Thursday, 16 September 2021

पीएफसीने जारी केला भारताचा पहिला युरो ग्रीन बाँड

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने दिनांक 13.09.2021 रोजी आपले पहिले 7 वर्षे मुदतीचे 300 दशलक्ष युरो किमतीचे बाँन्ड्स यशस्वीपणे जारी केले आहेत. युरो बाजारात भारतीय कंपनीने जारी केलेल्या या बाँन्ड्सना 1.841% इतके कमीत कमी उत्पन्न नक्की झाले आहे.

हा भारताकडून जारी झालेला पहिला युरो ग्रीन बाँन्ड इन्शुरन्स आहे. तसेच बिगर बँकींग वित्तीय कंपनीने सुरु केलेला पहिला युरो इन्शुरन्स आहेत्याशिवाय भारतातून 2017 नंतर जारी झालेला हा पहिला युरो बाँन्ड इन्शुरन्स आहे.

या विमाबाँन्ड्समध्ये 82 खात्यांसह सहभाग नोंदवत आशिया आणि युरोपातील संस्थागत गुंतवणूकदार सक्रीय सहभागी झाले असून त्याला 2.65 पट प्रतिसाद मिळाला आहे.

(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडने, थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या हमीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडने (नॅशनल  अ‍ॅसेट  रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड  एनएआरसीएल)  थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे  पावती  साठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली.

रिझर्व बँकेच्या सध्याच्या नियमाअंतर्गत  2 लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्ज मालमत्ता टप्याटप्याने अधिग्रहीत करण्याचा राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडचा प्रस्ताव आहे. 15% रक्कम रोख  स्वरुपात आणि 85 % रोखे  पावती  (एसआरएस) च्या रुपात अधिग्रहीत करण्याचा मानस आहे. राष्ट्रीय  मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडने थकीत कर्ज मालमत्ता  अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखपावतीसाठी केंद्र सरकारची हमी  देण्यासंदर्भात वारंवार विचारल्या  जाणाऱ्या  खालील प्रश्नाच्या उत्तरातून विविध पैलू उलगडले जातात.

  1. राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड ( एनएआरसीएल)म्हणजे काय ती  कोणी स्थापन केली आहे ?

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडची स्थापना कंपनी कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे आणि अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी) म्हणून रिझर्व बँकेकडे परवान्यासाठी अर्ज  केला आहे. बँकांनी आपल्या थकीत कर्जाच्या निराकरणाकरिता  कर्ज एकत्रित करण्यासाठी एनएआरसीएलची स्थापना केली आहे. राष्ट्रीय  मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची 51% भागीदारी  राहील.

  1. भारत कर्ज निवारण कंपनी लिमिटेड (आयडीआरसीएल) म्हणजे काय याची स्थापना कोणी केली ?

भारत कर्ज निवारण कंपनी लिमिटेड  आयडीआरसीएल ही सेवा कंपनी / कार्यान्वयन कंपनी आहे जी मालमत्तेचे  व्यवस्थापन करेल आणि बाजार विषयक तज्ञांची सेवा घेईल. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका  आणि सार्वजनिक वित्तीय संस्थाचे कमाल 49% भांडवल तर उर्वरित खाजगी क्षेत्रातल्या बँका / कर्जदात्यांकडे असेल.

  1. देशात 28 मालमत्ता पुनर्बांधणी   कंपन्या असतानाही राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड- भारत कर्ज निवारण  कंपनी लिमिटेड   पद्धतीच्या रचनांची आवश्यकता का भासते 

सध्या अस्तित्वात असलेल्या मालमत्ता पुनर्बांधणी  कंपन्या या विशेषकरून अल्प मूल्याच्या थकीत कर्जाचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त  आहेत. आयबीसीसह विविध उपलब्ध निराकरण यंत्रणा उपयुक्त ठरल्याचे दिसून येत आहे.  मात्र आधीची मोठ्या प्रमाणातली अनुत्पादित मालमत्ता लक्षात घेता अतिरिक्त पर्यायाची  आवश्यकता होती आणि केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेली  एनएआरसीएल- आयडीआरसीएल संरचना हा  असा  उपक्रम आहे.

  1. सरकारी हमीची आवश्यकता का आहे ?

