Friday, 10 September 2021

जेएनपीटी बंदरात कंटेनर वाहतुक हाताळणीमध्ये झाली 28.45% वाढ ऑगस्ट महिन्यात झाली 453,105 टीईयूची हाताळणी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे कंटेनर हाताळणी करणारे देशातील आघाडीचे बंदर आहे. ऑगस्ट महिन्यात जेएनपीटीमध्ये  कार्गो हाताळणीत उल्लेखनीय वाढ झाली असून या महिन्यात एकूण453,105 टीईयूची हाताळणी नोंदवली गेली . जी ऑगस्ट2020 मधील 352,735 टीईयूच्या तुलनेत 28.45% अधिक आहे.  जेएनपीटीमधील एनएसआईजीटीने ऑगस्ट 2021 मध्ये 98,473 टीईयूची हाताळणी केली गेली जी एनएसआईजीटीच्या स्थापनेनंतरची आजवरची सर्वाधिक आहे.

आर्थिक वर्ष 2021- 22 च्या पहिल्या पाच महिन्यांत जेएनपीटीमध्ये 2,250,943 टीईयू कंटेनर वाहतूक हाताळणी केली गेली , जी मागील वर्षीच्या याच कालावधीत हाताळणी केलेल्या 1,544,900  टीईयूच्या कंटेनर वाहतुकीपेक्षा 45.70%   अधिक आहे. आर्थिक वर्ष 2021- 22 च्या पहिल्या पाच महिन्यांत जेएनपीटीमध्ये एकूण 30.45 दशलक्ष टन वाहतूक हाताळणी झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत   हाताळणी केलेल्या 21.68 दशलक्ष टनांपेक्षा 40.42% अधिक  आहे.

जेएनपीटी बंदरात ऑगस्ट 2021  दरम्यान 500 रेल्वे रेकच्या माध्यमातून 79,583 टीईयूआईसीडी वाहतूक हाताळणी झाली. अशाप्रकारे आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यात (एप्रिल ते ऑगस्ट) बंदराच्या कामकाजात रेल्वेचा वाटा 18.27% राहिला. जेएनपीटी बंदरात रेल्वेच्या एकूण कामगिरीत सुधारणा होण्यामध्ये रेल्वे आणि सर्व पोर्ट टर्मिनल्ससह सर्वभागधारकांची कार्यक्षमता आणि समन्वय, सर्व कंटेनर ट्रेनऑपरेटर (दोन्ही कॉनकॉर आणि प्रायव्हेट सीटीओ) यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

 

जेएनपीटीच्या मासिक कामगिरीविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजयसेठी म्हणाले, “ऑगस्ट 2021 मध्ये सुद्धा आम्ही आमच्या कामगिरीचा आलेख चढ़ताच ठेवला आहे.आम्ही महामारी दरम्यान जगभरातून मदत स्वरूपात आलेल्या सर्व कोविड मदत सामग्री अर्थात वैद्यकीय कार्गो आणि उपकरणांच्या हाताळणीस सर्वोच्च प्राधान्य दिले.”

गेल्या महिनाभरात, सस्टेनबिलिटी व हरित बंदर उपक्रमांतर्गत जेएनपीटी ने अनेक महत्वाचे उपक्रम राबविले आहेत.  यामध्ये प्रामुख्याने नऊ विद्युत वाहनांचा वापर आणि बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये एक समर्पित चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. शिवाय, जेएनपीटीच्या घनकचरा व्यवस्थापन संयंत्रात बायोगॅसवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्याचबरोबर बंदर परिसरातील रिअल-टाइम हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी एक समर्पित वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. बंदराची कनेक्टिव्हिटी सक्षम व सुगम करण्यासाठी एलएचएस – लेन आरओबीचा दुसराटप्पा आणि जेएनसीएच-पीयूबीच्या मागच्या  बाजुकडील रस्त्यासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



प्राप्तिकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल -अद्ययावत माहिती

प्राप्तिकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) 7 जून, 2021 रोजी सुरू करण्यात आले.तेव्हापासून करदात्यांनी आणि व्यावसायिकांनी पोर्टलमध्ये आलेल्या  समस्या आणि अडचणी नोंदवल्या आहेत. या  प्रकल्पासाठी ठराविक सेवा प्रदाता असलेल्या इन्फोसिस लिमिटेडकडून करण्यात येत असलेल्या समस्यांच्या निवारणावर वित्तमंत्रालय नियमित देखरेख ठेवून आहे.

