Sunday, 16 October 2022

पंतप्रधानांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स केली देशाला समर्पित


पंतप्रधानांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स केली देशाला समर्पित

“बँकिंग सेवा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल याची खात्री देण्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले”

“आर्थिक भागीदारी जेव्हा डिजिटल भागीदारीशी जोडली जाते, तेव्हा शक्यतांचे संपूर्ण नवे जग खुले होते”

" जर्मनी, चीन आणि दक्षिण आफ्रिके सारख्या देशांपेक्षाही भारतातील एक लाख प्रौढ नागरिकांमागील बँक शाखांची संख्या जास्त"

“भारताच्या डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधांची आयएमएफ ने केली प्रशंसा”

“भारत डिजिटलायझेशनद्वारे सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यात अग्रेसर ठरल्याचे जागतिक बँकेचे मत”

“बँकिंग आज आर्थिक व्यवहारा पलीकडे गेले असून ते 'सुशासन' आणि 'उत्तम सेवा वितरण'चे माध्यम बनले"

“जन धन खात्यांनी देशात आर्थिक समावेशाचा पाया घातला असेल, तर फिनटेक बनेल आर्थिक क्रांतीचा आधार”

“आज संपूर्ण देश जन धन बँक खात्यांच्या ताकतीचा अनुभव घेत आहे”

“कुठल्याही देशाची बँकिंग प्रणाली जेवढी मजबूत, तेवढीच देशाची अर्थव्यवस्था देखील प्रगतीशील”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट(केंद्र) (डीबीयु) दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्राला समर्पित केली.

संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ही 75 डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयु) आर्थिक समावेशकता आणि नागरिकांचा बँकिंगचा अनुभव आणखी वाढवतील. "डीबीयू हे सर्वसामान्य नागरिकांसाठी राहणीमान सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे"ते म्हणाले. पंतप्रधानांनी माहिती दिली की अशा बँकिंग रचने द्वारेसरकार किमान पायाभूत सुविधांसह जास्तीत जास्त सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते आणि हे सर्व कोणत्याही कागदपत्रांचा समावेश न करता डिजिटल पद्धतीने होईल. एक मजबूत आणि सुरक्षित बँकिंग प्रणाली उपलब्ध करण्याबरोबरते बँकिंग प्रक्रिया सोपी देखील करेल. लहान शहरे आणि गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करणे आणि कर्ज घेणे यासारखे फायदे देखील मिळतील. भारतातल्या सामान्य माणसाचं जीवन सुलभ करण्यासाठी देशात सुरु असलेल्या प्रयत्नांच्या दिशेने डिजिटल बँकिंग युनिट्स हे आणखी एक मोठं पाऊल आहेते पुढे म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले कीसर्वसामान्य नागरिकाला सक्षम करणं आणि त्याला शक्तिशाली बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहेआणि परिणामीसर्वात वंचित घटकाचा विचार करून धोरणे बनवण्यात आली आणि त्यांच्या कल्याणाच्या दिशेने संपूर्ण सरकार वाटचाल करत आहे. सरकारने एकाच वेळी काम केलेअशा दोन क्षेत्रांकडे त्यांनी लक्ष वेधले. पहिलेबँकिंग प्रणालीमधील सुधारणाबळकटीकरण आणि पारदर्शकता आणि दुसरे म्हणजे आर्थिक समावेशन.