साठून राहिलेल्या अनुत्पादित मालमत्तांच्या संदर्भात निवारण  यंत्रणेमध्ये सरकारकडून पाठबळ आवश्यक असते. यामुळे विश्वासार्हता निर्माण होऊन आकस्मिक  बफर प्रदान केला जातो. म्हणूनच भारत सरकारची 30,600  कोटी रुपयांपर्यंतची हमी राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या रोखे पावती  (एसआरएस ) ला पाठबळ देईल. पाच वर्षासाठी ही हमी वैध राहील.  रोखे पावती  चे दर्शनी मूल्य आणि वास्तव जमा यातली तफावत याचा  हमीमध्ये अंतर्भाव राहील. ह्या रोखे पावती  ची खरेदी-विक्री शक्य असल्याने भारत सरकारच्या हमीमुळे या रोखे पावती  ची रोखता वृद्धीगत होईल.

  1. राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड (एनएआरसीएल) आणि .. भारत कर्ज निवारण कंपनी लिमिटेड  (आयडीआरसीएल) यांचे काम कसे चालते ?

अग्रणी बँकेला प्रस्ताव देऊन  राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड मालमत्तेचे अधिग्रहण करेल. एनएआरसीएलच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर व्यवस्थापन आणि मूल्य वर्धनासाठी भारत कर्ज निवारण  कंपनी लिमिटेड काम करेल .

  1. या नव्या रचनेतून बँकांना काय लाभ मिळेल ?

थकीत कर्ज मालमत्तांबाबत तोडगा   काढण्यासाठी त्वरेने  पावले उचलण्यासाठी यामुळे  प्रोत्साहन मिळेल. यातून उत्तम मूल्य प्राप्तीसाठी मदत होईल. या दृष्टिकोनामुळे बँकेच्या  कर्मचाऱ्यांना व्यवसाय  वाढवण्यासाठी आणि ऋण वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वाव  मिळेल. या थकीत कर्ज मालमत्ता आणि रोखे पावती  धारक म्हणून बँकांना फायदा मिळेल. याशिवाय बँकेच्या मूल्यांकनात सुधारणा होऊन  बाजारातून भांडवल उभारण्याच्या क्षमतेत वाढ होईल.

  1. याची स्थापना आत्ता का करण्यात येत आहे ?

दिवाळखोरी आणि नादारी कायदा ( आयबीसी )एसएआरएफएइएसआय (SARFAESI )कायदा  आणि कर्ज वसुली लवाद त्याच बरोबर मोठ्या मूल्याच्या अनुत्पादित मालमत्तेसाठी बँकांमध्ये समर्पित थकीत मालमत्ता व्यवस्थापन रचना उभारणी यामुळे वसुलीवर अधिक  लक्ष केंद्रित झाले आहे. इतके प्रयत्न असूनही बँकांच्या ताळेबंदामध्ये अनुत्पादित मालमत्तांचे  लक्षणीय प्रमाण दिसून येतच आहे कारण थकीत मालमत्ताचे प्रमाण मोठे आहेच आणि ते  विविध कर्जदात्यांमध्ये विभागले गेले आहे असे  मालमत्ता गुणवत्ता आढाव्यातून उघड झाले आहे. बँकांनी जुन्या अनुत्पादित मालमत्तांसाठी केलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या तरतुदींमुळे  वेगवान निवारणासाठी अनोखी संधी प्राप्त झाली आहे.

  1. हमी वापरली जाण्याची शक्यता आहे का ?

मालमत्तेतून प्राप्त झालेली रक्कम आणि त्या मालमत्तेसाठी जारी केलेल्या रोखे पावती चे दर्शनी मूल्य यातली तफावतसरकारी हमीमध्ये अंतर्भूत असेल. यासाठी 30,600 कोटी रुपये  मर्यादा असून पाच वर्षाची वैधता आहे.इथे  मालमत्तांचा संचय करण्यात आला असल्यानेअनेकांमध्ये,  प्राप्त झालेले मूल्य हे  अधिग्रहण किमतीपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे.

  1. सरकार वेगवान आणि वेळेवर तोडगा कसा सुनिश्चित करेल ?

भारत सरकारची हमी पाच वर्षासाठी वैध राहील आणि हमी लागू करण्यासाठी   अट म्हणजे  निराकरण किंवा अवसायन असेल. निराकरणात विलंब होऊ नये या दृष्टीने या काळाप्रमाणे वाढणारे  हमी शुल्क एनएआरसीएलला द्यावे लागेल.

  1. राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड च्या भांडवलाची रचना कशी असेल आणि सरकारचे योगदान किती असेल ?

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड चे भांडवल बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्याकडून  इक्विटी द्वारे असेलआवश्यकतेनुसार कर्जही उभारता येईल. भारत सरकारच्या हमीमुळे अग्रिम भांडवलीकरण आवश्यकता कमी होईल.

  1. थकीत कर्जाच्या निवारणासाठी  राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड चे धोरण काय असेल ?

