Friday, 8 October 2021

ऑफलाइन पद्धतीने किरकोळ डिजिटल पेमेंट (भरणा) पद्धत लागू केली जाणार

 

रिझर्व बँकेद्वारे व्याज दर जैसे थे

पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी उचललेल्या पावलांमुळे भाज्यांच्या किंमतींतील अस्थिरता कमी होईल

IMPS म्हणजे तत्काळ भरणा सेवेसाठी व्यवहार-रकमेची मर्यादा आता 5 लाख रुपये

ऑफलाइन पद्धतीने किरकोळ डिजिटल पेमेंट (भरणा) पद्धत लागू केली जाणार

बिगरबँक वित्तसंस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठा आणखी 6 महिने प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणून गणला जाणार

रिझर्व बँकेने सलग 8 व्या वेळेस मुख्य कर्ज दर - रेपो दर 4 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला आहे. रिव्हर्स रेपो दर देखील 3.35 टक्केच राहील. सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी जीडीपीचा अंदाज 9.5 टक्के आहे.

कोरोना साथीमुळे झालेल्या दुष्परिणामांचा सामना करण्याच्या दृष्टीने  वृद्धिदर कायम राखत चलनवाढ देखील नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने पतधोरणाचा पवित्रा सौम्य ठेवण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणेला गती मिळत आहे. पतधोरण समितीच्या गेल्या बैठकीच्या वेळेच्या तुलनेत सध्या भारतीय अर्थव्यवस्था पुष्कळच सावरली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

मार्जिनल स्टँडिंग सुविधा दर आणि बँक दर 4.25% वर कायम आहेत. रिव्हर्स रेपो दरही 3.35% वर कायम आहे असे त्यांनी सांगितले.

वाढीला बळकटी, चलनफुगवठ्या संदर्भातला मार्ग अपेक्षेपेक्षा अधिक अनुकूल असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या लवचिकतेमुळे सामान्य परिस्थतीकडे वाटचाल करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

एकूण मागणीत वाढ होत आहे तथापि, थोडी मंदगती कायम आहे. उत्पादन अद्यापि कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमीच आहे. सावरण्याचा दर धोरणात्मक पाठबळावर अवलंबून असून तो असमान असलेला दिसतो. प्रत्यक्ष संपर्क येणारी क्षेत्रे अद्यापि पिछाडीवर आहेत असे गव्हर्नर पुढे म्हणाले.

रेपो दर कायम ठेवण्यामागचा हेतू स्पष्ट करताना गवर्नर म्हणाले की इंधनावरील अप्रत्यक्ष कर आकारणी विचारपूर्वक सांभाळली जात आहे. खर्च वाढल्याने येणारी महागाई सौम्य करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच अर्थव्यवस्था जपून पावले टाकत असल्याचे सांगितले.

कोविड19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकूल परिणाम होऊनही जीडीपीचे जवळजवळ सर्व घटक पहिल्या तिमाहीत Q1 मध्ये दरवर्षी वाढले, हे अर्थव्यवस्थेची लवचिकता दर्शवते याकडे त्यांनी लक्ष वेधले. संसर्ग कमी होत आहे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो आहे, हे प्रयत्न खाजगी खपाला सहाय्यभूत ठरत आहेत, प्रलंबित मागणी आणि सणासुदीमुळे शहरी मागणी दुसऱ्या तिमाहीत आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वित्तीय वर्ष 2021-22 साठी स्थूल देशान्तर्गत उत्पादनाच्या वाढीचा वास्तव दर 9.5% राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार

दुसरी तिमाही - 7.9%

तिसरी तिमाही - 6.8%

चौथी तिमाही - 6.1%

पहिली तिमाही (2022-23)-17.2% असे जीडीपीचे आकडे त्यांनी दिले.

पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, 2021-22 मध्ये खरिपाचे उत्पादन विक्रमी झाल्याने  कृषीक्षेत्रात लवचिक सुधारणा झाल्याने ग्रामीण भागात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या भांडवली खर्चात वाढ झाल्यास  वित्तीय स्थिती अनुकूल राहिल्यास, गुंतवणूक सुधारू शकेल. गुंतवणुकीच्या गतीत वाढ होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर 2021 मध्ये सलग सातव्या महिन्यात निर्यात 30 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त राहिली, ती मजबूत जागतिक मागणी आणि धोरणात्मक पाठिंबा दर्शवते, आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान 400 अब्ज डॉलर्सचे निर्यात लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आहे असे ते म्हणाले. सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी उचललेल्या पावलांमुळे भाज्यांच्या किंमतींतील अस्थिरता कमी होण्यास तसेच खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास मदत झाली आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक निवळत आहे. कोविड -19 महामारीच्या सुरुवातीपासून, आरबीआयने आर्थिक व्यवस्थेत पुरेशी अतिरिक्त तरलता सुनिश्चित करण्यासाठी वाढ आणि पुनर्प्राप्तीकरता उपाययोजना केल्या. सप्टेंबर २०२१ दरम्यान अतिरिक्त तरलतेची पातळी आणखी वाढली आहे अशी माहिती त्यांनी दिली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहा महिन्यांत खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे 2.37 लाख कोटी रुपयांचे खेळते भांडवल आरबीआयने वित्तीय व्यवस्थेत आणले. (संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 3.1 लाख कोटी रुपये )

वित्तीय बाजारपेठा किंवा आर्थिक व्यवहारांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेत पुरेशी रोखता असण्याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही असे ते म्हणाले. रिव्हर्स रेपो दरातील चलमानतेचे 14 दिवसांचे वेळापत्रक देत आहोत.

अर्थव्यवस्थेतील रोखतेच्या प्रमाणानुसार, लिलावाखेरीज अन्य उपाययोजना ठरवल्या जातील. संबंधित भागीदारांशी सल्लामसलत करून रिजर्व बँकेने केलेल्या मूल्यमापनानुसार सदर निर्णय घेतले गेले आहेत असे त्यांनी सांगितले.यामध्ये बँकांवर कोणतीही सक्ती नसून संबंधित सर्व कामकाज ऐच्छिक पद्धतीने करायचे आहे. हळूहळू सुधारणा करण्याचा विचार आहे असे श्री दास म्हणाले.

 

आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने रिझर्व बँकेने काही महत्वाचे उपाय योजले आहेत. त्यानुसार,

 

  1. ऑफलाइन पद्धतीने किरकोळ डिजिटल पेमेंट (भरणा) पद्धत लागू केली जाणार असून ऑगस्ट 2020 पासून घेतलेल्या प्रायोगिक चाचण्यांच्या यशस्वितेमुळे, ऑफलाइन डिजिटल पद्धतीने किरकोळ पेमेंट (भरणा) करण्याचा आराखडा देशभर लागू करण्यात येणार आहे. इंटरनेट सुविधा नसलेल्या दुर्गम भागातही याचा उपयोग होणार असल्याचे गव्हर्नर म्हणाले.
  2. IMPS म्हणजे तत्काळ भरणा सेवेसाठी व्यवहार-रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. देशान्तर्गत निधी हस्तान्तरण ताबडतोब  आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास करून देणाऱ्या IMPS सुविधेचे महत्त्व लक्षात घेऊन, ग्राहकांच्या सोयीसाठी हा बदल केला आहे.
  3. भरणा सुविधा असणारी ठिकाणे नकाशावर दाखवणे -भरणा सुविधा केंद्रे कमी असणाऱ्या भागांत त्या केंद्रांच्या जिओ टॅगिंगचा म्हणजे ती केंद्रे ऑनलाइन नकाशावर दाखवण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे पेमेंट स्वीकारणाऱ्या नव्या-जुन्या केंद्रांची ठिकाणे अचूक कळण्यास मदत होईल. ही नकाशासुविधा व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  4. रिजर्व बँकेच्या नियामक तरतुदींमध्ये गैरव्यवहार प्रतिबंधकाचा नव्याने समावेश -वित्त-तंत्रज्ञान प्रणालीस अधिक गती देण्यासाठी, वित्तीय गैरव्यवहारांना आळा घालणारा  त्यावर उपाययोजना करणारा नवीन चौथा प्रतिबंधक समाविष्ट केला जाणार आहे. यापूर्वीच्या संकल्पनांसाठी ऑन-टॅप अप्लिकेशन सुविधा दिल्या जाणार आहेत. वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रात सतत अभिनव विचार आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  5. बिगरबँक वित्तसंस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठा हा प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणूनच यापुढेही गणला जाईल. अर्थव्यवस्थेतील वंचितांना बिगरबँक वित्त संस्थांमधून मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर, शेती, सूक्ष्म; लघु  मध्यम उद्योग आणि गृहनिर्माण यासह अशा संस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठाही प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणून गणला जात आहे. या सुविधेस आणखी सहा महिने म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
  6. बिगरबँक वित्तसंस्थांसाठी अंतर्गत लोकपाल योजना- बिगरबँक वित्तसंस्थांपैकी काही - ग्राहकसंख्या आणि व्यवहार अधिक असणाऱ्या- श्रेणींसाठी, अंतर्गत तक्रार निवारण व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू केली जाणार आहे.