लोकांना बँकेत जावे लागायचेत्या भूतकाळातील पारंपरिक पद्धतीचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की सरकारने बँकेला लोकांपर्यंत आणून या दृष्टीकोनात बदल घडवला. बँकिंग सेवा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावीयाला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिलं ते म्हणाले. गरीबांनी बँकेत जाणं अपेक्षित असेत्या दिवसांपासून ते बँक गरीबांच्या दारात पोहोचण्यापर्यंतचा मोठा बदल घडून आला आहे. यामुळे गरीब आणि बँक यांच्यातलं अंतर कमी झालं आहे. आम्ही केवळ शारीरिक अंतरच नाहीतर सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक अंतर दूर केलं. दुर्गम भागाला बँकिंग प्रणालीशी जोडण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आज भारतातील 99 टक्क्यांहून  जास्त गावांमध्ये 5 किलोमीटरच्या परिघात बँकेची शाखाबँकेची इमारत अथवा ‘बँकिंग मित्र’ असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय टपाल बँकेच्या माध्यमातून टपाल कार्यालयांची विस्तृत मालिकेचा देखील वापर करण्यात आला आहेते म्हणाले. आज भारतातल्या एक लाख प्रौढ नागरिकांमागे बँक शाखांची संख्या जर्मनीचीन आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांपेक्षा जास्त आहे"ते पुढे म्हणाले.

काही विभागांमध्ये सुरुवातीला गैरसमज होतेतरी पंतप्रधान म्हणालेआज संपूर्ण देश जन धन बँक खात्यांची ताकत अनुभवत आहे. या बँक खात्यांमुळे सरकार वंचित घटकाला अत्यंत कमी हप्त्यामध्ये वीमा प्रदान करू शकल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे गरीबांसाठी तारण न घेता कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि लक्ष्यित लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध झाली. ही खाती घरंशौचालयंगॅस अनुदान आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ अखंडपणे सुनिश्चित करण्याची प्रमुख पद्धत होतीते म्हणाले. भारताच्या डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधांना जगात ओळख मिळाल्याचं पंतप्रधानांनी मान्य केलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) भारताच्या डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधांची प्रशंसा केली आहे. याचे श्रेय भारतातले गरीबशेतकरी आणि श्रमिकांना जातंज्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याला त्यांच्या जीवनाचा भाग बनवलंपंतप्रधानांनी नमूद केले.

युपीआय नं भारतासाठी नवीन शक्यता खुल्या केल्या,: पंतप्रधान पुढे म्हणालेआर्थिक भागीदारी जेव्हा डिजिटल भागीदारीशी जोडली जातेतेव्हा शक्यतांचं संपूर्ण नवं जग खुलं होतं. युपीआय सारखं मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. अशा प्रकारचं हे जगातलं पाहिलंच तंत्रज्ञान असल्यामुळेभारताला याचा अभिमान आहे. ते म्हणाले की आज 70 कोटी स्वदेशी ‘रूपे’ कार्ड कार्यान्वित आहेतअशा उत्पादनांचा दर्जा आणि त्याची निर्मिती करणारे परदेशी उत्पादकअसलेल्या काळापासून आज हा मोठा बदल घडून आला आहे. तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या संयोजनामुळे गरीबांची खरेदी करण्याची क्षमता आणि त्यांची प्रतिष्ठा वाढत आहे आणि मध्यम वर्ग सक्षम होत आहे. त्याच वेळीते देशातलं डिजिटल विभाजन देखील दूर करत आहेते म्हणाले. भ्रष्टाचार कमी करण्यामधील डीबीटीच्या भूमिकेची देखील त्यांनी प्रशंसा केली आणि म्हणाले की डीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये 25 लाख कोटीपेक्षा जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा पुढील हप्ता उद्या ते उद्या खात्यात जमा करतील अशी माहिती त्यांनी दिली. आज संपूर्ण जग या डीबीटीची आणि भारताच्या डिजिटल सामर्थ्याची प्रशंसा करत आहे. आज याच्याकडे जागतिक मॉडेल म्हणून पाहिलं जात आहे. जागतिक बँकेननं तर असंही म्हटलं आहे की डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यात भारत अग्रेसर ठरला आहेपंतप्रधान म्हणाले.            

