महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग, रेल्वे आणि कृषी (एमएसीसीआयए) महासंघाचा 92वा स्थापना दिन आज मुंबईत साजरा झाला.
वर्धापन दिनानिमित्त महासंघाने ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल होते.
व्यापार सुलभतेत एकेकाळी भारताचा क्रमांक 130-140 असायचा. यात मोठी झेप घेत आपण 77 व्या स्थानावर पोहोचलो आहोत, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. सरकार वेगाने नवतंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे, असे सांगून देशांतर्गत निर्मितीला चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारत 2.8 ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था असून वर्ष 2024 पर्यंत 5 ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचा सरकारचा निर्धार आहे. देशाच्या विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत हे पहिले पाऊल आहे. लाच न घेण्याची आणि न देण्याची वृत्ती प्रत्येक भारतीयाने जोपासण्याची आणि आपल्या मुलांमध्ये रुजवण्याची गरज गोयल यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताकडे जग मोठ्या आशेने बघत असल्याचे गोयल यांनी सांगितले. देशातल्या जनतेच्या कल्याणासाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली.
गोयल यांनी रेल्वेच्या विकासाबाबतही माहिती दिली. देशात सुमारे 6.5 लाख स्थानके असून, 2 लाख थांबे आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये वाय-फाय सेवा उपलब्ध केली जात आहे. या माध्यमातून छोट्या स्थानकांच्या आसपासच्या परिसरातील लोकांपर्यंत इंटरनेटची व्याप्ती पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याचा फायदा वंचित घटकातल्या मुलांना इंटरनेट उपलब्ध करुन देण्यासाठी होऊ शकतो. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी आवश्यक लहानसहान सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे गाड्यांमधल्या अन्न पदार्थांबाबत येत असलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, उपाययोजना करण्यात येत आहेत. पॅण्ट्री सुविधा असलेल्या लांब पल्ल्याच्या प्रत्येक रेल्वे गाडीत सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. कुपनवर दिलेल्या बारकोडचा वापर करुन प्रवासीही अन्नाची गुणवत्ता तपासू शकतात, असे गोयल यांनी सांगितले.
रेल्वे स्थानक दत्तक योजनेबाबतही गोयल यांनी माहिती दिली. स्वच्छता, सुरक्षा, सुविधा रेल्वे स्थानकात उपलब्ध करुन देण्यासाठी बिगरसरकारी संस्था, विविध कंपन्या रेल्वे स्थानक दत्तक घेऊ शकतात. इच्छुक कंपन्यांना त्यांचा रेल्वे विकासाबाबतचा वर्षभराचा आरखडा रेल्वे प्राधिकरणाला सादर करावा लागेल. यासंदर्भात छाननी झाल्यावर कंपनीला स्थानके निवडता येईल. दत्तक रेल्वे स्थानकांची यादी raildrishti.in यावर उपलब्ध आहे.
(साभार-pib.nic.in)
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण
#Marathi
No comments:
Post a Comment