 

अवघड आह्वानांवर मात करू शकणाऱ्या अजेय अशा मानवी स्फूर्तीविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. आपण संकटाचे रूपान्तर संधीत करायला शिकलो आहोत. मिळालेल्या यशाच्या आनंदात आपण विसावून जाणे योग्य नव्हे, तर यापुढे जे यश संपादन करायचे आहे त्यासाठी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. "धीर सोडणे म्हणजे लढाई हरणे" - असे गांधीजींचे सुवचन वापरून, रिजर्व बँकेचे गवर्नर शक्तिकान्त दास यांनी मुद्राधोरणावरील निवेदनाचा समारोप केला.

 

गव्हर्नरांचे संपूर्ण भाषण येथे पाहा. भाषणाचा व्हिडीओ येथे पहा. चलनविषयक धोरण समितीचे आर्थिक धोरण विवरण येथे पाहा


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Tuesday, 28 September 2021

सरकारने कौटुंबिक निवृत्तिवेतनासाठी दिव्यांग अवलंबितांची उत्पन्न मर्यादा वाढवली

 ठळक वैशिष्ट्ये :

  • कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त मुले/भावंडांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ
  • महागाई भत्त्यासह कौटुंबिक पेन्शन व्यतिरिक्त इतर स्त्रोतांद्वारे सध्याच्या मासिक 9,000/- रुपये पात्रता उत्पन्न मर्यादेत वाढ

संरक्षण मंत्रालयाने मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त मुले/भावंडांना कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्यासाठी उत्पन्नाचे निकष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारअसे मूल/भावंड आजीवन कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र असेलजर त्याचे/तिचे  कौटुंबिक निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांद्वारे  एकूण उत्पन्न सामान्य दराने  पात्र कौटुंबिक निवृत्तीवेतनापेक्षा कमी असेल म्हणजेच मृत सरकारी कर्मचाऱ्याच्या  शेवटच्या वेतनाच्या 30% अधिक महागाई भत्ता पॆक्षा कमी असेल.

अशा प्रकरणांमध्ये आर्थिक लाभ 08.02.2021 पासून लागू होईल. सध्याअपंग मूल/भावंड कौटुंबिक निवृत्तीवेतनसाठी पात्र आहे जर अपंग मुलाचे/भावंडांचे एकूण मासिक उत्पन्न महागाई भत्त्यासह  9,000/ रुपयांपेक्षा  जास्त नसेल तर.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



एमएसएमई/उद्यम नोंदणीच्या नवीन ऑनलाइन प्रणालीने पार केला 50 लाखांचा टप्पा

 केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने एमएसएमई/उद्यम नोंदणीची नवीन ऑनलाइन प्रणाली1 जुलै2020 पासून लागू केली. ही प्रणाली वेळ आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर उतरली असून आतापर्यंत 50 लाखांहून अधिक एमएसएमईंनी  इथे यशस्वीरित्या स्वतःची नोंदणी केली आहे.  यामध्ये 47 लाखांहून अधिक सूक्ष्म संस्था आणि 2.7 लाख लघु एककांचा समावेश आहे.

एमएसएमई मंत्रालयाने एमएसएमईची व्याख्या आणि नोंदणी प्रक्रिया यात 1 जुलै2020 पासून सुधारणा केली आहे.

एमएसएमई/उद्यम नोंदणीसाठी एक नवीन पोर्टल (https://udyamregistration.gov.in)देखील सुरू केले आहे.  तेव्हापासून हे पोर्टल सुरळीत काम करत आहे.  हया पोर्टलचे सीबीडीटी आणि जीएसटी नेटवर्क तसेच जीईएमसह प्रवाहीपणे एकत्रिकरण केले आहे. या एकत्रीकरणाद्वारेआता एमएसएमईचे सर्व कामकाज कागदरहीत झाले आहे.