फिनटेक ही भारताची धोरणे आणि प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे आणि ते भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. डिजिटल बँकिंग युनिट्स  फिनटेकची क्षमता आणखी वृद्धिंगत करतील. जन धन खात्यांनी जर देशातल्या आर्थिक समावेशकतेचा पाया रचला असेलतर फिनटेक हे आर्थिक क्रांतीचा आधार बनेलते म्हणाले.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल चलन सुरू करण्याच्या सरकारच्या घोषणेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी याकडे लक्ष वेधले की आगामी काळातील डिजिटल चलन असो किंवा आजच्या काळातील डिजिटल व्यवहार असोअर्थव्यवस्थे व्यतिरिक्त अनेक महत्वाचे पैलू त्यांच्याशी जोडले गेले आहेत.    

त्यांनी बचतभौतिक चलनाचा त्रास कमी करणे आणि पर्यावरणाचं रक्षण हा त्याचा प्रमुख फायदाया गोष्टींचा उल्लेख केला. चलनी नोटांच्या छपाईसाठीचा कागद आणि शाई आयात केली जातेआणि डिजिटल अर्थव्यवस्था आत्मसात करून आपण कागदाचा वापर करून पर्यावरणाचा फायदा करत आहोत आणि आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देत आहोतयाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 

आजचे बँकिंग आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे गेले असून  ‘सुशासन’ आणि ‘उत्तम सेवा वितरण’चे माध्यम बनले आहेयाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आज या प्रणालीमुळे खासगी क्षेत्र आणि लघु उद्योगांच्या विकासाच्या अपार शक्यता देखील वाढल्या आहेत. ते पुढे म्हणाले की भारतात क्वचितच असे क्षेत्र असेलज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन आणि सेवांचा पुरवठा नवीन स्टार्टअप परिसंस्था निर्माण होत नसेल. डिजिटल अर्थव्यवस्था ही आज आपल्या अर्थव्यवस्थेचीआपल्या स्टार्ट-अप विश्वाचीमेक-इन इंडियाची आणि आत्मनिर्भर भारताची मोठी क्षमता आहेते म्हणाले. आज आपले लघु उद्योगआपले एमएसएमई देखील जीईएम प्रणालीच्या माध्यमातून सरकारच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. आतापर्यंतजीईएम द्वारे रुपये 2.5 लाख कोटीहून जस्त मागणी नोंदवण्यात आली आहे. डिजिटल बँकिंग युनिट्सच्या माध्यमातून या दिशेने अनेक नवीन संधी निर्माण होतीलते म्हणाले.

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था बँकिंग प्रणाली जेवढी मजबूत असतेतेवढीच त्या देशाची अर्थव्यवस्था देखील प्रगतीशील असतेपंतप्रधानांनी टिप्पणी केली. ते म्हणाले की देश 2014 साला पूर्वीच्या ‘फोन बँकिंग प्रणाली’ कडून गेल्या 8 वर्षांमध्ये डिजिटल बँकिंग कडे वळला आहेपरिणामीभारताची अर्थव्यवस्था अखंड पुढे मार्गक्रमण करत आहे. जुन्या पद्धतींचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की2014 पूर्वी बँकांना त्यांचे कामकाज ठरवण्यासाठी फोन येत होते. ते पुढे म्हणाले की फोन बँकिंग मधील राजकारणाने बँकांना असुरक्षित बनवले होते आणि हजारो कोटी रुपयांच्या घोटाळयाचं बीज रोवून देशाची अर्थव्यवस्था असुरक्षित केली.        

