Monday, 15 July 2019

भारताला इंग्लंडसोबतचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत-पियूष गोयल

वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांनी लंडनमधल्या भारतीय समुदायाशी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमधला विश्वास वृद्धींगत करण्यासाठी सर्व संकल्पनांचे स्वागत भारत सरकार करत आहे, असे वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी रात्री लंडन येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला.
भारतीय समुदायाने भारत आणि इंग्लंड दोघांसाठी योगदान दिले असून दोन्ही देशांमधले संबंध वृद्धींगत केले आहेत.
गोयल यांनी सरकारची धोरणे आणि उद्दिष्टे समजावून सांगितली.
आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात गोयल ब्रिटीश सरकारमधले नेते आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या पावलांवरही चर्चा होईल.
पेटंटची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत करण्याच्या कामाला गती देण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत असल्याचेही गोयल यांनी सांगितले.

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ

सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून 2019 मध्ये 2.02 टक्के (तात्पुरती आकडेवारी) राहिला. त्याआधीच्या महिन्यात तो 2.45 टक्के (तात्पुरती आकडेवारी) होता. जून 2018 मध्ये तो 5.68 टक्के होता.
प्राथमिक गट (22.62 टक्के)
या गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1.4 टक्के वाढ होऊन तो 141.4 (तात्पुरती आकडेवारी) झाला.
‘अन्नपदार्थ’ गटाचा निर्देशांक याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 1.1 टक्के वाढ होऊन तो 151.7 (तात्पुरती आकडेवारी) झाला. सागरी मासे (6 टक्के), डुकराचे मांस, तूर, बार्ली, वाटाणे/चवळी आणि मूग (प्रत्येकी 4 टक्के), फळे आणि भाजीपाला (3 टक्के), गोमांस आणि म्हशीचे मांस, मसूर आणि मका (2 टक्के), मटण, मसाले, राजमा आणि तांदूळ (1 टक्के) यांच्या किमतीत वाढ झाली. विड्याची पाने (26 टक्के), चहा (2 टक्के), नाचणी आणि पोल्ट्री चिकन (1 टक्के) यांच्या किमतीत घट झाली.
‘अखाद्य वस्तू’ गटाच्या निर्देशांक 0.7 टक्के वाढून 128.7 (तात्पुरती आकडेवारी) झाला. कच्चे रबर (12 टक्के), चारा (5 टक्के), भूईमुगाच्या शेंगा (4 टक्के), मोहरीच्या बिया आणि सोयाबीन (2 टक्के), कच्चे रेशीम, कापूस बिया (1 टक्का) यांच्या किमतीत गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. फुलझाडे आणि नारळ (3 टक्के), एरंडेल बिया (2 टक्के), कच्चे ताग, औद्योगिक लाकूड आणि सूर्यफूल (1 टक्के) यांच्या किंमतीत घट झाली आहे.
‘खनिजे’ गटाच्या निर्देशांकात 14.5 टक्के वाढ होऊन तो 158 झाला.
कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू गटाच्या निर्देशांकात 0.3 टक्के घट होऊन तो 92.5 झाला.
इंधने आणि ऊर्जा (13.15 टक्के)
या गटाच्या निर्देशांकात 1.3 टक्के घट होऊन तो 102.1 झाला.
तयार उत्पादने (64.23 टक्के)
या गटाच्या निर्देशांकात कोणताही बदल न होता तो 118.4 राहिला.
अन्नधान्यावर आधारित घाऊक किंमत निर्देशांक (24.38 टक्के)
अन्नधान्य गटाच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात घसरण होऊन तो जून 2019 मध्ये 5.04 टक्के राहिला. मे 2019 मध्ये तो 5.10 टक्के होता.