अनेक तांत्रिक मुद्द्यांची उत्तरोत्तर दखल घेतली जात आहे आणि पोर्टलवरील विविध प्राप्तिकर संबंधित भरणा झालेल्या अर्जाच्या आकडेवारीमध्ये सकारात्मक कल दिसून आला आहे.7 सप्टेंबर, 2021 पर्यंत 8.83 कोटीहून अधिक आणि सप्टेंबर, 2021 मध्ये दैनंदिन सरासरीनुसार 15.55 लाखांपेक्षा अधिक  विशेष करदात्यांनी  लॉग इन केले. सप्टेंबर, 2021 मध्ये दररोज 3.2 लाख आणि मूल्यांकन वर्ष  2021-22 साठी 1.19 कोटी प्राप्तिकर विवरणपत्र  (ITR) दाखल झाली. त्यापैकी 76.2 लाखांहून अधिक करदात्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा उपयोग केला आहे.

केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राद्वारे प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या 94.88 लाखांहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रांची  ई-पडताळणी देखील करण्यात आली आहे. यापैकी 7.07 लाख प्राप्तिकर विवरणपत्रांवर  प्रक्रिया करण्यात आली आहे., हे उत्साहवर्धक आहे.

चेहरा विरहित मूल्यांकन /अपील/दंडात्मक  कार्यवाही अंतर्गत विभागाने जारी केलेल्या 8.74 लाख नोटिसा करदात्यांना पाहता येत आहेत, ज्याला  2.61 लाखांहून अधिक प्रतिसाद दाखल झाले आहेत. ई-कार्यवाहीसाठी सरासरी 8,285 नोटिसा दिल्या जात आहेत आणि सप्टेंबर, 2021 मध्ये दररोज 5,889 प्रतिसाद  दाखल केले जात आहेत.

10.60 लाखांहून अधिक वैधानिक अर्ज दाखल केले गेले आहेत ज्यात 7.86 लाख टीडीएस स्टेटमेंट्स, ट्रस्ट/संस्थांच्या नोंदणीसाठी 10 ए चे 1.03 लाख अर्ज , पगाराच्या थकबाकीसाठी 10 ई 0.87 लाख अर्ज  , अपीलासाठी 0.10 लाख अर्ज 35 यांचा समावेश आहे.

66.44 लाख करदात्यांनी आधार- पॅन संलग्न  केले आहे. आणि 14.59 लाखांहून अधिक ई-पॅन वाटप करण्यात आले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये दररोज 0.50 लाखांहून अधिक करदात्यांकडून या दोन सुविधांचा लाभ घेतला जात आहे.

करदात्यांना सहजपणे अर्ज दाखल करता यावा यासाठी  विभाग इन्फोसिसच्या सतत संपर्कात आहे याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.


(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



महाराष्ट्रातील ग्रामीण संपर्क सुविधा वाढवण्यासाठी भारत सरकार आणि आशियायी विकास बँकेने 300 दशलक्ष डॉलर्स कर्ज करारावर केली स्वाक्षरी

 महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने  ग्रामीण संपर्क सुविधा सुधारण्यासाठी अतिरिक्त वित्तपुरवठा म्हणून 300 दशलक्ष डॉलर्स कर्ज देय करारावर आशियायी विकास बँक (एडीबी) आणि भारत सरकारने स्वाक्षरी केली.

सध्या सुरु असलेल्या असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण संपर्क सुविधा सुधारणा प्रकल्पासाठी उपलब्ध झालेला अतिरिक्त वित्तपुरवठा 34 जिल्ह्यातील एकूण 2,900 किलोमीटर (किमी) लांबीचे अतिरिक्त 1,100 ग्रामीण रस्ते आणि 230 पुलांची सुधारणा करण्यासाठी सहाय्य्यकारी ठरेल. याच्या अगोदर ऑगस्ट 2019 मध्ये मंजूर झालेल्या  200 दशलक्ष डॉलर्स अर्थसहाय्यासह सुरु असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत  महाराष्ट्रातील 2,100 किमी लांबीच्या ग्रामीण रस्त्यांची स्थिती आणि सुरक्षेमध्ये सुधारणा आणि देखभाल केली जात आहे.