सध्याच्या सरकारने या परिस्थितीत कसा कायापालट केला हे सांगताना पंतप्रधान म्हणाले की पारदर्शकता हीच केंद्रस्थानी होती. ते पुढे म्हणालेएनपीए ओळखण्यात पारदर्शकता आणल्यानंतर लाखो कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेत परत आणण्यात आले. आम्ही बँकांचे पुनर्भांडवलीकरण केलेकर्ज बुडवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली. त्यांनी पुढे नमूद केले कीपारदर्शक आणि वैज्ञानिक प्रणालीच्या निर्मितीसाठी कर्जासाठी तंत्रज्ञान आणि विश्लेषणाच्या वापराला प्रोत्साहन देऊन, IBC च्या मदतीने NPA-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले. बँकांच्या विलीनीकरणासारखे निर्णय धोरण लकव्याचे बळी ठरले आणि देश त्याला धैर्याने सामोरा गेला. या निर्णयांचं फलित आज आपल्यासमोर आहेते म्हणाले. डिजिटल बँकिंग युनिट्स आणि फिनटेकच्या नाविन्यपूर्ण वापरासारख्या नवीन उपक्रमांद्वारे बँकिंग प्रणालीसाठी आता एक नवीन स्वयं-चालित यंत्रणा तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्राहकांसाठी जेवढी स्वायत्तता आहेतेवढीच बँकांसाठीही सुविधा आणि पारदर्शकता आहेअसे सांगूनभागधारकांनी ही चळवळ पुढे न्यावीअसे आवाहन त्यांनी  केले.

गावांमधील लघु उद्योजकांनी डिजिटल व्यवहाराच्या दिशेने पूर्णपणे मार्गक्रमण करावं असे आवाहन पंतप्रधानांनी आपल्या आपल्या भाषणाचा समारोप करतानाकेले. देशाच्या फायद्यासाठी पूर्णपणे डिजिटल होण्यासाठी बँकांनी 100 व्यापाऱ्यांना त्यांच्याशी जोडावे असे आवाहनही त्यांनी केले. मला खात्री आहे की हा उपक्रम आपली बँकिंग प्रणाली आणि अर्थव्यवस्थेला अशा टप्प्यावर घेऊन जाईलजो भविष्यासाठी सज्ज असेलआणि जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असेलमोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनभारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्रीकेंद्रीय मंत्रीराज्य मंत्रीसंसद सदस्यबँकिंग क्षेत्रातील नेतृत्वतज्ञ आणि लाभधारक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी जोडले गेले.

पार्श्वभूमी

आर्थिक समावेशकता आणखी खोलवर नेण्यासाठी आणखी एक उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयु) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित केली.

2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग म्हणूनअर्थमंत्र्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ 75 जिल्ह्यांमध्ये 75 डीबीयु स्थापन करण्याची घोषणा केली होती. डिजिटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने डीबीयुची स्थापना केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकाखासगी क्षेत्रातील 12 बँका आणि एक लघु वित्तपुरवठा बँक या उपक्रमात सहभागी होत आहेत.

डीबीयु या बांधकाम केलेल्या अस्थापना असतील आणि लोकांना बचत खाते उघडणेखात्यातील रक्कम तपासणेपासबुक प्रिंट करणेपैसे अन्य खात्यात वळवणेमुदत ठेविमधील गुंतवणूककर्जासाठीचा अर्जजारी केलेल्या धनादेश थांबवण्याची सूचनाक्रेडिट/डेबिट कार्डसाठी अर्ज करणेखात्याचे विवरण पाहणेकर भरणेबिले भरणेनामांकन करणे यासारख्या विविध डिजिटल बँकिंग सुविधा प्रदान करतील.

डीबीयु ग्राहकांना बँकिंग सेवेचा किफायतशीरसोयीचा लाभ देतील आणि बँकिंग उत्पादने आणि सेवांचा डिजिटल अनुभव वर्षभर मिळवून देतील. त्या डिजिटल अर्थसाक्षरतेचा प्रसार करतील आणि सायबर सुरक्षा जागरुकता आणि सुरक्षा उपायांबाबत ग्राहकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाईल. तसेचग्राहकांना रीअल-टाइम (तात्काळ) सहाय्य करण्यासाठी आणि डीबीयु द्वारे थेट अथवा व्यावसायिक मदत पुरवठादार/संयोजक यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या सेवांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुरेशी डिजिटल यंत्रणा देखील डीबीयु मध्ये  उपलब्ध असेल.         