500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या एकूण 2 लाख कोटी रुपयांच्या  थकीत कर्जाचे  निवारण करण्याचा  राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड चा उद्देश आहे.  पहिल्या  टप्यात 90,000 कोटी रुपयांची पूर्णतः तरतूद करण्यात आलेली  संपत्ती एनएआरसीएलकडे हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे. तर कमी तरतूद असलेली  उर्वरित मालमत्ता दुसऱ्या टप्यात हस्तांतरित करण्यात येईल.



(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Friday, 10 September 2021

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्ज पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली

 संचार मंत्रालयटपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या  4.5 कोटी ग्राहकांना गृह कर्ज उत्पादने पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 650  शाखांचे  मजबूत आणि व्यापक जाळे  आणि 136,000 पेक्षा जास्त बँकिंग ऍक्सेस  पॉइंट्सद्वारेएलआयसी हाऊसिंग फायनान्सची गृह कर्ज उत्पादने संपूर्ण भारतातील ग्राहकांना उपलब्ध करून देईल.

सामंजस्य कराराचा भाग म्हणूनसर्व गृह कर्जासाठी क्रेडिट अंडरराइटिंगप्रोसेसिंग आणि वितरण हे एलआयसीएचएफएल करेल आणि  सोर्सिंगसाठी आयपीपीबी जबाबदार असेल.  एलआयसीएचएफएलसोबतची भागीदारी ही आयपीपीबीची उत्पादने  आणि सेवांची श्रेणी वाढवण्याच्या आणि देशभरातील वैविध्यपूर्ण ग्राहकांच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. सध्याआयपीपीबी अग्रगण्य विमा कंपन्यांसह भागीदारीद्वारे विविध सामान्य आणि जीवन विमा उत्पादने वितरीत करत आहे आणि शेवटच्या मैलावरील  ग्राहकांसाठी कर्ज उत्पादने हा नैसर्गिक विस्तार आहेत. आयपीपीबीचे  सुमारे 200,000 टपाल कर्मचारी (पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक) मायक्रो-एटीएम आणि बायोमेट्रिक उपकरणांसह सुसज्ज असून नावीन्यपूर्ण डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे एलआयसीएचएफएलचे गृहकर्ज देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडपगारदार व्यक्तींसाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी 6.66% दराने गृह कर्ज देते. देण्यात आलेला व्याजाचा दर कर्जदाराच्या पत संबंधी पात्रतेशी जोडलेला आहेजो त्यांच्या सिबिल  स्कोअरमध्ये दिसून येतो.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे विशिष्ट  गृहकर्ज उत्पादन - गृहवरिष्ठ - हे पीएसयू विमाधारककेंद्र/राज्य सरकाररेल्वेसंरक्षणबँकांचे सेवानिवृत्त किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यात परिभाषित लाभ पेन्शन योजनेअंतर्गत ते निवृत्तिवेतनासाठी पात्र आहेत. कर्ज घेण्याच्या वेळी कर्जदाराचे वय 65 वर्षांपर्यंत असू शकते आणि कर्जाची मुदत 80 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत,यापैकी  जे आधी असेल. या उत्पादनाअंतर्गत एलआयसी एचएफएल कर्जदाराला कर्जाच्या कार्यकाळात 6  हप्ते माफ करते.


(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



फेसलेस मूल्यांकन प्रक्रियेत सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी सुलभ करण्यासाठी सीबीडीटीने प्राप्तिकर नियम, 1962 मध्ये सुधारणा केली

 फेसलेस मूल्यांकन प्रक्रियेत सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी  सुलभ करण्यासाठीसरकारने प्राप्तिकर  नियम1962  मध्ये अधिसूचना क्र. 616 (ई) दिनांक 6 सप्टेंबर2021 द्वारे सुधारणा केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलमध्ये करदात्यांच्या नोंदणीकृत खात्याद्वारे सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक तपशीलाची इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) द्वारे करदात्याने पडताळणी केल्याचे मानले जाईल अशी तरतूद सुधारित नियमांमध्ये आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती प्राप्तिकर  विभागाच्या विशिष्ट पोर्टलवर आपल्या नोंदणीकृत खात्यात लॉग इन करून इलेक्ट्रॉनिक तपशील दाखल करते तेव्हा  इलेक्ट्रॉनिक तपशीलाची  ईव्हीसी  द्वारे प्राप्तिकर कायदयाच्या कलम 144B (7) (i) (b) साठी पडताळणी केली आहे असे मानले जाईल .