भारत सरकारच्या वतीने  वित्त मंत्रालयांच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव  श्री रजत कुमार मिश्रा आणि आशियायी विकास बँकेच्या भारत निवासी मिशनचे देश संचालक श्री टेकेओ कोनिशी  यांनी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.

मिश्रा यांनी कर्ज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितले की, "अतिरिक्त वित्तपुरवठ्यामुळे, महाराष्ट्रातील उत्पादक कृषी क्षेत्रे आणि सामाजिक -आर्थिक केंद्रांना ग्रामीण समुदायांशी जोडणाऱ्या 5,000 किमी ग्रामीण रस्त्यांची स्थिती आणि सुरक्षा तसेच आणि  200 हून अधिक पुलांची सुधारणा या एकूण प्रकल्पाअंतर्गत केली जाईल.”

श्री कोनिशी म्हणाले की, "हवामान-सुसंगत, सर्व प्रकारच्या हवामानात तग धरणाऱ्या ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणेमुळे, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि शेतीत परिवर्तनाद्वारे  कोविड-19 च्या धक्क्यातून  सावरून  महाराष्ट्राची आर्थिक सुधारणा वेगवान होण्यास मदत होईल.

नवीन प्रकल्पामुळे स्थानिक समुदायांसाठी रोजगाराचे सुमारे 3.1 दशलक्ष व्यक्ती-दिवस रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे, त्यापैकी किमान 25% बांधकाम आणि देखभाल कालावधीत महिलांसाठी असतील. महिलांना, अर्धकुशल आणि अकुशल कामगार संधींचा लाभ घेता यावा या दृष्टीने, महिला कामगारांच्या क्षमता विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक लिंग कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

या अतिरिक्त वित्तपुरवठ्यामुळे ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे उद्ध्वस्त झालेले महाराष्ट्रातील रस्ते आणि पुलांचे पुनर्बांधणी  आणि पुनर्वसन होईल. या प्रकल्पाच्या रचनेमध्ये पूर आणि हवामान सुसंगत  उपाययोजना, निवडक रस्त्यांवर पर्यावरण-अनुकूल सामग्रीच्या वापराची प्रायोगिक चाचणी, फायबर- अधिक मजबूत केलेले काँक्रीटआणि पुलासाठी  प्री-कास्ट काँक्रीट आर्क ब्रिज सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर .यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न कायम ठेवत समृद्ध, सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत आशिया आणि प्रशांत क्षेत्र साध्य करण्यासाठी, आशियायी विकास बँक वचनबद्ध आहे. 1966 मध्ये स्थापन झालेल्या आशियायी विकास बँकेचे 68 सदस्य देश असून — 49 सदस्य देश आशिया प्रशांत क्षेत्रातील आहेत.

(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



सरकारने वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला दिली मंजुरी

7.5 लाखांहून अधिक लोकांना थेट अतिरिक्त आणि अन्य लाखो लोकांना सहाय्यक उपक्रमांमधील रोजगारनिर्मितीसाठी सहाय्य्यकारी

वस्त्रोद्योग क्षेत्राला पाच वर्षांसाठी 10,683 कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध होणार

विशेषतः गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा इत्यादी राज्यांवर या योजनेचा सकारात्मक परिणाम होईल

 

‘आत्मनिर्भर  भारत’ या संकल्पनेच्या दिशेने पावले टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10,683 कोटी रुपये खर्चाच्या हाताने तयार केलेले  पोशाख, हाताने तयार केलेली वस्त्र आणि तंत्रज्ञान वस्त्रोद्योगाच्या 10 खंड/उत्पादने यांचा समावेश असलेल्या वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न  प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे.

वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न  प्रोत्साहन योजनेसह राज्य आणि केंद्रीय कर आणि करांमध्ये सूट,  निर्यात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफ करणे आणि  स्पर्धात्मक किंमतीत  कच्चा माल पुरवणे, कौशल्य विकास इत्यादी या क्षेत्रातील सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे वस्त्र उत्पादन क्षेत्रात  नवीन युगाची सुरुवात होईल. वस्त्रोद्योगासाठी  उत्पादन संलग्न  प्रोत्साहन  योजना यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये घोषित केलेल्या 13 क्षेत्रांसाठीच्या  1.97 लाख कोटी.रुपये खर्चाच्या उत्पादन संलग्न  प्रोत्साहन  योजनांचा वस्त्रोद्योगासाठीची ही योजना एक भाग आहे

वस्त्रोद्योगासाठीची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना देशातील उच्च मूल्याचे एमएमएफ वस्त्र, तयार कपडे आणि तांत्रिक वस्त्र उत्पादनाला प्रोत्साहन देईल. या उद्योगातील विविध विभागांमध्ये नवीन क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याच्या अनुरूप या योजनेची रचना करण्यात आली आहे. गतिमानतेने पुढे येणाऱ्या एमएमएफ वस्त्र विभागाला मोठी चालना मिळेल जे रोजगार आणि व्यापारासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी कापूस आणि इतर नैसर्गिक फायबर-आधारित कापड उद्योगाच्या प्रयत्नांना पूरक ठरेल.

तांत्रिक वस्त्र  हे  नवीन युगाचे वस्त्र असून याचा वापर पायाभूत सुविधा, पाणी, आरोग्य आणि स्वच्छता, संरक्षण, सुरक्षा, वाहन, हवाई वाहतूक इत्यादीसह अर्थव्यवस्थेशी निगडीत अन्य अनेक क्षेत्रांमध्ये वापर केल्याने या  क्षेत्रातील कार्यक्षमता सुधारेल. या  क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने यापूर्वी एक राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान देखील सुरू केले आहे.

या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोत्साहन रचनेसह दोन प्रकारची गुंतवणूक शक्य आहे. निर्धारित विभागांसाठी  (एमएमएफ वस्त्र , तयार कपडे ) आणि तांत्रिक वस्त्राची उत्पादने करण्यासाठी विभाग, यंत्रे , उपकरणे आणि बांधकाम कामे (जमीन आणि प्रशासकीय इमारत खर्च वगळता) मध्ये किमान 300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला तयार असणाऱ्या कोणतीही व्यक्ती, (ज्यामध्ये व्यवसाय संस्था  / कंपनी समाविष्ट आहे) योजनेच्या पहिल्या भागात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.दुसऱ्या भागात कोणतीही व्यक्ती, (ज्यात फर्म / कंपनी समाविष्ट आहे) किमान ₹ 100 कोटी रुपये गुंतवण्यास इच्छुक असेल तो योजनेच्या दुसर्या  भागातील सहभागासाठी अर्ज करण्यास पात्र असेल. याव्यतिरिक्त, आकांक्षी जिल्हे, श्रेणी 3, श्रेणी  4 शहरे आणि ग्रामीण भागात गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाईल आणि या प्राधान्यामुळे उद्योगाला मागास भागात जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.ही योजना विशेषतः गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा इत्यादी राज्यांवर सकारात्मक परिणाम करणारी ठरेल.

पाच वर्षांच्या कालावधीत, वस्त्रोद्योगासाठी  उत्पादन संलग्न  प्रोत्साहन योजनेमुळे 19,000 कोटी रुपयांहून अधिकची नवीन गुंतवणूक होईल, या योजनेअंतर्गत 3 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याची उलाढाल साध्य होईल आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती  होईल या क्षेत्रामध्ये 7.5 लाखांहून अधिक आणि सहाय्यक उपक्रमांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज आहे. वस्त्रोद्योग प्रामुख्याने महिलांना रोजगार देतो , त्यामुळे  ही योजना महिलांना सक्षम बनवेल आणि औपचारिक अर्थव्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढवेल.