 


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Monday, 19 September 2022

Money in Marathi ओनलाइन Extra Income कमवण्याचे १० सोपे उपाय.

ओनलाइन Extra Income, नोकरी करता करता ओनलाइन Extra Income, केवळ पगारात तुमचे घर चालते का, ओनलाइन Extra Income कमवण्याचे १० सोपे उपाय, मराठी,



Wednesday, 7 September 2022

Money In Marathi: आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्या पैशांचा कसा वापर करावा

Want Financial Freedom, do these 9 things. तुम्ही कधी विचार केलात की तुमचा पैसा सुद्धा तुमच्या कडुन काही अपेक्षा ठेवतो, नाही ना. आणि या अपेक्षा जर तुम्ही पूर्ण केल्या तर आयुष्यात तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही. या भागात आपण पाहणार आहोत की आपला पैसा आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो.



Friday, 20 May 2022

ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तसेच व्यवसायातील गैरव्यवहार प्रकरणी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची ‘ओला’ आणि ‘उबर’ टॅक्सी सेवांना नोटीस

सुयोग्य ग्राहक तक्रार निवारण व्यवस्थेचा अभाव, सेवांमधील त्रुटी, सेवा रद्द केल्यास आकारले जाणारे अवाजवी दर आणि दर आकरण्यासाठीच्या अल्गोरिदमविषयी शंका, अशा मुद्यांवर सीसीपीए ने घेतली हरकत

सीसीपीए कडून, आयएसआय चिन्हाशिवाय विकल्या जाणाऱ्या आणि बीआयएस मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तू खरेदी न करण्याबाबत ग्राहकांनाही सावधगिरी आणि सुरक्षाविषयक सूचना जारी

 

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने ‘ओला’ आणि ‘उबर’ या दोन्ही ऑनलाईन टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांना व्यवसायात गैरव्यवहार करणे तसेच, ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

राष्ट्रीय, ग्राहक हेल्पलाईन (NCH) कडे मिळालेल्या माहितीनुसार, एक एप्रिल 2021 ते एक मे 2022 या एका वर्षाच्या काळात, ग्राहकांनी ‘ओला’ सेवेविरुद्ध 2,482 तक्रारी आणि ‘उबर’ विरोधात, 770 तक्रारी नोंदवल्या आहेत.

गेल्या आठवड्यात, या विभागाने, वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या- ओला, उबर, रॅपिडो, मेरू कॅब्स आणि जुगनू अशा सर्व सेवांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत त्यांना, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन चे भागीदार व्हावे असे निर्देश दिले होते, यामुळे, ग्राहकांना उत्तम दर्जाची तक्रार निवारण सेवा उपलब्ध होईल आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तसेच ई-कॉमर्स अधिनियमांचे अनुपालनही करता येईल.

या नोटीसमध्ये, उपस्थित करण्यात आलेल्या महत्वाच्या मुद्यांपैकी काही मुद्दे खालीलप्रमाणे :-

