गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

संसदेचे 2022 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; एकूण 11 विधेयकांना संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी

 

अधिवेशनादरम्यान कामकाजात लोकसभेत अंदाजे 129% आणि राज्यसभेत 98% कामकाज

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या मागणीमुळे अधिवेशन थांबवण्यात आलेः प्रल्हाद जोशी

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2022 रोजी सुरू झाले होतेते आजगुरूवार7 एप्रिल 2022 रोजी संस्थगित करण्यात आले. नवी दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत  बोलताना आज केंद्रीय  संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यसभा आणि लोकसभेच्या 27 बैठका झाल्या. मंत्र्यांनी अधोरेखित केले की हे अधिवेशन,  8 एप्रिल 2022 पर्यंत चालणार  होतेमात्र विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मागणीमुळे ते आज संस्थगित करण्यात आले.

संसदीय कामकाज  आणि सांस्कृतिक राज्यमंत्री  अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय कामकाज आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री  व्ही. मुरलीधरन हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. 2022-23 वर्षासाठी मंगळवार1 फेब्रुवारी,रोजी  केंद्रीय अर्थसंकल्प  सादर करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या भागात दोन्ही सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा  झाली.  नियोजित 12 तासांऐवजी लोकसभेचे कामकाज 15 तास 35 मिनिटे चालले आणि राज्यसभेचे कामकाज 11 तास 01 मिनिट चालले.

या अधिवेशनात एकूण 13 विधेयके (लोकसभेत 12 आणि राज्यसभेत 1) मांडण्यात आली. लोकसभेने 13 विधेयके आणि राज्यसभेने 11 विधेयके मंजूर केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची एकूण संख्या 11 आहे.

2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत 129% तर राज्यसभेत 98% कामकाज झाले.  



(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bitcoin In Marathi II  तुम्हाला बिटकॉइन मध्ये पैसे लावायचे आहेत का? 

Should You Invest in Bitcoin or Not? Understand in Marathi.  सगळ्यात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी बिटकॉइन ने एक लाख अमेरिकन डॉलर्स चा ऐतिहासिक उ...