एमएसएमई मंत्रालय आणि इतर सरकारी संस्थांचा लाभ घेण्यासाठी जे उद्योग अद्याप नोंदणीकृत नाहीत त्यांनी स्वतःची नोंदणी करावी.  नोंदणी विनामूल्य आहे आणि ती फक्त सरकारी पोर्टलवरच केली पाहिजे.  उद्योजक कोणत्याही मदतीसाठी,  जवळच्या डीआयसी  किंवा चॅम्पीयन्सच्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधू शकतात किंवा https://champions.gov.in वर लिहून कळवू शकतात.

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Sunday, 26 September 2021

भारताला आणखी चार किंवा पाच SBI सारख्या बँकांची गरज आहे: अर्थमंत्री निर्मला सीतारमण

बँकांच्या विलीनीकरणाच्या सुरळीत पार पडत असलेल्या प्रक्रियेसाठी अर्थमंत्र्यांचे गौरवोद्गार

भारतीय बँकिंगचे दीर्घकालीन भविष्य मोठ्या प्रमाणावर डिजीटल प्रक्रियेवर अवलंबून

महामारीच्या काळात   बँका देशाच्या दुर्गम भागातील लोकांना मदत करण्यासाठी  कार्यरत होत्या त्याच विशेषत: महामारीच्या  काळात बँकर्ससमोर असलेले एक मोठे आव्हान म्हणजे सरकारचा बँकांच्या विलीनीकरणाचा कार्यक्रम होता. विलीनीकरणाने ग्राहकांची गैरसोय होणार नाही हे विविध बँकांनी एकमेकांशी संवाद साधून सुनिश्चित केल्याबद्दल वित्तमंत्र्यांनी  बँकांची प्रशंसा केली.  भारतीय बॅंक्स संघटनेच्या  74 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अंतिम सत्रात त्या बोलत होत्या. 

महामारीच्या काळात ग्राहकांना सेवा देण्यासाठी तुम्ही स्वत: ला उपलब्ध ठेवले आहे, तसेच हे  बँकांचे विलीनीकरण कोणत्याही मतभेदाशिवाय झाले आहे. ज्या प्रकारे अर्थव्यवस्था एका वेगवेगळ्या परिस्थितीतून पुढे सरकत आहे, उद्योग बदलत आहेत, त्यामुळे अनेक नवीन आव्हाने उभी आहेत त्यामुळे हे समोर आले की भारताला फक्त अधिकच नाही तर मोठ्या बँकांची गरज आहे. भारताला आणखी चार किंवा पाच  SBIs ची  गरज आहे, अर्थव्यवस्था आणि उद्योगाच्या अलीकडच्या वास्तविक  बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बँकिंग वाढवण्याची गरज आहे, असे  श्रीमती निर्मला सीतारमण  म्हणाल्या.

अनेक देशांतील बँका महामारीच्या  काळात त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, भारतीय बँकांच्या डिजिटायझेशनमुळे आपल्याला  DBT आणि डिजिटल यंत्रणेद्वारे लहान, मध्यम आणि मोठ्या खातेधारकांकडे  पैसे हस्तांतरित करण्यासाठी  मदत झाली.

परंतु डिजिटल सुविधांमध्ये  मोठ्या प्रमाणावर असमानता  देखील आहे, म्हणूनच भविष्यातील आपल्याला या पैलूचा देखील विचार करावा लागेल; आपल्या देशात असे काही भाग आहेत जेथे बँकांची आणि कर्मचाऱ्यांची भौतिक उपस्थिती आवश्यक आहे. असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या की  विलीनीकरण झालेल्या बँकांच्या पलीकडे आणि विलीन नसलेल्या वेगवेगळ्या बँकांमध्येही, वेगवेगळ्या बँकांच्या प्रणाली मर्यादित  राहू नयेत, त्यांना एकमेकांशी संपर्कात राहता आले पाहिजे.

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी आणि कर्ज पुनर्रचना कंपनी लि.ची स्थापना करण्यासाठी एकत्र आल्याबद्दल वित्तमंत्र्यांनी आभार व्यक्त केले, एकत्र काम केल्याने ते अनुत्पादित मालमत्तेची  पुनर्रचना आणि विक्री करू शकतील. वित्तमंत्र्यांनी नमूद केले की, NARCL ही ' बॅड बँक' नाही ,ही एक संरचना आहे जिचा उद्देश बँकांच्या मालमत्ता मोकळ्या करणे  आणि अनुत्पादित मालमत्ता  वेगाने  निकालात काढणे हा आहे.