(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण


मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची आणि लेखापरीक्षणाचे विविध अहवाल सादर करण्याची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वाढवली

 


प्राप्तिकर  अधिनियम1961 ("कायदा") अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आणि लेखापरीक्षणाचे  विविध अहवाल दाखल करताना करदात्यांनी आणि इतर संबंधितांनी  नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन ,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मुल्यांकन वर्ष 2021-22  साठी प्राप्तिकर विवरणपत्रे आणि  लेखापरीक्षणाचे  विविध अहवाल सादर करण्याची  मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीडीटी परिपत्रक क्र. 17/2021 F.No.225/49/2021/ITA-II दिनांक 09.09.2021 रोजी जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी कृपया  येथे क्लिक करा



(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

ई-श्रम पोर्टलचा आरंभ झाल्यापासून 27 लाखांहून अधिक असंघटित कामगारांनी त्यावर केली नोंदणी

 

या पोर्टलवर असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी भारत सरकार सर्व राज्य सरकारे आणि इतर हितसंबंधितांना सक्रिय सहकार्य आणि मदत करत आहे: श्री. रामेश्वर तेली

कामगार कल्याण आणि रोजगार मंत्रालय ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विविध शिबिरे आयोजित करत आहे.

विविध मंत्रालयांमधून  कार्यरत असलेल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी आज नवी दिल्लीतील श्रम शक्ती भवनात अशाप्रकारचे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात आज 80 हून अधिक कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केलेली असण्याची शक्यता आहे.

या शिबिराचे उद्‌घाटन करताना श्रम,रोजगार आणि पेट्रोलियम,नैसर्गिक वायू राज्यमंत्री श्री. रामेश्वर तेली यांनी सर्वांना पोर्टलवर नोंदणी करण्यास तसेच पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना मिळणाऱ्या लाभांची माहिती इतरांना  सांगण्याचे आवाहन केले.

श्री. तेली म्हणाले की, सर्व असंघटित कामगारांचा राष्ट्रीय माहितीपट(डेटाबेस) तयार केल्याने सरकारला असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यास आणि शेवटच्या टप्प्यावरील कामगारापर्यंत त्याचे  वितरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार गेल्या महिन्यात  (shorturl.at/fxLU2) सुरू करण्यात आलेले  ई-श्रम हे पोर्टल हे लक्षणीय बदल घडवून आणणारे ठरेल असे सांगत  श्री. तेली यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगितले, की आतापर्यंत 27 लाखांहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी यावर केली आहे आणि भारत सरकार या पोर्टलवर कामगारांची नोंदणी करण्यासाठी सर्व राज्य सरकार आणि इतर हितसंबंधितांना सक्रियपणे सहकार्य करत आहे.

लाभांसंदर्भात आधिक माहिती देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले, की नोंदणी करणाऱ्यांसाठी  2 लाख रुपये अपघाती विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. जर एखादा कामगार ई श्रम( e-SHRAM)  पोर्टलवर नोंदणीकृत असेल आणि त्याला अपघात होऊन  तो मृत्यूमुखी पडला किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व  आले तर तो 2.0 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आले तर 1.0 लाख रुपये भरपाई मिळण्यास पात्र असेल तसेच नोंदणी केल्यावर कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर ( सर्वसमावेशक खाते क्रमांक)दिला जाईल, ज्यामुळे सामाजिक सुरक्षा योजना, रेशन कार्ड इत्यादींच्या सुविहितेसाठी विशेष करून स्थलांतरित कामगारांसाठी हे साध्य करणे सोपे ठरेल.

(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

अकाउंट अग्रीगेटर- अर्थात आर्थिक डेटा सामायिकीकरण यंत्रणेविषयी सर्व काही जाणून घ्या

 गेल्या आठवड्यात भारताने अकाउंट अग्रीगेटर ( Account Aggregator ) अर्थात  AA या  यंत्रणेचा प्रारंभ केला. या यंत्रणेमार्फत आर्थिक डेटा सामायिक केला जाईल. यामुळे गुंतवणूक व पतपुरवठ्यात क्रांतिकारी बदल घडून येतील, लाखो उपभोक्त्यांना स्वतःच्या आर्थिक नोंदी अर्थात रेकॉर्ड्स विषयी जाणून घेता येईल, त्यावर नियंत्रण ठेवता येईल, आर्थिक मध्यस्थ कंपन्या तसेच कर्जदात्यांसाठी संभाव्य ग्राहकांच्या माहितीचा मोठा साठा उपलब्ध होईल. अकाउंट अग्रीगेटर मुळे व्यक्तींना आजपर्यंत बंदिस्त राहिलेल्या त्यांच्या वैयक्तिक आर्थिक डेटावर नियंत्रण ठेवता येईल.