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Wednesday, 10 July 2019

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 सुरु करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

देशातल्या ग्रामीण भागाना रस्तामार्गे जोडण्यासाठी मोठी चालना देण्याच्या दृष्टीने,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या  अर्थ विषयक समितीच्या झालेल्या बैठकीत प्रधान मंत्री ग्राम सडक योजना -3 (पीएमजीएसवाय-3)  सुरु करायला मान्यता देण्यात आली.  याद्वारे वस्त्यां ते ग्रामीण कृषी बाजारपेठ,उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांना जोडणारे महत्वाचे रस्ते तसेच इतर मार्ग मजबूत करण्यात येणार आहेत.
(पीएमजीएसवाय-3) द्वारे 1,25000 किलो मीटरचे रस्ते मजबूत करण्याचा प्रस्ताव आहे.
प्रभाव
यामुळे  ग्रामीण कृषी बाजारपेठ,उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालये यांच्यातली ये-जा सुलभ आणि वेगवान होणार आहे.
पीएमजीएसवाय अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांची योग्य देखभाल करण्यात येणार आहे.
वित्तीय परिणाम
यासाठी अंदाजे 80,250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.( केंद्राचा 53,800 कोटी,राज्यांचा 26,450 कोटी हिस्सा )
8 ईशान्येकडची राज्ये आणि 3 हिमालयीन राज्ये वगळता इतर  राज्यांना 60:40 या प्रमाणात निधी खर्च करण्यात येईल.( जम्मू  काश्मीर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ) यासाठी 90:10  या प्रमाणात निधी खर्च केला जाईल.
प्रभाव
प्रकल्प कालावधी 2019-20 ते 2024-25
सपाट भागात 150 मीटर  पर्यत,तर हिमालयीन आणि ईशान्येकडच्या राज्यात 200 मीटर पुलांचे बांधकाम
पीएमजीएसवाय-3सुरु करण्याआधी,संबंधित  राज्यांना पीएमजीएसवाय च्या अंतर्गत रस्ते बांधल्यानंतर  नंतर 5 वर्षे  या रस्त्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी पुरवण्यासाठी    सामंजस्य करार करायला लागेल.
पीएमजीएसवाय अंतर्गत प्रगती
ही योजना सुरु केल्यापासून एप्रिल 2019  पर्यंत एकूण 5,99,090 किलो मीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. (पीएमजीएसवाय 1, पीएमजीएसवाय-2 आणि आरसी पीएलडब्ल्यूईए योजनांच्या समावेशासह)
पूर्व पीठिका
पीएमजीएसवाय 3 योजना 2018-19 या वर्षाच्या  अर्थसंकल्पीय भाषणात वित्त मंत्र्यांनी जाहीर केली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यविषयक अटी विधेयक 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

13 केंद्रीय कामगार कायदे नवीन कोडच्या कक्षेत आणणार

एनडीए सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या उक्तीनुसार सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरंतर लोक लाभकारी योजनांचा निरंतर पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने उपरोक्त विषयाला अनुसरून व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यविषयक अटी विधेयक 2019 ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे वर्तमान स्थितीच्या तुलनेत येत्या 4 वर्षात सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थितीची तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी 13 केंद्रीय श्रम कायद्यांना नवीन कोड बनविण्यात आले आहेत. ही प्रक्रिया विलिनीकरण झाल्यानंतर असितत्वात येईल. कायदे खालीलप्रमाणे
  • फॅक्टरी कायदा 1948
  • खाण कायदा 1952, बंदर कामगार कायदा 1986 (सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण)
  • बिल्डिंग आणि कंस्ट्रक्शन वर्कर्स कायदा 1996
  • प्लान्‍टेशन्स लेबर ॲक्ट 1951
  • कॉट्रॅक्ट लेबर कायदा 1970
  • आंतरराज्यीय महिला विस्थापन कायदा 1979 (रोजगार आणि सेवा स्थिती नियमन)
  • कार्यकारी पत्रकार आणि वृत्तपत्र कर्मचारी (सेवाविषयक स्थिती तरतूद) कायदा 1955
  • कार्यकारी पत्रकार कायदा 1958 (मानधन दर ठरविणे)
  • मोटार वाहतूक कामगार कायदा 1961
  • सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज (सेवा अटी) कायदा 1976
  • विडी आणि सिगारेट कामगार कायदा 1966
  • सिने वर्कर्स आणि सिनेमा थिएटर कामगार कायदा 1981
  • एकदा हे सर्व कोड अंतर्भूत झाल्यावर त्यांचे नियमन करण्यात येईल
लाभ
सुरक्षा, आरोग्य कल्याण, कामगारांच्या कार्य स्थितीत सुधारणा तसेच देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये यामुळे योगदान मिळणार आहे.

