ज्यामुळे एसडीएफ कर्ज घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणे अपेक्षित आहे. पात्र साखर कारखान्यांना अतिरिक्त व्याजाची संपूर्ण माफ करण्यात येईल. एसडीएफ नियम 26 (9) (a) नुसार पुनर्वसन पॅकेज मंजूर झाल्याच्या तारखेला अस्तित्वात असलेल्या बँक दरानुसार व्याजदरात बदल केला जाईल. या सुविधेमुळे या थकबाकीदार साखर कारखान्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल.

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने, रोख रकमेच्या नुकसानीचा सामना करणाऱ्या किंवा ज्यांची मिळकत नकारात्मक आहे, मात्र जे साखर कारखाने बंद झालेले नाहीत किंवा त्यांनी ऊसाच्या दोन हंगामात गाळप बंद केलेले नाही, ( हा हंगाम वगळता)  असे सर्व कारखाने पुनर्रचनेसाठी उपलब्ध आहेत. 

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Wednesday, 5 January 2022

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अटल निवृत्तीवेतन योजनेत आतापर्यंत 65 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी

2015 मध्ये अटल निवृत्तीवेतन योजना सुरू झाल्यापासून 3.68 कोटी सदस्य नोंदणी

 

अटलनिवृत्तीवेतन  योजना  (एपीवाय ) सुरु झाल्यापासून या योजनेचा  साडेसहा वर्षांचा प्रवास 3.68 कोटी सदस्य नोंदणीसह लक्षणीय आहे. 65 लाखांहून अधिक सदस्यांच्या  नोंदणीसह या योजनेची या आर्थिक वर्षातील कामगिरी चांगली झाली आहे.योजना सुरू झाल्यापासून याच कालावधीतील  आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंदणी आहे. नोंदणी व्यतिरिक्त, 56:44 या  पुरुष आणि महिला सदस्यता गुणोत्तरात सुधारणा होत आहे आणि व्यवस्थापनाखालील ठेवी  सुमारे 20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

विशेषत: असंघटित क्षेत्रातील नागरिकांना वृद्धापकाळात उत्पन्न  सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने,  9 मे 2015 रोजी माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी अटल निवृत्तीवेतन योजना ही भारत सरकारची पथदर्शी सामाजिक सुरक्षा योजना सुरु केली होती.

अटल निवृत्तीवेतन योजना प्रशासित करणाऱ्या, निवृत्तीवेतन निधी  नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए ) अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय म्हणाले की, “समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना निवृत्तीवेतनाच्या  कक्षेत आणण्याची ही कामगिरी केवळ सार्वजनिक आणि खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, पेमेंट बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, टपाल  विभाग यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि राज्यस्तरीय बँकर्स समित्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे''

“या चालू आर्थिक वर्षात एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट  साध्य करण्यासोबतच आमच्याकडे देशात निवृत्तीवेतन परिपूर्तता  साध्य करण्याचे कार्य आहे आणि  ते साध्य करण्यासाठी आम्ही सतत सक्रिय पुढाकार घेऊ'', असे पीएफआरडीएच्या अध्यक्षांनी सांगितले.

18-40 वयोगटातील बँक खाते असलेल्या  कोणत्याही भारतीय नागरिकाला अटल निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व घेता येईल.आणि तीन विशिष्ट फायद्यांमुळे  या योजनेचे  वेगळेपण आहे. पहिले वैशिष्ट्य, ही योजना  60 वर्षे पूर्ण झाल्यावर 1000 रुपये ते रुपये 5000 पर्यंतची किमान हमी निवृत्तीवेतन  प्रदान करते. दुसरे म्हणजे, सदस्याच्या  मृत्यूनंतर पती/पत्नीला आयुष्यभर निवृत्तीवेतनाची हमी दिली जाते आणि शेवटचे वैशिष्ट्य , दोन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना ,जमा झालेला संपूर्ण निवृत्तीवेतन निधी दिला जातो. 