मुक्त बँकिंग व्यवहाराच्या दिशेने हे भारताचे पहिले पाऊल आहे. यामुळे लाखो उपभोक्त्यांना त्यांचा आर्थिक डेटा डिजिटली मिळवता येईल,व सुरक्षित रित्या , कार्यक्षम पद्धतीने  तो विविध संस्थांशी सामायिक करताही येईल.

बँकिंग व्यवस्थेतील ही अकाउंट अग्रीगेटर यंत्रणा भारतातील सर्वात मोठ्या आठ बँकांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यामुळे कर्ज घेण्याची तसेच अर्थव्यवस्थापनाची प्रक्रिया खूप गतिमान व स्वस्त होऊ शकेल.

१) अकाउंट अग्रीगेटर हे काय आहे?

अकाउंट अग्रीगेटर (AA ) ही रिझर्व्ह बँकेने नियमन केलेली यंत्रणा असून तिला NBFC  गैर बँकिंग वित्तीय संस्था - परवाना आहे. या यंत्रणेमुळे व्यक्ती त्यांची  माहिती सुरक्षित व  डिजिटल पद्धतीने मिळवू शकतील तसेच त्यांचे खाते असलेल्या  आर्थिक संस्थेतून  AA यंत्रणेतील दुसऱ्या संस्थेत ती माहिती  सामायिक करू शकतील. व्यक्तींची संमती असल्याखेरीज डेटाचे हस्तांतरण होऊ शकणार नाही.

व्यक्तींना अनेक अकाउंट अग्रीगेटर संस्थांमधून हवी ती संस्था निवडता येईल

अकाउंट अग्रीगेटरमुळे व्यक्तींना एकदम सगळ्या परवानग्या एकत्र देऊन टाकण्याच्या सक्तीतून मोकळीक मिळेल व आर्थिक व्यवहाराच्या प्रत्येक पातळीवर त्यांच्या डेटाचा वापर करण्याची वेगळी  परवानगी देण्याचे स्वातंत्र्य  मिळेल.

२) सामान्य माणसाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये  या नव्या अकाउंट अग्रीगेटर यंत्रणे मुळे  काय सुधारणा होईल?

भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये सामान्य उपभोक्त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बँक खाते, व्यवहार नोंदींच्या प्रतीवर सह्या  करून त्या स्कॅन करून सामायिक करणे, कागदपत्रे नोटराइझ करण्यासाठी  किंवा शिक्के मारून घेण्यासाठी धावपळ करणे, आपल्या आर्थिक नोंदी इतर कोणाला देण्यासाठी युजर नेम व पासवर्ड द्यावा लागणे,  इ.   मात्र अकाउंट अग्रीगेटरमुळे साध्या सोप्या मोबाईल वापराद्वारे डिजिटल डेटा मिळवता येईल   व  तो सामायिक करता येईल.  यामुळे नवीन सेवांची निर्मितीही होऊ शकेल. उदा. नवीन प्रकारची कर्जे.

यासाठी व्यक्तीच्या बँकेला अकाउंट अग्रीगेटर यंत्रणेत सामील व्हावे लागेल.  आठ बँका याच्याआधीच सामील झाल्या आहेत.  त्यातील चार बँकांनी ( ऍक्सिस, आय सी आय सी आय, एच डी एफ सी  व  इंडसइंड बँका  )  संमती वर आधारित डेटा  सामायिकीकरण सुरु केले असून  उरलेल्या चार बँका ( भारतीय स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, आय डी एफ सी फर्स्ट बँक, व फेडरल बँक)  ही  सेवा लवकरच सुरु करतील.

३) आधार इ केवायसी डेटा सामायिकीकरण, क्रेडिट ब्यूरो डेटा  सामायिकीकरण व केंद्रीय के वाय सी सारख्या व्यासपीठापेक्षा अकाउंट अग्रिगेटर कोणत्या प्रकारे निराळा आहे?