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

नियमनाबाहेरील ठेवी योजनांवर बंदी आणणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आगामी संसद अधिवेशनात विधेयक सादर होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमानाबाहेरील ठेवी योजनांवर बंदी घालणारे विधेयक संमत केले. नियमानाबाहेरील ठेवींवर बंदी घालणाऱ्या वटहुकूमाची जागा हे विधेयक घेईल.
 प्रभाव
या विधेयकामुळे देशात सुरु असलेल्या बेकायदेशीर ठेवी गोळा करण्याच्या प्रकारांना आळा बसेल. कायद्यात असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन आणि कडक प्रशासकीय कारवाईच्या अनुपस्थितीत अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत होते.
 पार्श्वभूमी
नियमनाबाहेरील ठेवी बंदी कायदा २०१८ ला लोकसभेची मंजुरी मिळाली होती. परंतु राज्यसभेची मंजुरी मिळण्याआगोदर राज्यसभा स्थगित झाली होती


(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Friday, 5 July 2019

भारतीय पारपत्र असलेल्या अनिवासी भारतीयांना आधार पत्रक देण्याबाबत सरकार विचार करणार

2019-20 दरम्यान सरकार नवीन 4 दूतावास उभे करणार

17 प्रतिष्ठीत पर्यटन स्थळांना जागतिक दर्जाच्या रुपात विकसित केले जाईल

भारतीय विकास सहायता योजनेमध्ये बदल करणार



केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये 2019-20चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली कीभारतीय पारपत्र असलेल्या अनिवासी भारतीयांना आधार पत्रक देण्याविषयी सरकार विचार करेल. यासह भारतीय पारंपारिक कारागीर व त्यांची सृजनात्मक उत्पादने यांना जागतिक बाजार पेठेशी जोडण्यासाठी एक मोहीम सुरु करण्याचा देखील त्यांनी प्रस्ताव मांडला. यासाठी आवश्यकता असेल तिथे पेटंट व भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविले जातील.    
भारताच्या ठायी असलेल्या सौम्य शक्तींचे जगामध्ये विविध प्रकारे कौतुक होताना दिसते. मागील तीन वर्षांपासून 192 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले जात आहे. ‘वैष्णव जन तो तेने कहिए’ हे महात्मा गांधींचे आवडते भजन 40 देशांमधील कलाकारांनी गायिले. वार्षिक ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषेमध्ये अनिवासी भारतीयांसोबत परदेशी नागरिक देखील सहभागी होत आहेत.  

4 नवीन दूतावास
आंतरराष्ट्रीय समूहामध्ये भारताचा वाढता प्रभाव व नेतृत्व याला बळकटी देण्याच्या दृष्टीने ज्या देशांमध्ये अजून भारताचे रेजीडेंट डिप्लोमॅटिक मिशन नाहीत्या देशांमध्ये दूतावास व उच्च आयोग उभे करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान सरकार 4 नवीन दूतावास उभे करील. यामुळे परदेशातील भारताच्या पाऊलखुणा विस्तारित होतील व त्यासोबतच स्थानिक भारतीय समुदायाला दूतावासाकडून चांगली सेवा मिळेल.   
मार्च 2018 मध्ये भारत सरकारने आफ्रिकेमध्ये (रवांडाजिबूतीइक्वेटोरियल गिनीगिनीकाँगो गणराज्यबुर्किना फासोकॅमेरूनमॉरिटानियाकेप वर्देसिएरा लिओनचाडसाओ टोम आणि प्रिन्सिपेएरिट्रियासोमालियागिनी बिसाऊस्वाझीलँडलाइबेरिया व टोगो) 18 नवीन भारतीय राजनयिक मिशन स्थापण्याला मंजुरी दिली. आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान रवांडाजिबूतीइक्वेटोरियल गिनीगिनी व बुर्किना फासो येथे 5 दूतावास उभे केले.