मात्र प्राप्तिकर कायदयाच्या कलम 144B (7) (i) (b) च्या विद्यमान तरतुदींनुसारईव्हीसी द्वारे पडताळणीची ही सरलीकृत प्रक्रिया विशिष्ट व्यक्तींसाठी उपलब्ध नाही (उदा . कंपन्याकर लेखापरीक्षण प्रकरणे  इ.) आणि डिजिटल स्वाक्षरीद्वारे इलेक्ट्रॉनिक तपशीलाची पडताळणी करणे अनिवार्य आहे. या व्यक्तींना ईव्हीसी द्वारे पडताळणीच्या सुलभ  प्रक्रियेचा लाभ देण्यासाठीया व्यक्तींना ईव्हीसी द्वारे पडताळणीची सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनचज्या व्यक्तींना डिजिटल स्वाक्षरीद्वारे इलेक्ट्रॉनिक नोंदी  प्रमाणित करणे अनिवार्य आहे त्यांनी प्राप्तिकर  विभागाच्या पोर्टलमध्ये त्यांच्या नोंदणीकृत खात्याद्वारे नोंदी भरल्यावर  इलेक्ट्रॉनिक नोंदीची  पडताळणी केल्याचे मानले जाईल. यासंदर्भात कायदेशीर सुधारणा योग्य वेळी प्रस्तावित केल्या जातील.


(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमत निर्धारित

 

विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ

विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देणे हे किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचे उद्दिष्ट

गहू, रॅपसीड आणि मोहरी या तेल बियांसह मसूर, हरभरा, बार्ली आणि करडई या पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक मोबदला मिळण्याचा अंदाज

तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमत निर्धारित

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतील वाढ शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे सुनिश्चित करेल

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व  रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत मसूर ,रॅपसीड आणि मोहरी  (प्रत्येकी 400 रुपये प्रति क्विंटल) आणि हरभरा (130 रुपये प्रति क्विंटल) या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत सर्वाधिक संपूर्ण  वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे .करडईच्या बाबतीत, हमीभावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 114 रुपयांची वाढ झाली आहे.विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, विविध पिकांसाठी वेगवेगळी किमान आधारभूत किंमत देण्याचा उद्देश आहे.

विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (रु. क्विंटलमध्ये)

Crops

MSP for RMS 2021-22

 

MSP for RMS 2022-23

 

Cost* of production 2022-23

Increase in MSP

(Absolute)

Return over cost (in per cent)

Wheat

1975

2015

1008

40

100

Barley

1600

1635

1019

35

60

Gram

5100

5230

3004

130

74

Lentil (Masur)

5100

5500

3079

400

79

Rapeseed &

Mustard

4650

5050

2523

400

100

Safflower

5327

5441

3627

114

50

* सर्वसमावेशक खर्चाचा संदर्भ देत, मजुरांची मजुरी , बैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि अन्य  कामांची मजुरी , भाडेतत्वार घेलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क यासारख्या भौतिक साहित्याच्या  वापरावर झालेला खर्च,अवजारे आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावर व्याज, पंप संच इत्यादींसाठी डिझेल/वीज इ., विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमांचे मूल्य याचा सर्व देय खर्चामध्ये  समावेश आहे.

 

शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर मोबदला मिळावा या उद्देशाने, किमान आधारभूत किंमतीत देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ निश्चित करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये करण्यात आली होती या घोषणेच्या अनुरूप,  रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा हा निर्णय  घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर अपेक्षित मोबदला गहू , रॅपसीड आणि मोहरी (प्रत्येकी 100%) त्यानंतर मसूर (79%); हरभरा (74%); जव (बार्ली) (60%); करडई (50%)या पिकांच्या  बाबतीत सर्वाधिक मिळण्याचा अंदाज आहे.

मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  तसेच  सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा अवलंब करण्याच्या दृष्टीने तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमतीची  पुनर्रचना करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये एकत्रित प्रयत्न करण्यात आले.

याव्यतिरिक्त, खाद्यतेल-पामतेल राष्ट्रीय अभियान (NMEO-OP), हे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली केंद्रीय पुरस्कृत योजना असून  खाद्यतेलांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यास आणि आयातीवरील  अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. या योजनेसाठी  11,040 कोटी रुपयांची तरतूद असून यामुळे पीक क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती वाढविण्यास मदत करेल.

2018 मध्ये सरकारने जाहीर केलेली "प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान" (PM-AASHA) ही एकछत्री योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मोबदला देण्यास सहाय्य्यकारी ठरेल. एक छत्री योजनेमध्ये प्रायोगिक तत्वावर तीन उपाययोजना म्हणजेच किंमत आधारभूत योजना पीएसएस), किंमत किमान देय योजना (पीडीपीएस) आणि खाजगी खरेदी आणि साठवणूक योजना (पीपीएसेंस) यांचा समावेश आहे.




(साभार-pib.gov.in)


((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...