आधार के वाय सी व केंद्रीय के वाय सी फक्त  4 ओळखविषयक  डेटा चे  सामायिकीकरण करू शकतात. उदा. नाव, पत्ता, लिंग, इ. त्याचप्रमाणे, क्रेडिट ब्यूरो डेटा देखील फक्त कर्जांची माहिती किंवा क्रेडिट स्कोअर दाखवतो.

अकाउंट ऍग्रिगेटर यंत्रणा मात्र आर्थिक व्यवहारांचा डेटा तसेच बचत/ चालू /मुदत ठेव खात्यातील बँक व्यवहार नोंदींचे सामायिकीकरण करू शकते.

४) कोणत्या प्रकारचा डेटा सामायिक करता येईल?

सध्या बँकिंग व्यवहाराचा डेटा सामायिक करण्यासाठी उपलब्ध आहे.  ( उदा. चालू व बचत खात्याच्या  बँक व्यवहार नोंदी )   हा डेटा अकाउंट अग्रीगेटर यंत्रणेत सामील असलेल्या कोणत्याही बँकेला सामायिक करता येईल.

हळूहळू अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेमार्फत सर्वच आर्थिक डेटा सामायिकीकरणासाठी उपलब्ध होईल. उदा. कर , निवृत्तीवेतन, यासह म्युच्युअल फंड व ब्रोकरेज , तसेच विविध विमा  योजनांचा डेटाही उपभोक्त्यांना उपलब्ध होईल. केवळ आर्थिक क्षेत्रच नव्हे तर आरोग्यसेवा व  दूरसंचार सेवांशी  संबंधित डेटाही व्यक्तींना अकाउंट अग्रीगेटर AA मार्फत  मिळवता येईल.

५) अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेला हा डेटा पाहता किंवा वापरता येईल का? हे डेटा सामायिकीकरण कितपत सुरक्षित आहे?

अकाउंट अग्रीगेटरना हा डेटा पाहता येत नाही. त्यांना तो फक्त व्यक्तींच्या संमती व निर्देशनानुसार एका आर्थिक संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे पाठवता येतो. त्यांच्या नावातून ध्वनित होणाऱ्या अर्थाच्या अगदी उलट त्यांचे काम आहे. अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेतील संस्थाना  इतर तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे तुमचा डेटा वापरून तुमची आर्थिक प्रोफाइल तयार करता येत नाही.

अकाउंट अग्रीगेटर AA संस्था जो डेटा सामायिक करतात, तो  पाठवणाऱ्याने कूटबद्ध ( encrypted ) केलेला असतो. फक्त प्राप्तकर्त्यालाच तो कूटमुक्त (decrypted ) करता येतो. संपूर्णतया कूटबद्ध असलेल्या या प्रक्रियेतून डिजिटल सही असलेल्या तंत्रज्ञानाद्वारे केलेले हे सामायिकीकरण कागदपत्रांच्या देवाणघेवाणीपेक्षा कितीतरी सुरक्षित असते.

६) आपला डेटा सामायिक करायचा  की  नाही याचा निर्णय उपभोक्ता घेऊ शकतो का?

हो नक्कीच . अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेत नोंदणी करावी कि नाही हे पूर्णतया उपभोक्त्यावर अवलंबून असते. उपभोक्ता वापरत असलेली बँक अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेत सामील असेल तरीही  आपण अकाउंट अग्रीगेटर AA मध्ये सामील व्हावे कि नाही, कोणते खाते अकाउंट अग्रीगेटर AA शी जोडावे,  कोणत्याही खात्यातील डेटा काही खास हेतूसाठी नव्या कर्जदात्याला अथवा आर्थिक संस्थेला सामायिक करावा किंवा  नाही? त्यासाठी कोणत्या अकाउंट अग्रीगेटर AA ला संमती द्यावी, याचा निर्णय व्यक्ती घेऊ शकते. आधी दिलेली संमती उपभोक्ता कोणत्याही वेळी रद्द करू शकतो. जर उपभोक्त्याने काही काळासाठी ( उदा. कर्जाच्या मुदतीपुरती) संमती दिली असेल तरीही ती तो नंतर रद्द करू शकतो.