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Sunday, 2 January 2022

आव्हानात्मक स्थितीतही भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या दशकात स्थिर गतीने वाढ


अपेडाच्या अखत्यारीत येणाऱ्या उत्पादनांची निर्यात 2011-12 मधील 17,321दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सवरून 2020-21 मध्ये 20,674 दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सवर पोहोचली

बिगर बासमती आणि बासमती तांदूळ, म्हशी चे मांस या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीचा अपेडा अंतर्गत निर्यातीत मोठा हिस्सा आहे

आव्हानांना न जुमानता भारतातील  कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या दशकात स्थिर गतीने वाढ झाली आहे.

कृषी आणि प्रक्रियायुक्त  खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, अपेडाच्या (APEDA)अखत्यारीत येणाऱ्या उत्पादनांची निर्यात 2011-12 मधील  17,321दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सम्हणजे (रुपये15,30,50 कोटी) वरून  2020-21 मध्ये 20,674 दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सवर म्हणजे  (83,484कोटी रुपये)पोहोचल्याची  माहिती केंद्रीय औद्योगिक विदा आणि संख्याशास्त्र प्राधिकरणाने (DGCI&S) दिली आहे.

भारतातील कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या  अपेडा अंतर्गत निर्याती पैकी  सर्वोच्च निर्यात होणारे जिन्नस म्हणून गैर-बासमती तांदूळ असून , 2020-21 मधील एकूण निर्यातीपैकी या तांदळाचा हिस्सा एक चतुर्थांश आहे.

2020-21 मध्ये अपेडा निर्यात बास्केटमधील तीन उच्च उत्पादने म्हणजे गैर-बासमती तांदूळ (23.22% हिस्सा), बासमती तांदूळ (19.44%) आणि म्हशीचे मांस (15.34%) आणि या उत्पादनांचा एकूण शिपमेंटपैकी 58 टक्के वाटा आहे.

“आम्ही कृषी निर्यात धोरण, 2018 चे उद्दिष्ट विचारात घेऊन राज्य सरकारांच्या सहकार्याने सामूहिक पद्धतीने  लक्ष केंद्रित केले असून निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहोत,असे अपेडाचे अध्यक्ष,डॉ एम अंगमुथू, यांनी यावेळी सांगितले. कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अपेडा राज्य सरकारांच्या संपर्कात आहे  महाराष्ट्रासह 16 राज्यांनी निर्यातीसाठी राज्य विशिष्ट कृती आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहे तर इतर राज्यांचे  कृती आराखडे अंतिम टप्प्यात आहेत.

अपेडाने भौगोलिक निर्देशांक (GI) नोंदणीकृत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यान्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील प्रमुख आयातदार देशांसोबत कृषी आणि खाद्य उत्पादनांवर आभासी खरेदीदार विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यासह अनेक उपक्रम पुढाकार घेऊन केले आहेत.

निर्यात केल्या जाणार्‍या उत्पादनांचे गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी, अपेडाने उत्पादनांची विस्तृत श्रेणी आणि निर्यातदारांना चाचणी सेवा प्रदान करण्यासाठी भारतभरात  220 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी, अपेक्षा विविध आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल  विश्लेषणात्मक माहिती संकलित करून या बाजारपेठेत निर्यातदारांना  प्रवेश करण्यासाठी आवश्यक ती  माहिती आणि व्यापारी चौकशीचे पत्ते  अपेडा प्रकाशित करते.

TABLE: Export Trend

Year

Rs Crores

USD Million

2011-12

83484

17321

2012-13

118251

21740

2013-14

136921

22707

2014-15

131343

21489

2015-16

107483

16421

2016-17

113858

17022

2017-18

125858

19524

2018-19

135113

19407

2019-20

119401

16700

2020-21

153050

20674

Source: DGCIS, data about APEDA Products

 


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...