  • सेवेतील त्रुटी. ज्यात ग्राहकांच्या मदतीसाठी असलेल्या व्यवस्थेकडून मिळणारा सुमार प्रतिसाद,ऑनलाईन पद्धतीने पैसे घेण्यास चालकांनी दर्शवलेला नकार आणि केवळ रोख पैसे देण्याचा आग्रह, अधि एकाच मार्गावर कमी दर अकरलेला असतांनाही दुसऱ्यांदा त्याच मार्गासाठी, अधिक दर आकारणे, चालकांची वर्तणूक सभ्य, व्यावसायिक नसणे आणि एसी गाडी मिळेल, अशी ग्राहकांना हमी दिली असतांनाही चालकांनी एसी लावण्यास नकार देणे, यांचा समावेश आहे.
  • ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा अपुऱ्या असणे. ग्राहक तक्रार निवारण क्रमांक आणि तक्रार दाखल करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांचे नाव दोन्हीही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही.  
  • ग्राहकांनी बुक केलेली वाहतूक टॅक्सी सेवा किती वेळात रद्द करता येऊ शकेल, याची काहीही माहिती, याविषयी प्लॅटफॉर्म वर काहीही लिहिलेले नसतांना,  ग्राहकांकडून अधिक दंड आकाराला जाणे. जर ग्राहकाने सेवा रद्द केली तर त्याला किती दंड पडेल, याची माहिती प्लॅटफॉर्मवर कुठेही ठळकपणे लिहिलेली नाही. मात्र यामुळे, जेव्हा चालक सेवा द्यायला किंवा अमुक एका ठिकाणी ग्राहकांना घेऊन जाण्यास उत्सुक नसतात, दिरंगाई करतात, अशावेळी त्यांच्या अशा गैरवर्तणूकीमुळे सेवा रद्द केल्यास, त्याचा भुर्दंड ग्राहकांना विनाकारण भरावा लागतो.
  • दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकाच मार्गांवरुन जात असतांना, वेगवेगळे शुल्क का अकरले जाते, आणि यासाठी कोणती पद्धत अथवा नियम (अल्गोरिदम) असतात, हे स्पष्ट करणारी कुठलीही माहीती, या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध नाही.
  • काही अतिरिक्त सेवा घेण्याबाबत, आधीच बुकिंग करतांना टिक मार्क करण्याच्या बॉक्स (ह्या सेवा अतिरिक्त घेतल्या जाव्या याविषयी संमती देण्याचा तक्ता) मध्ये प्रत्येक वाहतूक सेवेआधी  ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेताच, त्याची संमती गृहीत धरणे.

सीसीपीए कडून, आयएसआय चिन्हाशिवाय विकल्या जाणाऱ्या आणि बीआयएस मानकांचे उल्लंघन करणाऱ्या  वस्तू खरेदी न करण्याबाबत ग्राहकांनाही सावधगिरी आणि सुरक्षाविषयक सूचना जारी करण्यात आल्या. 6-12-2021 रोजी हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर यांच्या संदर्भात पहिली नोटिस जारी करण्यात आली होती तर 16-12-2021 रोजी इमर्शन वॉटर हीटर, शिवण यंत्र, मायक्रोवेव ओव्हन, एलपीजीसहित स्थानिक गॅस स्टोव्ह इत्यादींसंदर्भात दुसरी नोटिस जारी केली होती.

A tabulated summary of the grievances by the consumers is as under:-

Company -Ola Cabs

Period - 1 Apr 2021 to 1 May 2022

Sr. No.

Nature of Grievances

Dockets Registered

%

1

Deficiency in Services

1340

54

2

Paid amount not refunded

521

21

3

Unauthorized charges

174

7

4

Charging more than MRP/ Overcharging

139

6

5

Promised gift not given/Wrong Promises

62

2

6

Account blocked/service barred.

50

2

7

Non/Delay in Delivery of Product/ Service

31

1

8

Amount debited but not credited to beneficiary.

29

1

9

Fraudulent Issue

12

1.0

10

Others

52

2

11

Sector Enquiry

72

3

 

Grand Total

2482

100

 

 

Company - Uber India

 Period - 1 Apr 2021 to 1 May 2022

Sr. No.

Nature of Grievances

Dockets Registered

%

1

Deficiency in Services

473

61

2

Paid amount not refunded

105

14

3

Unauthorized charges

38

5

4

Charging more than MRP.

37

5

5

Promised gift not given/  Wrong Promises

18

2

6

Non/Delay in Delivery of Product

17

2

7

Account blocked/service barred.

14

2

8

Fraudulent Issue

11

1

9

Amount debited but not credited to beneficiary.

7

1

10

Others

20

3

11

Sector Enquiry

30

4

 

Grand Total

770

100

 


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...