७) उपभोक्त्याने एखाद्या संस्थेशी सामायिक केलेला डेटा ती संस्था किती काळापर्यंत वापरू शकते?

प्राप्तकर्ती संस्था किती काळापर्यंत डेटा चा वापर करू शकते ते डेटा वापरासाठी संमती  देतानाच उपभोक्त्याला दर्शवले जाते.

८) अकाउंट अग्रीगेटर AA संस्थेकडे नोंदणी करण्यासाठी उपभोक्त्याला कोणती प्रक्रिया करावी लागते?

अकाउंट अग्रीगेटर AA संस्थेच्या अँप अथवा संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी करता येते. अकाउंट अग्रीगेटर AA संस्था तुम्हाला युजर नेम देईल, जे तुम्हाला संमती देताना वापरावे लागेल.

सध्या डाउनलोड करण्यासाठी ४ अँप्स उपलब्ध आहेत. ( Finvu , OneMoney , CAMS , Finserve आणि NADL) त्यांच्याकडे अकाउंट अग्रीगेटर चे  AA काम करण्या साठी परवाने देण्यात आले आहेत. आणखी तीन संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेने तत्वतः मंजुरी दिली आहे.     ( PhonePe , Yodlee आणि Perfios ) या संस्था लवकरच त्यांची अँप्स सुरु करतील.

९) उपभोक्त्याला प्रत्येक अकाउंट अग्रीगेटर AA संस्थेकडे नोंदणी करावी लागेल का?

नाही. उपभोक्त्याला अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेत सामील असलेल्या बँकेतून डेटा मिळवण्यासाठी कोणत्याही एका अकाउंट अग्रीगेटर AA संस्थेत नोंदणी करावी लागेल.

१०) अकाउंट अग्रीगेटर AA संस्थेकडून सेवा मिळवण्यासाठी उपभोक्त्याला काही शुल्क द्यावे लागेल का?

ही  गोष्ट त्या अकाउंट अग्रीगेटर AA संस्थेवर अवलंबून राहील. ज्या AA संस्था प्राप्तकर्त्या आर्थिक संस्थांकडून शुल्क आकारत असतील,  त्या उपभोक्त्यांना मोफत सेवा देऊ शकतात, किंवा थोडे शुल्क आकारू शकतात.

११) उपभोक्त्याची  बँक डेटा सामायिकीकरणासाठी  अकाउंट अग्रीगेटर AA यंत्रणेत  सामील झाल्यास त्याला कोणत्या नवीन सेवा मिळू शकतात ? 

कर्ज मिळवणे व अर्थव्यवस्थापन या दोन महत्वाच्या सेवा  व्यक्तीला सुधारित पद्धतीने  मिळू शकतात. सध्या ग्राहकाला कोठेही कर्ज घ्यायचे असल्यास कर्जदात्यांकडे अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतात. ही प्रक्रिया सध्या प्रत्यक्ष जाऊनच करावी लागते त्यामुळे ती वेळखाऊ होते आणि  कर्ज मिळण्यास विलंब होतो. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थापन प्रक्रियाही सध्या फार अवघड आहे, कारण डेटा विविध ठिकाणी साठवलेला असतो व विश्लेषणासाठी तो एकत्र आणणे कठीण होऊन बसते.

अकाउंट अग्रीगेटरद्वारे कंपन्यांना सुरक्षित व छेडछाडमुक्त डेटा त्वरित व स्वस्तात मिळू शकतो, त्यामुळे कर्ज मूल्यमापन  प्रक्रिया लवकर होईल व ग्राहकाला कर्ज मिळेल. भविष्यातील येणारी देयके व रोखीचे प्रवाह याचे पुरावे वस्तू व सेवा कर पावत्या , तसेच जेम GeM या सरकारी बाजारपेठेतील विश्वासार्ह नोंदींच्या आधारे कर्जदात्याला देता येतील व  प्रत्यक्ष तारण न देताही  ग्राहकाला कर्ज मिळू शकेल.

(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण


Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...