आठ बँका एकत्र येऊन खाते एकत्रीकरण  आराखडा  तयार करत आहेत,  यामुळे लोकांना  दर्जेदार खाती निवडता येतील, लोकांना स्वेच्छेने त्यांची माहिती देण्यासाठी  करण्यास प्रोत्साहित केले जाईल, यामुळे पतपुरवठा पोहोचण्यात  सुधारणा होईल याबद्दल वित्तमंत्र्यांनी प्रशंसा केली. जर खाते एकत्रीकरण  आराखडा  चांगल्या प्रकारे उपयोगात आणला  गेला तर आपल्याला  विशेष क्रेडिट आउटरीचची आवश्यकता नाही, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

देशाच्या पूर्वेकडील भागात पुरेसे CASA, (चालू खाते बचत खाती ) आहेत  परंतु कर्ज घेणारे नाहीत; आपल्याला या समस्येचे निराकरण करण्याची आवश्यकता आहे आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये आपण त्या क्षेत्रांमध्ये कसे कर्ज देऊ शकतो  ते पाहायला हवे असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले

आज पेमेंटच्या जगात, भारतीय UPI ने खरंच खूप मोठा ठसा उमटवला आहे आणि एक रुपे कार्ड जे परदेशी कार्डाइतके आकर्षक नव्हते ते आता जगाच्या विविध भागांमध्ये स्वीकारले गेले आहे, जे भारताच्या भविष्यातील डिजिटल पेमेंट क्षमतेचे प्रतीक आहे. आर्थिक तंत्रज्ञानाचा  यूपीआय  कणा आहे आणि तुम्हाला त्याला प्रोत्साहन द्यावे लागेल , तुम्हाला UPI  बळकट  करावे लागेल असे वित्तमंत्र्यांनी  बँकांना आवाहन केले

पुढे अर्थमंत्री म्हणाल्या की  सरकार वित्तीय विकास संस्था घेऊन येत आहे, आम्ही DFIs साठी खाजगी क्षेत्रात देखील पुरेशी तरतूद केली आहे,आम्हाला आशा आहे की , स्पर्धात्मक किमतीत निधी  उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील DFIs मध्ये चांगली स्पर्धा  निर्माण होईल.

आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्वाच्या  टप्प्यावर आहोत, तुम्ही त्याचा कणा आहात, माझी इच्छा आहे की IBA चा  या प्रसंगी प्रगती साधेल आणि भारताला सर्वोत्तम आर्थिक सेवा प्रदान करेल. असे शेवटी श्रीमती सीतारमण म्हणाल्या.

यावेळी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवत कराड म्हणाले की  1946 पासून सुरु झाल्या  भारतीय बँक संघटनेची सदस्य संख्या वाढून  22 बँकांवरून 2021 पर्यंत 244 बँकांपर्यंत पोहोचली आहे.  बँक ग्राहकांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची स्वीकृती आणि अंमलबजावणीसाठी मी IBA चे अभिनंदन करतो

सर्व बँकांना EASE 3.0 आणि 4.0 सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आणि बँकांचे आधुनिकीकरण करावे लागेल. डिजिटल अर्थव्यवस्था महत्वाची असताना, डिजिटल व्यवहारांमधील  फसवणूकीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज श्री कराड यांनी व्यक्त केली.

PMJDY, PMJJBY, PMSBY आणि APY सारख्या सामाजिक सुरक्षा योजना आर्थिक समावेशनासाठी  सहाय्यकारी आहेत ,आपल्याला  आर्थिक साक्षरता सुधारून या योजना पुढे नेल्या पाहिजेत.  लोकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या  देणाऱ्या सरकारच्या थेट लाभ हस्तानंतरण योजनेत जनधन- आधार - मोबाईल ही त्रिसूत्री महत्वाची भूमिका बजावत आहे, असे श्री कराड म्हणाले.

भारतीय बँक संघटनेच्या 74 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत , सार्वजनिक, खाजगी, परदेशी, सहकारी बँकांसह  वित्तीय संस्था आणि एनबीएससीच्या  सुरुवातीच्या 22 सदस्यांसह मर्यादितरित्या सुरु झालेला आणि  244 सदस्यांपर्यंत  पोहोचलेल्या एका मोठ्या  संघटनेच्या  प्रगतीचा  75 वर्षांचा प्रवास भारतीय बँक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुनील मेहता यांनी मांडला.

 

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...