Friday, 31 January 2020

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत भारताची 79 स्थानाची झेप

2014 मधल्या 142 व्या स्थानावरून 2019 मधे 63 वे स्थान प्राप्त


केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2019-2020 या वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत भारताने 79 स्थानांची झेप घेतल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले. 2014 मधल्या 142 व्या स्थानावरून भारताने 2019 मध्ये 63 वे स्थान प्राप्त केले आहे.
10 निकषांपैकी भारताने 7 मध्ये प्रगती केली आहे.सुधारणांच्या सर्वोच्च स्थानी वस्तू आणि सेवा कर आणि नादारी आणि दिवाळखोरी संदर्भातला कायदा आहे, ज्यामुळे भारताच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. व्यवसाय सुरू करण्यात सुलभता,( 136 श्रेणी), मालमत्ता नोंदणी (154 श्रेणी), कर देणे (115 श्रेणी) यासारख्या काही निकषांमध्ये भारत अद्याप मागे आहे.
भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गेल्या 10 वर्षात 13 वरून 10 पर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.आता भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 18 दिवस लागतात.2009 मध्ये हा कालावधी 30 दिवसांचा होता. व्यवसाय सुरू करण्यासाठी,वेळ आणि खर्च यामध्ये भारताने बरीच कपात केली असली तरी अद्याप बरेच करण्याची आवश्यकता आहे.
सेवा क्षेत्रातही दैनंदिन व्यवसायासाठी अद्याप अनेक नियामक अडथळ्याना तोंड द्यावे लागते. बार आणि रेस्टोरंट क्षेत्र, जगभरात रोजगार आणि विकासाचा महत्वाचा स्रोत आहे.भारतात रेस्टोरंट उघडण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही इतर ठिकाणच्या संख्यांपेक्षा अधिक असल्याचे एक सर्वेक्षणात आढळून आले आहे.
बांधकाम परवाने
गेल्या पाच वर्षात भारताने बांधकाम परवान्यांच्या प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा केली आहे.
सीमापार व्यापार
सरकारने, प्रक्रियात्मक आणि कागदपत्रांसंदर्भातल्या आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत, डिजिटलायझेशन आणि विविध एजन्सी एका डिजिटल मंचाशी जोडण्यामुळे, या प्रक्रियात्मक त्रुटी कमी होऊ शकतात आणि वापरकर्त्यासाठी अधिक उत्तम अनुभव देऊ शकतात.
भारतात समुद्री जहाजांच्या बंदरात  ये- जा करण्याचा वेळ सातत्याने कमी लागत आहे. 2010- 11 च्या 4.67 दिवसाच्या साधारणतः निम्मा होऊन 2018- 19 मध्ये हा वेळ 2.48 दिवस राहिला आहे. समुद्री बंदरांबाबत महत्वपूर्ण उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.पर्यटन आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रात सुलभता आणण्यासाठी नियोजित दृष्टिकिनाची गरज आहे त्यामुळे,नियामक आणि प्रक्रियात्मक अडथळे दूर होतील.

भारतात सेवा आणि निर्मिती व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदा आणि विनियमन यांच्या संबंधीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
भारतात एक करार लागू करण्यासाठी सुमारे 1445 दिवस लागतात न्यूझीलंड मध्ये 216 दिवस तर चीनमध्ये यासाठी 496 दिवस लागतात. कर भरणा करण्यासाठी भारतात 250 हुन अधिक तास लागतात तर न्यूझीलंड मध्ये 140 तास चीनमध्ये 138 तास लागतात.या मापदंडात सुधारणा घडवायला वाव आहे.


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

No comments:

Post a Comment

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...