भारतीय विकास सहायता योजना
प्राचीन बुद्धिमत्तेला लक्षात घेऊन भारताने द्विपक्षीय व क्षेत्रीय सहभागाच्या माध्यमातून इतर देशांसोबत आर्थिक सहभागाच्या नीतीचे पालन केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सरकार पर्यायी विकास प्रारुपांवर लक्ष देईल. यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटाबहुपक्षीय वित्त पुरवठाकॉरपोरेट व अनिवासी भारतीयांचे योगदान यांचा समावेश आहेअशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. भारतीय विकास सहायता योजनेमध्ये चालू आर्थिक वर्षात बदल केले जातील. भारतीय विकास सहायता योजना विकसनशील देशांत पायाभूत सुविधा विकास तसेच क्षमता निर्मिती योजनांसाठी सवलतीच्या दरात रक्कम उपलब्ध करून देतेअशी माहिती देखील त्यांनी दिली.     

प्रतिष्ठीत पर्यटन केंद्रे
17 प्रतिष्ठीत पर्यटन केंद्रांना सरकार जागतिक दर्जाच्या रुपात विकसित करत आहेजे इतर पर्यटन स्थळांसाठी आदर्श असेल. यामुळे पर्यटकांना चांगला अनुभव मिळेल व या स्थळांवर देश-विदेशातील पर्यटकांमध्ये वाढ होईलअशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. 

आदिवासी सांस्कृतिक वारसा डिजिटल संग्रह
समृद्ध आदिवासी सांस्कृतिक वारश्याचे जतन करण्यासाठी एक डिजिटल संग्रह तयार केला जात आहेज्यामध्ये कागदपत्रेलोकगीतेछायाचित्रे व व्हिडीओ डिजिटल रुपात ठेवले जातील. डिजिटल संग्रहात आदिवासींचा विकासउगमजीवनमानस्थापत्यकलाशैक्षणिक स्तरपारंपारिक कलालोकनृत्य इत्यादी गोष्टी जतन केल्या जातीलअशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

2020 पर्यंत सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट

हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लक्ष्य

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना येत्या पाच वर्षात 1 लाख 25 हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांची श्रेणीवाढ करणार 

यासाठी 80 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार

2022 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाकडे वीज आणि स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा

2020 पर्यंत सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लक्ष असल्याचे केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. लोकसभेत त्या आज केंद्रीय अर्थसंकल्प 2019-20 सादर करताना बोलत होत्या.  गेल्या पाच वर्षात 1 कोटी 54 लाख ग्रामीण घरे बांधण्यात आली आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात 2019-22 मध्ये एक कोटी 95 लाख घरे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.
ही घरे शौचालय, विद्युत आणि एलपीजी जोडणी यांसह उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
येत्या पाच वर्षात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत एक लाख पंचवीस हजार किलोमीटर  लांबीच्या रस्त्यांची श्रेणी वाढ केली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या कामासाठी 80 हजार 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शाश्वत विकासाची कटिबद्धता यासंदर्भात मंत्री म्हणाल्या की प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे वीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधतांना हरित तंत्रज्ञानटाकाऊ प्लास्टिक आणि कोल्ड मिक्स तंत्रज्ञान अशा गोष्टींचा वापर करण्यात आला आहेज्यामुळे कार्बन घटकांचे प्रमाण कमी झाले आहे.
उज्ज्वला आणि सौभाग्य योजनेविषयी अर्थमंत्री म्हणाल्या की या योजनेमुळे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाचे जीवनमान बदलले आहे आणि 2020 म्हणजेच भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक ग्रामीण कुटुंबाकडे वीज आणि स्वयंपाक बनवण्याची सुविधा असेल. देशभरातील सर्व गावांमध्ये आणि जवळ जवळ शंभर टक्के कुटुंबांना वीज प्रदान करण्यात आली आहे. केवळ जे कुटुंब गॅस जोडणी घेण्यासाठी इच्छुक नाहीआशा कुटुंबांना वगळता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाजवळ वीजपुरवठा आणि स्वयंपाक बनवण्याची सुविधा असेल असं आश्वासन अर्थमंत्र्यांनी देशवासीयांना यावेळी अर्थमंत्र्यांनी देशवासियांना दिलं.

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...